मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २८०१ ते २८५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २८०१ ते २८५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


जलतरंग जरी जाहले । तरी सर्व साम्यत्वा नाहीं आले ।
येकदेशी आणि पातळ वोले । तस्पात् मुक्तमालेसम ॥१॥
मुक्तमाळा जैशी स्वाधीन । तेवींच तरंग होती करें निवारण ।
तस्मात् मुक्तमाळेचे समान । गगनमात्र नाहीं ॥२॥
अथवा मालाशब्दें जरी घेतां । मुक्तमाला उपलक्षितां ।
गगनही आलेंचि दृष्टांता । वेगळें बोलणें नको ॥३॥
मुक्तमाळा मणिमाळा । तेवींच तरंग मेघमाळा ।
मणियांत तंतु जेवीं वोविला । तेवीं गगन जीवन व्याप्त ॥४॥
गगनीं जीवनीं कीं तंतुवरी । उठती मेघ मणि कीं तरंगलहरी ।
परी आच्छादित असती झडकरी । गगन जीवन तंतु ॥५॥
तैशी स्वरूपसागरीं कल्पना उठे । अंतरापासून विषयांत दाटे ।
चिद्रूप आच्छादिलें गोमटें । बहुत विकल्पें ॥६॥
मणि मागें पुढें सरतां । तंतु स्पष्ट दिसे आंतौता ।
कीं तरंगाचे संधींत पाहतां । निश्चळ पाणी ॥७॥
मेघही आपणचि वितुळती । येकेक ठाईं ढग दिसती ।
तेथें गगन येतसे प्रतीति । निश्चळ पोकळ अवकाश ॥७॥
ऐसेचि विकल्पाचिये मधीं । कांहींसा अवसर संधी ।
तया संधीमाजी स्पष्ट आधीं । चिद्रूप प्रतीति बाणे ॥९॥
कोण्याही प्रकारें समजावें । म्हणोनि दृष्टांतालागीं द्यावें ।
आणि विचारवंतेंही तेंचि घ्यावें । मनना योग्य जें ॥
सर्व साम्य असतां बहु बरें । नातरी ऐकदेशीही साचारें ।
तेंही घेऊनिया आदरें । कळावें निरूपण ॥११॥
असो आतां विकल्पाचें रूप । स्पष्ट करूं कांहीं अल्प ।
पुढें चिद्रूप तें आपेआप । स्पष्ट कळे कैसें तें ॥१२॥
जागृतीमाजीं अंतरांतून । विकल्प उठे बुद्धीपासून ।
तोचि इंद्रियद्वारा निघून । विषयावरी आदळे ॥१३॥
आदळतांचि विकल्प मावळे । पुन्हां दुजा अंतरांतून उफाळे ।
तो जो मावळें कीं झांवळे । तो बळें आदळे तिसरा ।
ऐसा उसंत निमिष्य नाहीं । मध्य संधीच न दिसे कांहीं ।
जैसें वेगें चक्र फिरतां लवलाही । भिन्न आरा न दिसती ।
चक्राच्या आरा तरी भिन्न भिन्न । फिरतां न दिसती असून ।
मा विकल्पांचें अति चपळपण । तेव्हां संधी कैच्या दिसती ॥१६॥
केव्हां शब्दाकार स्पर्शाकार । कीं रूप रस गंधाकार ।
केव्हां शब्दाहून शब्दांतर । विकल्प धांवती ॥१७॥
केव्हां कर्मेंद्रियांची क्रिया । बोलणें चालणें अवघिया ।
तेंही अवलोकून लवलाह्या । ज्ञानेंद्रियांकडे धांवे ॥१८॥
ऐसा क्षण एक विसांवा न होतां । विकल्प जाळें उठती तत्त्वतां ।
जैसे मेघ अंतरिक्ष दाटतां ।
संधीच न दिसती ऐशियामाजींहि चिद्रूप सघन ।
परीपूर्ण व्यापिलें जेवीं गगन । अणुप्रायही स्थळ रितें न होणें ।
आंत किंवा बाहेरी परी मेघें जैसें आच्छादिलें ।
तेव्हां गगन न दिसें कांहीं केलें । तैसे विकल्पचि अवघे दाटले ।
व्याप्त चिद्रूप दिसेना येथें विचारवंत ऐसें पाहती ।
कीं गगनब्रह्माची नसतां व्याप्ति । तरी मेघ विकल्प केवीं राहती ।
तस्मात् अंतर्बाह्य ब्रह्म ॥२२॥
परी मंदप्रज्ञ केवीं निवळे । विचाराचे झावळे डोळे ।
म्हणोनि तया हळुहळु आकळे । साधन अभ्यासें ॥२३॥
तो अभ्यास पुढें बोलणें । प्रस्तुत येथें विकल्प ओळखणें ।
या रीतीं जागृतीमाजीं होणें । ऐसाचि स्वप्नीं असे ॥२४॥
स्वप्न म्हणिजे वाउगी कल्पना । प्रत्यक्ष इंद्रियविषयाविना ।
मग असो कीं जागेपणा । किंवा झोपेंत स्वप्न ॥२५॥
या उभय रीतीं स्वप्नाआंत । विकल्पाचे जाळें उठत ।
बाह्य मात्र न जाती विषयांत । परी अंतरीं घोटाळती ॥२६॥
तेथेंहि देह विषय ज्ञानेंद्रिय । आणि क्रिया कर्म कर्मेंद्रिय ।
ध्यासरूपें वासनामय । अंतरींच आठवी ॥२७॥
एक विषय आठवितां दिसे । तो नासून दुजा विकल्प होतसे ।
तो जों भासे कीं नासे । तों उद्भवे तिजा ॥२८॥
ऐसें स्वप्नींही विकल्पजाळें । उठती जैशी मेघमंडळें ।
तेणें ब्रह्माकाश झांकोळे । व्याप्त परी दिसेना ॥२९॥
असों दोहीं अवस्थांमाझारीं । विकल्प असे अतिविकारी ।
परी सुषुप्तिमाजींहि निर्विकल्प व्यापारीं ।
विकल्प असे तया सुषुप्तीचेही प्रकार दोन । एक झोप येक उगेपण ।
तेथें बुद्धि किंवा नसे मन । इंद्रियध्यासासहित ॥३१॥
नुसती स्फूर्ति अंतःकरणाची । विद्या अविद्यात्मक माया तेची ।
कल्पना नसतां विषयादिकांची असे निर्विकल्प नेणपणेंची असे दाटली ।
वासना गडदपणें बैसली । स्फूर्ति मात्र उठे जाय मावळली ।
एका मागें एक ॥३३॥
तेंचि विकल्पाचें स्वरूप । वाउगी गडद पडे झाप ।
तेथेंही व्याप्त सच्चिद्रूप । आच्छादिल्यापरी ॥३४॥
एवं जागृति स्वप्न सुषुप्ती । तीनचि अवस्था जीवाप्रती ।
या तिहींमाजींही विकल्पपांक्ति । असती दाटल्या ॥३५॥
तयावरी विकल्परूप मेघमाला । तीन अवस्था उठती ॥३६॥
नेणीवरूप स्फूर्ति निर्विकल्प । उठे निमे ते उगेपणा झोप ।
ते मनबुद्धीसी येतां साक्षेप । स्वप्नावस्था होय ॥३७॥
तेचि इंद्रियद्वारा विषयांत । स्फूर्ति जाऊन आदळत ।
तयासी जागृति हे संकेत । एवं व्यापार तीन ॥३८॥
परी विकल्प तेथून येथवरी । दाटला असे मेघापरी ।
कोठें स्पष्ट कोठें अस्पष्ट परी । नाहींसा नाहीं ॥३९॥
ऐसिया विकल्पें चिद्रूप अमूप । आच्छादिलें गगनीं जेवीं झाप ।
म्हणोनि ब्रह्मात्मप्रतीति अल्प । नव्हे साधका ॥४०॥
प्रतीति न व्हावया आणिक । कारण असें तें बोलिजे कौतुक ।
ब्रह्मात्मा जो परिपूर्ण एक । येर मायिक वृत्यादि ॥४१॥
स्फूर्त्यादि देहांत सर्व जड । यया जाणणेंच असे अवघड ।
तरी कोणत्या तत्त्वें आत्मा घबाड । जाणों लाहिजे ॥४२॥
अन्य विषयमात्रा परप्रकाशें । जाणती बुद्ध्य़ादि आपैसे ।
त्यावीण कल्पिलें कीं आत्मा न दिसे ।
तेव्हां आच्छादिला विकल्प ॥४३॥
विकल्पें आच्छादिलाहि भावितां । चिदात्मा आच्छादेना तत्त्वतां ।
जैशी अस्ति भाति प्रियरूपता । प्रगटचि असे सर्वांमाजीं जो आहेपणा ।
तो तरी किंचितही नव्हे उणा । प्रियत्वें जैसा आपआपणा ।
तेंही अन्यथा नव्हे ॥४५॥
देखणाही जो परिपूर्ण । तोहि विकल्पें नव्हे आच्छादन ।
तरी आच्छादिला म्हणेल कवण । भ्रामकावांचोनी ॥४६॥
जैसे मेघें गगन आच्छादिलें । तें मूढ जनीं व्यर्थ भाविलें ।
तळीं उपरि जें संचलें । हें तों स्वतःसिद्ध ॥४७॥
ऐसेंचि ब्रह्मात्मत्व स्वतःसिद्ध । प्रगटचि असे प्रसिद्ध ।
या विकल्पादिकांचा संबंध । तया नाहींच नाहीं ॥४८॥
पहा पहा विचारें झोंपेंत । किंवा उगेपणा मनबुद्धिरहित ।
तेथील नेणपणा प्रकाशित । आपुल्या प्रकाशें ॥४९॥
कांहीं मनादिका साह्य नसतां । नेणीव स्फूर्तीसी प्रकाशिता ।
तो कवणे काळीं होय नेणता ॥२८५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP