मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २४५१ ते २५००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २४५१ ते २५००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


अभावाचा जो अनुभवी । तोचि शून्यसाक्षी गोसावी ।
स्वयंप्रकाशें देखणा रवि । अपरोक्ष आत्मा ॥५१॥
येर हे स्फूर्तीपासून इंद्रियांत । वृत्ति जीव आदि समस्त ।
परप्रकाश आणि मिथ्याभूत । ते अपरोक्ष कैसेनी ॥५२॥
आपण सन्मुख हें आघवें । स्वप्रकाशें अवलोकावें ।
तरी तेंचि आपण केंवीं व्हावें । म्हणोनि परोक्ष ॥५३॥
जो सर्वांसी न दिसे । आणि सर्वांमाजीं असे ।
तोचि अपरोक्ष स्वप्रकाशें । त्रिकालाबाधित ॥५४॥
जो अन्यासी अपेक्षीना । कीं अमुकास्तव जाहला देखणा ।
तस्मात् स्वप्रकाशक पूर्णपणा । हा ब्रह्मात्मा एक ॥५५॥
इंद्रियांसी मन बुद्धि पाहिजे । बुद्धीनें जीवाची अपेक्षा कीजे ।
जीवेंही वृत्तिसापेक्षें असिजे ।
म्हणोनि परप्रकाश सर्वही आत्मसत्तें असती ।
आत्मप्रकाशें वर्तती । आत्मप्रियत्वें वांचती ।
यासी पृथक सत्व कैचें ॥५७॥
तस्मात् परप्रकाशक जडे । यांसी अपरोक्षता न घडे ।
याचा लय उद्भव पाहतसे पुढें । तो स्वप्रकाश अपरोक्ष ॥५८॥
ऐसियासी हा आत्मा म्हणोनी । श्रुति बोलिली निर्धारवचनीं ।
सर्वांचा लय कीं असो उभवणी । कीं भलती अवस्था ॥५९॥
हा शब्दाचे आदी अंतीं । मध्यें वृत्ति किंवा जीवाची स्फूर्ति ।
अवलोकितसे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥२४६०॥
स्पर्शज्ञान होतां निमतां । त्वचा वृत्ति कीं जीव स्फुरतां ।
आकृत्रिम प्रकाशी समस्तां । हा आत्मा ब्रह्म ॥६१॥
चक्षू बुद्धीसी जीव स्फुरवी । तेणें रूपाविषय प्रतीति घ्यावी ।
या इतुकिया सहजी प्रकाशवी । हा आत्मा ब्रह्म ॥६२॥
जिव्हा बुद्धी वृत्ति जीव । येणें रस घेतसे अपूर्व ।
या इतुकिया प्रकाशी सर्वदैव । हा आत्मा ब्रह्म ॥६३॥
घ्राण जीव अंतःकरणवृत्ति । सुगंध दुर्गंध निवडिती ।
याचा आदि अंत जाणे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥६४॥
वाचा आदि कर्मेंद्रिय । वचनादि क्रियावृत्ति जीवें होय ।
या सर्वां सहज प्रकाशमय । हा आत्मा ब्रह्म ॥६५॥
ऐशी ही जागृति अवस्था सारी । वृत्तियोगें जीव अभिमान धरी ।
सहज सर्वांसी जो प्रकाश करी ।
हा आत्मा ब्रह्म स्वप्नांतील भासविषय ।
किंवा कल्पना उठोनि जाय । त्या वृत्ति जीवासी प्रकाशी अद्वय ।
हा आत्मा ब्रह्म ॥६७॥
जीव अज्ञानें मी म्हणे कर्ता । हा तैजसाभिमानी तत्वतां ।
ययासी निर्विकारे जो प्रकाशिता । हा आत्मा ब्रह्म ॥६८॥
कल्पनेचा लय ते सुप्ति । नेणीव नुसधी सुखविश्रांति ।
अनुभवीतसे स्वयंज्योति । हा आत्मा ब्रह्म ॥६९॥
तेथें नेणतेपणाचा अभिमान । घेऊन बैसला तो प्राज्ञ ।
तयासीही असे प्रकाशून । हा आत्मा ब्रह्म ॥२४७०॥
हें असो समाधिकालीं । ज्ञाता पडे स्वानुभव सुकाळीं ।
तयासीही सहजत्वें उजळी । हा आत्मा ब्रह्म ॥७१॥
एवं रूपादिकीं सर्वों व्यापला । आणि प्रकाशीतसे सर्वां क्रियेला ।
सच्चिदानंद सहजत्वें संचला ।
हा आत्मा ब्रह्म ऐसा स्वप्रकाशक अपरोक्ष ।
जो उत्तम अधिकारी दक्ष । तयासी श्रुति उपदेशी प्रत्यक्ष ।
हा ब्रह्म आत्मा म्हणोनि हेचि वचन अधिकारियानें ।
विवेचून घेतलें गुरुमुखानें । निश्चयचि करून दृढबुद्धीनें ।
जीवन्मुक्तत्वें विचरे ॥७४॥
निश्चय ऐसा दृढ केला । कीं विश्र्वतैजसा नाहीं स्पर्शला ।
हा बत्तीस तत्त्वांचा मेळा आपुलाला ।
वर्तो भलते व्यापारीं आपण आत्मा ब्रह्म असंग ।
हे बत्तीस वेगळे मिथ्यात्वें जग । ऐसा हा जाहला ग्रंथिभंग ।
पुन्हां जड चिद्रूप न मिळे ऐसा जो पावला समाधान ।
जयासी कधींही नोव्हे उत्थान । तयाचें अल्पसें करूं कथन ।
श्र्लोकार्धें ध्वनितार्थ ॥७७॥
॥ क्षणे क्षणेऽन्यताभूताधीविकल्पाचितिर्नतु॥
हे बत्तीस ईशादि तृणांत । होती क्षणक्षणां अन्यथाभूत ।
ब्रह्मात्मा चिद्रूप सदोदित । अन्यथा नव्हे ॥७८॥
मूळ श्र्लोकं बुद्धीचे विकल्प । अन्यथा होती बोलिले अल्प ।
त्यावरी ईशादि तृणांत केला जल्प । कासया कोणी मानील ॥७९॥
तरी बुद्धीपासून तों ऐलीकडे । देहांत विकल्पांत सांपडे ।
जीवही तेथें स्फूर्तित्वें आतुडे । एवं हें सर्व आलें ॥२४८०॥
बुद्धीचें कारण जें आनंदमय । तेंही बुद्धीवीण कोठें जाय ।
तस्मात् कारणासी घेऊन कार्य । वर्ते व्यापारीं ॥८१॥
आरंभीं मायास्फूर्ति उठे । तेव्हांचि बुद्धिकार्य उमटे ।
तेव्हां विद्या अविद्या जीवेश गोमटे । कां न येती ॥८२॥
तस्मात् ईशादि तृणांत बत्तीस । विकल्परूपताचि असे यास ।
हेचि क्षणक्षणां अन्यथा भास ।
होती पावती विकारा पृथ्वी आप तेज वायु गगन ।
हे तों जड पहिलेच संपूर्ण । याही वरी पालट धरिती क्षणक्षण ।
एकत्र पांच होतां पांच खाणी तों मुळीं विकारी ।
पुढें जन्मादि मरणांत विकार करी । क्षणक्षणां पालटती सारीं ।
देहधारी सान थोर देहा अंतरीं पंचप्राण ।
हे तों उघड विकारी क्षणक्षण । तैसाचि दशेंद्रियांचा गण ।
अन्यथा विकारा पावे ॥८६॥
मनबुद्धीचे तों सर्वदा विकल्प । क्षणक्षणां होती संकल्प ।
विकारावीण न राहती अल्प ।
गुणाचे कीं कामादिकांचे ऐशीच मायास्फूर्ति झणक्षणां ।
उठे मुरे सर्वदा स्फुरणा । जिसवें विद्या अविद्या विक्षेप आवरणा ।
करिती विकार जीव तो मायास्फूर्तिपासून ।
विषयांत आदळे जाऊन । यासी विकारी म्हणतां क्षणक्षणा ।
किमपि दोष नाहीं ॥८९॥
ही असो जीवत्वाची कथा । परी ईशही विकारी सर्वथा ।
मुळींच प्रतिबिंबत्वें जाहला अन्यथा ।
वरी विकार प्रेरणेचा तस्मात् ईशादि तृणांत । क्षणक्षणां होती मिथ्याभूत ।
कारण कीं सर्वही मायाजनित । विकाराचे विकारी ॥९१॥
प्रेरक ईश मायेंत आता । मा प्रेर्य जीव तो विकाराचा आथिला ।
येथें शंका वाटेल कोणाला ।
ते आधीं अवधारा कीं प्रेरक मायातीत आत्मा ब्रह्म ।
बुद्धीचा असे हा श्रुतीचा नेम । आणि सर्वांसी असे विश्राम ।
अधिष्ठानत्वें ॥९३॥
चुंबकासन्निध लोह चळे । तेव्हां चालक चुंबक या युक्तीच्या बळें ।
आणि अनुभवही बोलती सकळें । ज्ञाते कवि वेदांती ॥९४॥
तस्मात् श्रुति युक्ति अनुभवेंकडून । ब्रह्म आत्माचि करी प्रेरक ।
येथें प्रेरण स्थापिला ईशान । तरी विरोध वाटे ॥
ऐसिया आशंकेसी उत्तर । कीजेल सत्यत्वेंसी निर्धार ।
ब्रह्मात्मा प्रेरक जो प्रकार । याचें रहस्य भिन्न ॥९६॥
ईश्र्वरादिही सर्व जाहले । जाहले ते स्वधर्मी व्यापारले ।
या इतुकीयाचें प्रेरण कोणी केलें । ईशादि तृणांत ॥९७॥
तेव्हां श्रुतीसीही विचार पडिला । कीं हा आळ घालावा कोणाला ।
ब्रह्मात्मा तो असंग संचला । ईश तो प्रेर्य असे मागुतीं पाहतां विचार ।
हे जाहलेच नसतां सविस्तर । मिथ्यात्वा प्रेरक जरी निर्विकार । म्हणतां बाध नाहीं ॥९९॥
चुंबक स्वतां हालवीना । सन्निधानत्वें लोहो पावे भ्रमणा ।
तरी तो विकार न पावतां आरोपणा । केली तरी निर्घाध ॥२५००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP