मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १३५१ ते १४००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १३५१ ते १४००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


एकदांचि चौमुखांची गर्जना । होती जाला शब्दरचना ।
ते कवणें आकळावी अवधारणा । येवढी कवणाची ॥५१॥
परी तेही सर्व बुद्धिमंत । आकळिते जाहले शब्दजात ।
अर्थासी मात्र पारंगत । न होती कोणी ॥५२॥
असो ऐसा मार्गदर्शक । निर्माण जाला वेद सकळिक ।
इतुक्याचा कर्ता तो एक । ईश अंतर्यामीं ॥५३॥
आतां जीवाची कृति तेही कैशी । प्रस्तुत बोलिजे अल्पशी ।
सर्वों ग्रहण करून शब्दासी । योजना करिते जाहले ॥५४॥
अमुक शब्दाचा अमुक अर्थ । अमुक नामाचा हा पदार्थ ।
ऐसें कल्पोनिया आवडता स्वार्थ । योजना करिती ॥५५॥
नाना लिंगभेद केले । नाना वित्पत्तीतें वाढविलें ।
नाना तर्कें विभक्तीतें स्थापिलें । न्यायध्याकरणादि करोनी ॥५६॥
छंद निरुक्त ज्योतिषादि । अंगें उपांगें नानाविधि ।
प्रतिपादिती निर्णयबुद्धि । करणें हें न करणें ॥५७॥
पुढें पुढें तों व्यासादिक । आचार्य जाहले अनेक ।
तेणें तो वेद सूत्रादि कौतुक । रचिला विस्तार ॥५८॥
हा ऋृग्वेद हा यजुर्वेद । हा अर्थवण हा सामवेद ।
उदात्त अनुदात्तादि विशद । कल्पना केली ॥५९॥
ऐशी योजना जे जे कल्पनेची । अनेकधा रचनाही शब्दाची ।
तितुकीही कृति असे जीवाची । एवं द्विविध कर्ते यया ॥११६०॥
ऐसा वेद रचनात्मक । निर्माण जाला मार्गप्रवर्तक ।
त्यांत कर्मचि प्रतिपादून येक । निश्चयें बैसले ॥६१॥
उपासना कोणी श्रेष्ठ म्हणती । परी आवडी ऐशी भिन्न स्थापिती ।
एक  म्हणती ज्ञानाचि गति । परी ज्ञेय निर्धारा नये ॥६२॥
पहिला प्रणवात्मक वेद । दुसरा मात्रात्मक शब्द ।
ययाची हेळणा करून प्रसिद्ध । म्हणती वेदाक्षरें खरें ॥६३॥
नाना वर्ण नाना आश्रम । विस्तारिले भिन्न अनुक्रम ।
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे उत्तम । अधिकारी वेदाचे ॥६४॥
हे स्त्रीशुद्रादि अनधिकारी । अंत्यवसाई तो दूरीच्या दूरी ।
ऐशी कल्पनाच वाढवून अंतरीं ।साभिमानें बद्ध होती ॥६५॥
असो बहू बोलतां न सरे । हें अनावरचि असे सारें ।
परी जीवकल्पित बाधक निर्धारें । विचारावें मुमुक्षु ॥६६॥
तंव विनवितसे रविदत्त । जी जी निवडिलें जीवेश द्वैत ।
परी ईशनामाचा संकेत । कवणासी असे ॥६७॥
चतुराननाचे अतरांतून । शब्द प्रेरिता जाहला ईशान ।
येणें शब्दें ब्रह्मा आपण । ईश्र्वर नव्हे ॥६८॥
आणि पराधीनत्वें सृष्टि निर्मिली । तेव्हां ते स्वतंत्रत्वें कोणें केली ।
तया ईशासी व्यक्तता आली । किंवा अव्यक्त ॥६९॥
जनाचे तर्क तरी अनेक । तैसेंचि स्थापिती शास्त्रकारक ।
कीं ईश्र्वर असे कोण येक । तो चालक सर्वांचा ॥१३७०॥
परी तो रहात असे कोठें । सूत्रें केवी हालवी नेटें ।
हें न कळे कवणापरी बोभाटे । प्राणिमात्र व्यर्थ ॥७१॥
उत्पत्ति करी चतुरानन । विष्णु जगाचें करी पालन ।
संहारीतसे रुद्र आपण । सर्वांलागीं ॥७२॥
त्यांत ब्रह्मदेवाचें पराधीनत्व । कळलें असे कीं आरोपितत्व ।
परी विष्णु सदाशिव स्वतंत्र अपूर्व । असती कीं कैसें ॥७३॥
ऐसा प्रश्र्न रविदत्ताचा । ऐकोन श्रीगुरु बोलती वाचा ।
अरे स्वतंत्रपणा कवणासी कैंचा । आकारा आले तयां ॥७४॥
साकारत्व जीवालागीं न ये । मा अवयवी ईश कैसा होय ।
जितुकें दृश्य तें भूतमय । जरी स्वतां प्रगटती ॥७५॥
स्वतां प्रगटती ते अयोनिसंभव । म्हणती परी तो मिथ्या गौरव ।
दृश्यासी कारणें असती सर्व । स्फुरणादि पृथ्व्यंत ॥७६॥
कारणासीच म्हणावें योनि । तेथून कार्याची उभवणी ।
तया संभवा मानावें अयोनि । तरी वृक्षादिकां न म्हणावें ॥७७॥
असो विष्णु आणि सदाशिव । गुणमायेचे स्वभाव ।
पालन संहार जगाचा सर्व । करणें हें परतंत्र ॥७८॥
विष्णु जरी पालनकर्ता । तरी होणारा स्वाधीन न होतां ।
ऋृषि यज्ञामाजीं प्रगटतां । अहंभोक्ता भाविलें ॥७९॥
तत्क्षणीं निजकरींचें सुदर्शन । तेणें स्वशिराचें जाहलें कृंतन ।
मग सर्वों बैसविले अश्र्वाचें आनन । तो हयग्रीव अवतार तस्मात्
स्वशरीर रक्षवेना । तो काय संरक्षी अन्य जना ।
म्हणोनि परतंत्रता चतुरानना । तेवींच विष्णूची ॥८१॥
कोणी म्हणेल अभिमान उठतां । न साहे किमपि भगवंता ।
म्हणोनि शिरच्छेद जाला तत्त्वता । स्वकीय इच्छेनें ॥८२॥
तरी पहा कल्पना कवणा जाहली । कवणाचे हेतूनें हानि जाहली ।
ज्याची सत्ता तो ईश येर हे भुली । कल्पनारूप जीवाची ॥८३॥
संहार करणें शिवाकडे । त्याचे सामर्थ्य जाहलें हें कुडें ।
येणें अर्थें तों जालें उघडें । पराधीनत्व विष्णूचें ॥८४॥
आतां संहारा जरी सदाशिव । स्वतंत्र असे सर्वथैव ।
तरी त्रिपुरवधाचें अपूर्व । सांकडें कां पडतें ॥८५॥
तस्मात् कोणीही स्वतंत्र नसे । ब्रह्मा विष्णु सदाशिव ऐसे ।
मा येर देव तों अपैसे । उघड परतंत्र ॥८६॥
जरी म्हणेल कोणी कीं स्वतंत्र कोण ।
कोण करी उत्पत्ति लय पालन । तरी हे ईशाधीन गुण तीन ।
तेणें तिन्ही होती तेही गुण ज्याचे त्यापाशीं ।
ब्रह्मादि कीटकांत दिवानिशीं असती एक यतां उदयासी ।
दोन आच्छादती ॥८८॥
जाणणें तोचि सत्त्वगुण । जाण जाणों वांचती संपूर्ण ।
ऐसें सत्वगुणें होतें पालन । तोचि विष्णु ॥८९॥
नेणणें तमोगुण विख्यात । नेणीव विस्मरणें प्राणी मरत ।
ऐसाचि रुद्र संहारित । तमोगुण रूपें ॥१३९०॥
जाणीव नेणीव समान जाहली । म्हणोनि रजोगुणें उत्पत्ति पावली ।
एवं सृष्टि ब्रह्मदेवें रचिली । रजोगुण रूपें ॥९१॥
एवं रजःसत्त्वतमात्मक । त्रिगुण उत्पत्ति स्थिति लायकारक ।
यया तिन्ही गुणांसी प्रवर्तक । तो येक ईश्र्वर ॥९२॥
तरी तो ईश्र्वर कोठें राहतसे । त्रिगुणांसी कैसा प्रेरितसे ।
म्हणाल तरी अवधारा अल्पसें । बोलोनि दावूं ॥९३॥
ईश्र्वर जरी सावयव असता । तरी देहाबाहेरी म्हणों येता ।
जेवीं बुद्धि तेथें जीव ऐता । तेवीं स्फूर्ति तेथें ईश्र्वर ॥९४॥
बुद्धींत अविद्येस्तव पडिलें । प्रतिबिंब तें जीवत्वा पावलें ।
तेवींच विद्यामायेनें चैतन्य फळलें । स्फू र्तींत तो ईश्र्वर ॥९५॥
जीवांसी स्वतंत्रता असेना । कारण कीं कल्पिलें तैसें घडेना ।
म्हणून ईश्र्वर करीतसे प्रेरणा । प्रारब्ध उदया ऐशी ॥९६॥
प्रारब्धभोग असे जीवासी । तें सुखःदुःख नव्हे ईश्र्वरासी ।
म्हणोनी जीव नव्हे तो स्वतंत्रत्वेंसी । प्रेरणा मात्र करी ॥९७॥
जीवाचें होणार नव्हे स्वाधीन । परतंत्रत्वें भोगी आपण ।
म्हणून प्रेरकएक असे ईशान । चाळक बुद्धीचा ॥९८॥
असो जीव जैसा बुद्धिआंत । रहात असे सदोदित ।
तेवींच ईश्र्वर गुणांसहित । स्फूर्तींत वसे ॥९९॥
ब्रह्मादि कीटकांत येकला । अंतर्यामित्वें हृदयीं राहिला ।
अलिप्तपणें नियंता सर्वांला । असे स्वसामर्थ्यें ॥१४००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP