मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २०१ ते २५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०१ ते २५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


गंधामुळें पृथ्वी जाली । पृथ्वींत गंधता उमटली ।
यास्तव पृथ्वी हें नाम पावली । गंध विषय तन्मात्रा ॥१॥
आकाशीं अवकाश धर्म । सच्छिद्रता असे कर्म ।
शब्द गुण हा असे नेम । त्यापासून वायु ॥२॥
शब्द स्पर्श वायु द्विगुण । धर्म जयाचा चंचळपण ।
कर्म हेंचि सर्वत्रीं विहरण । त्यापासाव तेज ॥३॥
शब्द स्पर्श रूप त्रिगुण तेज । दहन-धर्म हा सतेज ।
पचन-कर्म हें असे सहज । त्यापासून आप ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस गुण । द्रवत्व धर्म आपीं संपूर्ण ।
क्लेदनत्व कर्म हें गहन । त्यापासव पृथ्वी ॥५॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पांचही पृथ्वींत प्रसिद्ध ।
कठिण धर्म हा विशुद्ध । धारणा कर्म ॥६॥
एवं तन्मात्रासहित भूतें । तमोगुण द्रव्यशक्ति जे ते ।
हेंचि स्थळ रहावया चराचरातें । त्रिभुवनात्मक जालें ॥७॥
ऐसी ये भूततमाची उत्पत्ति । सांगितली अल्प रीती ।
भूत रजसत्वाची जी जी होती । ती सांगितली मागां ॥८॥
जो लिंगदेह सत्रा कळांचा । मागें विस्तार बोलिला त्याचा ।
तेवीं प्रकार पंचीकरणाचा । बोलिला असे ॥९॥
पंचीकृत स्थूळदेहाची । उभवणी केली चैखाणींची ।
त्यांत लिंगदेह प्रवेशतांची । चळण होतें जालें ॥२१०॥
परीं इतुकें जें उत्पन्न जालें । तितुकियासी दोन कारणें आथिलें ।
नेणीव तादात्म्य चैतन्य बोलिलें । तें उपदानकारण ॥११॥
उपादान म्हणजे त्याचेंच जालें । होऊन त्यामध्येंच वर्तलें ।
शेवटीं अज्ञानीं लया गेलें । रज्जु सर्पापरी ॥१२॥
कोणी म्हणेल ब्रह्माचि कारण । तरी तें शुद्ध विकारी नव्हे पूर्ण ।
तेथेंचि वाउगें उठे जें अज्ञान । त्यासह कारण बोलिजे ॥१३॥
जेवीं रज्जूच एकटी सर्पासी । कारण नव्हे निश्चयेंसी ।
न कळणें मिळतां तयासी । प्रयोजन सर्पा ॥१४॥
तैसेंचि अज्ञानसह अधिष्ठान । जगासी उपादान कारण ।
आणि विद्येसहित आभास ईशान । निमित्त कारण असे ॥१५॥
निमित्त म्हणजे मात्र ईक्षण । इच्छेसरिसें होय निर्माण ।
एवं गुणादि देहांत जें उत्पन्न । ईशें केलें ॥१६॥
विद्या अविद्या प्रतिबिंबें दोन । जें मागें सांगितलें लक्षण ।
परी प्रवेश नसतां भिन्न भिन्न । नसती किंचित् ॥१७॥
ऐसे उभयतांही आभासपणीं । येकत्रचि असतां दोन्ही ।
प्रवेशकाळीं अज्ञान घेऊनी । प्रवेशला पिंडीं ॥१८॥
एवं ईक्षणादि प्रवेश अंतीं । इतुकी ईशें केली उत्पत्ति ।
प्रवेशानंतर जीवकृति । होती जाली ॥१९॥
स्थूळ देह हाचि घट । लिंगदेह पाणी हें दाट ।
त्यांत जीव प्रतिबिंब अवीट । लिंगदेह जोंवरी ॥२२०॥
अज्ञानसहित जीव आभास । देह द्वयांत याचा प्रवेश ।
हाच पिंड तादात्म्य सावकाश । घेऊन बैसला ॥२१॥
मुळीं अहंब्रह्म जे स्फूर्ति । ज्ञानाज्ञानात्मक होती ।
ते स्पष्ट जालीं प्रवेशांतीं । देहामाजीं ॥२२॥
ते स्फुर्ति निजरूपा विसरली । पुढें जालें तें पाहों लागली ।
तेचि विक्षेपशक्ति बोलिली । वासनात्मक ॥२३॥
त्या वासनेचे सत्रा प्रकार । पूर्वीं सांगितला विस्तार ।
तया लिंगदेहाचें बिढार । तो स्थूळ मांसमय ॥२४॥
एवं वासनेंत जें प्रतिबिंबलें ं चैतन्य जें त्यास जीव नाम आलें ।
तें देहद्वयासी पाहों लागलें ।
परी विसरलें निजरूपा सर्प जेवीं भाविला असतां ।
रज्जूचें न कळणे जालें चित्ता ।
तेवीं देहद्वय स्फुरूं लागतां । अज्ञान जालेंसें कल्पावें यासि
कार्यानुभेव म्हणावें । कीं कार्य देहद्वयास्त्व कल्पावें ।
येऱ्हवीं अज्ञानारूप नव्हे । अभुकसें म्हणून ॥२७॥
ते सत् म्हणों तरी ज्ञानें नासे । असत् तरी कार्य दिसे ।
असो अनिर्वचनीय जें ऐसें । तें कारण शरीर ॥२८॥
देहद्वयाचें उत्पत्तिस्थान । या हेतु म्हणावें कारण ।
नाश पावत असे म्हणोन । शरीर बोलिजे ॥२९॥
परी हा देह कल्पूं नये । देह पाहतां असती द्वय ।
स्थूळदेह हा बिढार होय । सूक्ष्म व्यवहारात्मक ॥२३०॥
एवं स्थूळ सूक्ष्म कारण । जीवासहित हे तीन ।
निजरूपीं उपाधी उत्पन्न । जाहली असे ॥३१॥
रविदत्ता तूं म्हणसी ऐसें । जे हे उपाधि जाली असे ।
यांत मुख्य निजरूप नसे । तरी अवधारीं ॥३२॥
घट गाडगें जें जें निर्माण । तें तें व्यापून असे गगन ।
तैसें स्फुरणादि देहांत संपूर्ण । व्यापून ब्रह्म असे ॥३३॥
सच्चिदानंद ब्रह्मघन । तेंचि अस्ति भाति प्रिय पूर्ण ।
ऐसीं तिन्ही जीं लक्षणें । येथें प्रगट असतीं ॥३४॥
अस्तित्व मायेनें लोपवावें । तरी कासयावरी प्रगटावें ।
चिद्रूप आच्छादावें । तरी व्यवहारावें कैसें ॥३५॥
सुखमात्र आच्छादिल्या ऐसें । वाटे परी तेंही आच्छादिलें नसे ।
जरी आच्छादिलेंच तरी होतसे ।
आवडीचें भान केवीं घटीं जेवीं आकाश व्यापलें ।
तेवीं पिडीं ब्रह्म पूर्ण दाटलें । जयावरी सर्व हे कल्पिलें ।
तें अस्तित्वरूप ॥३७॥
जयाचिया भासा भासती । तोचि आत्मा साक्षी चिन्मूर्ति ।
निर्विकारत्वें असंग स्थिती । उपाधिमाजीं असे ॥३८॥
सर्व प्रियता जयासाठीं । तेचि सुखरूपता गोमटी ।
एवं तिन्ही लक्षणें उठाउठी । अस्ति भाति प्रियता ॥३९॥
यांत सद्रूप आनंदरूप दोन । याचें पुढें असे विवेचन ।
प्रस्तुत आतां चिद्रूप पूर्ण । बोलिजे अल्प रीतीं ॥२४०॥
मुळीं अहंब्रह्म जे स्फुरण । विद्याविद्यात्मक शक्ती दोन ।
हे जयाच्या भासा भासमान ।
तो साक्षि बोधरूप आत्मा जयेसी वासना हें अभिधान ।
जयेतें वृत्ति नाम अंतःकरण ।
हे जयाच्या भासा भासमान ।
तो साक्षि बोधरूप आत्मा मन बुद्धि चित्त अहंकरण ।
आणि तेथें उमटले त्रिगुण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥४३॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । वाचादि क्रिया आदिकरोन ।
हे जयाच्या भासा भासमान ।
तो साक्षि बोधरूप आत्मा हस्तपादादि मस्तक संपूर्ण ।
गोलकादि नख शिख निर्माण ।
हे जयाच्या भासा भासमान ।
तो साक्षि बोधरूप आत्मा हा इतुका समुदाय उत्पन्न ।
जितुका जड चंचळ संपूर्ण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥४६॥
इतुकियांची क्रिया जे जे होणें । आणि पंचविषय तमोगुण ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥४७॥
विषयांत स्फुरणापासोन । उत्पत्ति स्थिति लय होणें ।
हे जयाच्या भासा भासमान । तो साक्षि बोधरूप आत्मा ॥४८॥
लयही जो सर्वांचा पाहे । ऐसी देखणी दशा आहे ।
द्रष्ट्याचे दृष्टीचा नाश नव्हे । कवणेही काळीं ॥४९॥
सामान्यत्वें सर्वां प्रकाशित । उत्पत्ति स्थिति जो भासवित ।
आणि लय जाणोनि तिष्ठत । जैसा तैसा ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP