मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ५१ ते १००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५१ ते १००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


तेव्हां वचनरहस्य जोडे तस्मात् जयासी खरें सुटावे ।
वाटे तेणें विषय हे टाकावे । तरीच कार्य हें साधावें ।
श्रवण मननें ॥५१॥
आतां सर्वों सावधान । आचार्यं ओळले कृपाघन ।
वाक्यवृत्तीचें निरूपण । रविदत्ता करिती ॥५२॥
प्रथम घडावें विवेचन । यास्तव देहत्रयाचें कथन ।
कीजे श्र्लोकार्थीं निरूपण । आदरें ऐकावें ॥५३॥
स्थूलोमांसमयोदेहःसूक्ष्मःस्याद्वासनामय ।
ज्ञानकर्मेंद्रियैः साधर्ंधीः प्राणौतच्छरीरगौ ॥१॥
स्थूलदेह मांसमयाचा । सूक्ष्म तोचि वासनात्मक साचा ।
तेथें प्रकार असे सत्रा तत्त्वांचा ।
इंद्रिये प्राणें मन बुद्धी स्थूलदेह मांसमय कैसा ।
विस्तार बोलिजे अल्पसा । पंचीकृत भूतांचा सहसा ।
जो का उभारला ॥५५॥
भूतांपासोनियां जालें । जें का अपंचीकृत पाहिलें ।
तेंचि एकमेकांसी वांटिलें । हेंचि पंचीकृत ॥५६॥
अंतःकरण व्यान श्रवण । वाचा शब्द हें आकाश पूर्ण ।
ययाचे भाग केले दोन । ईक्षणमात्रें ईशें ॥५७॥
मुख्य अंतःकरण अर्धभाग । तो आकाशींच ठेवून मग ।
उरल्या अर्धभागाचे विभाग । चतुर्धा केले ॥५८॥
व्यान श्रोत्र वाचा शब्द । हे चहूंसी दिधले प्रसिद्ध ।
व्यान वायुसी दिधला स्तब्ध । श्रोत्र तेजास ॥५९॥
वाचा दिधली आपासी । शब्द दिधला पृथ्वीसी ।
एवं आकाश विभागिलें पांचांसीं । आतां वायु ऐकें ॥६०॥
मन समान त्वचा पाणी । स्पर्श विषय पांचवा मिळुनी ।
वायूच बोलिजे चंचलपणीं । हाही द्विधा केला ॥६१॥
एक भाग अर्धा तो समान । हा वायुंत मौनेंचि ठेवून ।
उरला अर्ध भाग तो विभागून । चतुर्धा केला ॥६२॥
मन दिधलें आकाशासी । त्वचा दिधली तेजासी ।
पाणी दिधला आपासी । पृथ्वीसी स्पर्श ॥६३॥
बुद्धि उदान चक्षु पाद । रूप विषय मिळून पंचविध ।
तेजच बोलिजे तें विषद । हेंही द्विभाग केलें ॥६४॥
एक भागाचा चक्षु तो तेजीं । तेजींचा ठेविला सहजीं ।
अन्य भूतांलागीं विभाजी । उरला अर्ध ॥६५॥
बुद्धि आकाशासी देत । उदान वायूसी समर्पित ।
पाद आपासी अर्पित । पृथ्वीसी रूप ॥६६॥
चित्त प्राण जिव्हा उपस्थ रस । हें पंचविध आप सुरस ।
हें द्विविध करूनि ईश । वांटिता हे ॥६७॥
एक भाग उपस्थ आपाचें । आपामध्येंच ठेविलें साचें ।
येर चार उरल्या भागाचें । वांटी येर चहूंसी ॥६८॥
चित्त आकाशा दिधलें । प्राणासी वायूंत ठेविलें ।
तेजासी जिव्हेसी समर्पिलें । पृथ्वीसी रस ॥६९॥
अहंकार अपान घ्राण । गुद गंध हे पांच मिळोन ।
पृथ्वीचीं असतीं लक्षणें । हेंही द्विविधा केलें ॥७०॥
गंध भाग जो कां असे एक । तो पृथ्वींत ठेवी निश्चयात्मक ।
उरला अर्धभाग जो आणिक । येर चहूंसी वांटी ॥७१॥
आकाशा दिधला अहंकार । अपान वायूंत ठेवी निर्धार ।
घ्राण तेजा दिधलें साचार । आपासी गुद ॥७२॥
एवं एक एक भूत द्विधा केलें । ज्याचे त्यांत एकेक भाग ठेविले ।
येर एकाचे चार चार केले ।
ते ते दिधले येरां भूतां ऐसा भूतकर्दम हा करोनी ।
स्थूळ देहाची केली उभवणी । तेच कैसी अल्पवचनी ।
बोलिजेत आहे ॥७४॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पांचाचे अंश पंचविध ।
पृथ्वींत मिळतां पृथ्वी प्रसिद्ध । स्पष्ट जालीं असे ॥७५॥
हे पांच पृथ्वीसी जेव्हां मिळाले । तेव्हां जडत्वें हे पांच प्रगटले ।
अस्थि मांस त्वचा नाडी रोम जाले ।
स्थूळाचें साहित्य वाचा पाणी पाद उपस्थ गुद ।
हे आपीं मिळतां पांचाचे प्रसिद्ध ।
आप स्पष्ट होऊन सिद्ध । पांच जाले द्रवत्वें ॥७७॥
शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे गुण पंचविध ।
प्रगटले असती प्रसिद्ध । पातळपणीं ॥७८॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हे पांचापासून पांच होऊन ।
तेजामाजीं मिळतां भासकपण ।
पांच प्रकार जाले क्षुधा तृषा आळस निद्रा मैथुन ।
हे तेजाचे पांच अंश पूर्ण । स्थूळीं उमटलें येऊन ।
पंचीकरण होतां ॥८०॥
व्यान समानोदान प्राणापान । हे पांचांपासून पांच होऊन ।
ते वायूंत राहिले असतां येऊन ।
तेणें वायु स्पष्ट जाला तेणें पांच प्रकार चळण वळण ।
प्रसरण आकुंचन निरोधन । हे उत्पन्न होती वायूपासून ।
स्थूळ चळावया ॥८२॥
अंतःकरण मन बुद्धि चित्त । अहंकार हे आकाशीं रहात ।
परी हे पांचांपासून पांच होत । अपंचीकृत पहिलें ॥८३॥
हे पांच आकाशी मिळतां क्षणीं । या पांचांची जाली उभवणी ।
काम क्रोध लोभ मोहपणीं । पांचवें भय ॥८४॥
असो ऐसें पंचीकृत होतां । स्थूलाची उभवणी जाली समस्तां ।
हेंचि माया देवीनें व्यवस्था । ईशसत्ते केली ॥८५॥

मेघ चातकाकरितांच वृष्टी करितो, परंतु तें पाणी सर्वांस मिळतें, तसें शंकराचार्यांचे निरूपण रविदत्ताचे निमित्तानें आहे. तें सर्व अधिकार्‍यांचे उपयोगास येईल. करितां सर्व लोकहो, तें निरूपण ऐका. जसा चातक भूमीवरचा चारा खावयाचा टाकून मेघाकडे पहात असतो, तोच खरा चातक. तसे अधिकारी हो, तुम्ही देहादिक विषय टाकाल तेव्हांच तुम्हांस खरे अधिकारी म्हणूं; व तुम्ही तसें बनाल, त्या वेळीं तुम्हांस वचनाचें रहस्य कळेल. ज्याला या संसारापासून खरे सुटावें असें वाटेल, त्यानें विषयाचा त्याग करावा. मग सहजच त्यास परमार्थ प्राप्त होईल.शंकराचार्य स्वामी,
रविदत्तास वाक्यवृत्तीचें, निरूपण करीत आहेत. त्यांत प्रथम विवेचन घडावें म्हणून देहत्रयाचें कथन श्र्लोकार्थानें करीत आहेत. तो श्र्लोकार्थ हे अधिकारी हो, तुम्ही सावध राहून ऐका.

अस्थिमांसादि पांच मिळोनी । शुक्लितादि मेळविलें पाणी ।
कालवोनि सांदोसांदीं बांधोनी । उभविला गर्भीं ॥८६॥
प्राण संचारे चळण वळण । होतां पूर्ण होऊन पावे जनन ।
पुढें क्षृधातृषादिकें येणें । पोषण होय ॥८७॥
कामक्रोधादि जेव्हां उमटले । तेव्हां देहाचें रक्षण जालें ।
येणेंपरी स्थूल उभविलें । पंचीकृत भूतांचें ॥८८॥
भूतांपासोनि जालें म्हणोनी । भौतिकत्व नाम या लागोनी ।
परी निर्मित जनक जननी । पासाव पुढें ॥८९॥
रक्त रेत मिळतां जठरीं । अवयवें हीं होतीं सारीं ।
उभयांची  सप्तविध जाली परी । सप्तकोशीक देहा ॥९०॥
अस्थि नाडी मज्जा नख । हे पित्याचे साडेतीन सुरेख ।
मांस त्वचा रक्त केश अशेख । मातेच्या रक्ताचे ॥९१॥
या रीतीं हा मांसमय । अन्नापासोनियां होय ।
अन्नेंकडून वांचे उपाय । दुजा असेना ॥९२॥
आणि लय जो होय याचा । तो अन्नरूप पृथ्वींत साचा ।
म्हणोनि कोश बोलिजे वाचा । अन्नमय शब्दें ॥९३॥
असो स्थूलदेह जो ऐसा । आत्मा हाचि होईल कैसा ।
पुढें होईल याचिया निरासा । प्रस्तुत जड सांगितला ॥९४॥
जया वासनेनें स्थूल निर्मिला । कीटकें कवडा जेवीं केला ।
तया वासनारूप वृद्धीला । लिंगदेह बोलिजे ॥९५॥
या लिंगदेहीं कोश तीन । प्राण मन आणि विज्ञान ।
या सत्रा तत्त्वांचें निरूपण । पुढें कीजे ॥९६॥
प्रस्तुत वासनेचें रूप । प्रांजळ कीजताहे अल्प ।
श्रोतीं सावधान साक्षेप । असिलें पाहिजे ॥९७॥
आकाशीं जेवीं वायु चळे । तेवीं ब्रह्मीं स्फूर्ति चंचळे ।
समाष्टितादात्म्यें तयेशीं निवळे । माया नाम ॥९८॥
तेचि व्यष्टींत विभागली । एका पिंडीं तादात्म्य पावली ।
अभिमान माथां घेऊन बैसली । तिहीं अवस्थांचा ॥९९॥
दों अवस्थेंत कर्में घडतीं । ते म्यां केलीं असतीं निश्चितीं ।
तेचि भोगीन पुढता पुढती । तेचि वासना ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP