मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १६५१ ते १७००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १६५१ ते १७००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


स्थूलसूक्ष्मकारण । जें जड चंचळ अज्ञान ।
त्यांत प्रतिबिंबित जीव ईशान । स्वरूपसाम्य या कवणा ॥५१॥
मुख्य मायास्फूर्ति जलीं लहरी । ते विलक्षण सर्प आणि दोरी ।
मा तिजपासाव हे तत्त्वें सारीं । तरी त्यां साम्यता कैची ॥५२॥
अस्ति भाति प्रिय ब्रह्मात्मा । असज्जड दुःख सर्व अनात्मा ।
हे दोन्ही एकत्र संगमा । कदापि न मिळती ॥५३॥
या सर्वांहून चिती वेगळी । बोलिली श्र्लोकपदीं मुळीं ।
परी सदानंदता ही निराळी । चिति एक उपलक्षण ॥५४॥
स्वरूपलक्षणांतील एक । ग्रहण करितां निश्चयात्मक ।
उरलें लक्षण जें सकळिक । न बोलता ग्राह्य ॥५५॥
असो चित्प्रभा ते विलक्षण । सर्व हे नामरूप मिथ्या संपूर्ण ।
तेंचि ऐकावें विवेचन । घटांदिकां गगन जेवीं ॥५६॥
जड षडविकारी दृश्यपणीं । सर्व सुखदुःखाचे आयतनीं ।
ऐसिया देहाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥५७॥
विसर्ग होय जयाचेनी । स्थूलाचे मळाची सारणी ।
ऐसिया गुदेंद्रियाचें रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥५८॥
स्त्रीपुरुषाचिये मैथुनीं । क्रिया भोग जयालागुनी ।
तया उपस्थेंद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥५९॥
जाणें येणें क्रिया गमनीं । स्थूळासी घडे जयाचेनि ।
तया पादाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥१६६०॥
ग्रहण दानाची जयालागुनी । क्रिया होतसे अनुदिनीं ।
तया पाणींद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६१॥
नानावर्णोच्चारांच्या श्रेणी । उमटती सर्वदां जयेचेनी ।
तया वागिंद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६२॥
देहामाजीं अधोगमनीं । वाहत असे जडपणीं ।
तया अपानाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६३॥
ऊर्ध्व वाहे हृदयभुवनीं । श्र्वासोच्छ्वास जयाचेनी ।
तया प्राणाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६४॥
स्थूलों कंठस्थानीं राहुनी । प्रवर्तत असे क्षुत्पानीं ।
तया उदानाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६५॥
उभय संधींत नाभिस्थानीं । राहून हालवी संधीलागुनी ।
तया समानाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥६६॥
सर्व नाडी अन्नरसें कडोनी । पाववून होतसे पुष्टिदानी ।
तया व्यानाचे रूपाहुना चित्प्रभा वेगळी ॥६७॥
सुगंध दुर्गंध सन्निधानी । घेत असे दोन्ही निवडोनी ।
तया घ्राणाचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥६८॥
कटु तीक्ष्णादि रसश्रेणीं । चाखितां कळे जयेचेनी ।
तये जिव्हेचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥६९॥
दृश्य जितुकें साकारपणीं । तितुकीयांची दशा देखणी ।
तया चक्षूचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥१६७०॥
सर्व देहाकारें राहुनी । घेत असे स्पर्शालागुनी ।
तया त्वगिंद्रियाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥७१॥
वेदादिकांच्या शब्दश्रेणी । कळू लागती उठतां ध्वनी ।
तया श्रोत्रेंद्रियाचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७२॥
संकल्प करी संशयेंकडुनी । सदां होय नव्हे चंचळपणीं ।
तया मनाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥७३॥
ध्यासें आठवी अनुदिनीं । सदां प्रवर्ततसे चिंतनीं ।
तया चित्ताचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७४॥
निश्चयचि जयेची करणी । हें खरेंचि स्थापी अमुक म्हणोनी ।
तया बुद्धीचेही रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७५॥
मी मी सर्वदा वाउगा मानी । जो बंधचि बैसला घेऊनी ।
तया अहंकाराचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७६॥
जो स्फुरवी वृत्तीलागोनी । एकलाचि तिहीं स्थानीं तया
जिवाचिये रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७७॥
जे जीवासी घाली आवरणीं । प्रतिबिंबरूप जीवाची जननी ।
तये अविद्येचिये रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥७८॥
जे विक्षेपें दुजे दावी नयनीं । जयेची येवढी उद्भवली करणी ।
तये विद्येचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥७९॥
जो विद्येमाजी प्रतिबिंबोनी । जीवातें प्रेरी अलिप्तपर्णी ।
तया ईश्र्वराचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥१६८०॥
मृगजलवत जयेची उभवणी । जे प्रकृतिपुरुषात्मक निस्तत्वपणीं ।
तये मूळमायेचे । रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥८१॥
असो कारणरूप जी मूळ माया । विद्या अविद्या शक्ति जिचिया ।
तेचि जाहली नाहीं जया ठाया । तरी कार्य उभवे केवीं ॥८२॥
न कळण्यासीच नव्हे रूप । तरी कासया ऐसा असे सर्प ।
तरी भिन्न दोरी हे वाउगे जल्प ।
व्यर्थ कां न म्हणावें तैशी मूळमाया वंध्यासुताची आई ।
विद्यादि कन्या इशादि जांवई ।
हा आनंदकोश निजरूपाचे ठायीं । तें चिद्रूप याहून भिन्न ॥८४॥
तया आनंदासीही आच्छादान । करितो कोश नाम विज्ञान ।
वृत्तीचा परिणाम जे बुद्धि अनान ।
भाऊन बैसली ते पंचज्ञानेंद्रियद्वारा । होतसे विषयकारा ।
एवं विज्ञानमयता या साहा प्रकारा । त्याहून भिन्न चित्प्रभा ॥८६॥
त्या निश्चयासीही आच्छादिलें । संशयात्मक वरती दिसलें ।
यासीही ज्ञानेंद्रिय साह्य झालें । इतुका मनोमय कोश त्या मनामाजी व्याप्ति स्वरूपाची ।
परी ते विकारी चित्प्रभा कैंची ।
जेवी पाणी आणि तरंगाची । येकरूपता नव्हे ऐसा मनोमयही आच्छादिला ।
प्राणमयचि जड दिसूं लागला ।
तो अंतर्बाह्य दशधा जाहला । प्राण कर्मेंद्रिये ॥८९॥
जो विकाराचा विकारी । तो कैसा होय निर्विकारी ।
आकाश असून जलामाझारी । येकत्र कालवती ना ॥१६९०॥
या प्राणमयावरती दिसला । स्पष्टत्वें स्थूल साकारला ।
तो अन्नमयकोश बोलिला । घट जैसा गगनीं ॥९१॥
मूळीं मूळमाया नव्हें स्वरूपाऐशी । विद्या अविद्यासह जीवेशासी ।
तेथें विज्ञानमय प्राण भिन्नत्वेंसी । तेथें साकारा साम्यता ॥९२॥
हें बोलणेंचि व्यर्थ कुडें । तैसेंचि भिन्न म्हणणेंहि बापुडें ।
जैसें जला आणि जलाकाशा न जोडे ।
तरी गगनासम घट केवीं ऐसेंचि साकार ब्रह्म्य़ापासूनी ।
कीटकांत सर्वही दृश्यपणी ।
स्वस्वरूप भिन्न सर्वांहुनी । नाना घटांहून गगन ॥९४॥
हे असो भौतिकाची कथा । परी महाभूतें साम्य न होती सर्वथा ।
जेथें रूपादिकांची व्यवस्था । असे पंचविध ॥९५॥
पृथ्वी आणि भौतिक सारीं । हीं सर्व असतीं पंच प्रकारीं ।
शब्द रूप रस गंधानुकारी । असती पदार्थ ॥९६॥
स्वरूप तरी अशब्द अस्पर्श । अरूप अगंध अरस ।
तस्मात् भिन्न घटाहून आकाश । कां न म्हणावें ॥९७॥
आपीं जरी गंध नाहीं । तरी चारी असती सर्वदांही ।
स्वरूपी रसादि नसती कांहीं । यास्तव भिन्न आपाहुनी तो रसही तेजांत नसतां ।
शब्द स्पर्श रूप असती आंतौता ।
म्हणून अग्नीसी स्वरूपसाम्यता । न ये कल्पांतीं ॥९९॥
वायुमाजीं रूपही असेना । परी शब्द स्पर्श असती भिन्नपणा ।
तरी साभ्यता अस्पर्शा होईना । कवणेही काळीं गगनीं स्पर्शही नसे किमपि ॥१७००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP