मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या ७५१ ते ८००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


लय सामान्यत्वें देखिला । होता तो उत्थानीं आठविला ।
तस्मात् नेणिवेचा अनुभव घेतला । शुद्ध साक्षिज्ञानें ॥५१॥
म्हणसी सर्वांचा होता । साक्षीचा लय होय त्या सहिता ।
तरी साक्षीच्या लयाचा पाहता । असे कोण साक्षी ॥५२॥
असाक्षी कीं लय मानूं नये । हें सत्य यथान्यायें ।
मागुतीं म्हणसी कीं सर्वांचा क्षय । जालया साक्षी कोण ॥५३॥
तरी पाहे शुद्ध साक्षी ज्ञान । सर्वांचा लय पाहे आपण ।
तस्मात् सर्वांचा लय जो होणें । हे अन्यथा नव्हे ॥५४॥
जैसा सर्वांचा लय साक्षी जाणे । म्हणून सत्य सत्य सर्वां लय होणें ।
तैसा साक्षीचा लय पाहिला कोणें । हें बोले विचारूनी म्हणसी सर्वांचा लय अनुमानिला ।
तेवींच अनुमानाचा साक्षी निमाला तरी जैसा सामान्य साक्षी उरला तैसा उरे कोण दीप नेत्र दोन्ही मिळतां ।
पदार्था देखतसे समस्तां । त्यांतील दीप जरी मावळता ।
तरी डोळा देखे अंधार ॥५७॥
अंधार नेत्रें देखिला । म्हणोनि सत्य दीपाचा लय जाला ।
तैसा डोळा जरी असे गेला । तो देखिला कोण ॥५८॥
तथापि लय जो साक्षीचा । मानिसी अनुमानें साचा ।
तरी साक्षी जो अनुमानिला । साक्षीचा । तो हाच कीं दुजा ॥५९॥
डोळिया लय डोळा देखे । कीं दुजा डोळा लया ओळखे ।
तेवीं साक्षीचा लय साक्षी निरखे । कीं चिद्रूप दुसरें ॥७६०॥
साक्षीचा लय साक्षीनें देखिला । तरी आपणा देखतां आपण मेला ।
कीं डोळाचि पाहे डोळा गेला । हा तो असंभव ॥६१॥
दुसरिया ज्ञानें हें ज्ञान । निमालें म्हणतां तें ज्ञान कोण ।
डोळा गेला तो पाहे अन्य । डोळियानें तो डोळा कोणता ॥६२॥
तस्मात् ज्ञानही दुसरें नाहीं । कीं ज्ञान लया होय गाही ।
डोळाचि दुसरा नसे कांहीं । कीं डोळा गेला देखे ॥६३॥
ऐसिया विरोधामुळें पाहतां । साक्षीचा लय नसे मानितां ।
म्हणोनि साक्षीज्ञान असे तत्त्वतां । लयकाळीं लयसाक्षी ॥६४॥
मागुतीं म्हणसी कीं लय नव्हे साक्षीचा । परीं अनुभव कां नसे तयाचातरी सांग बापा अनुभव नेणिवेचा ।
कोण घेतला हे म्यां नेणीव असे पाहिली । म्हणसी जरी ऐसिया बोली ।
तरी नेणीव जे तुवां देखली । आपुली कीं पराची सांग ॥६६॥
हा अन्य गृहस्थ असे निजला । जडत्वें घोरतसे उगला ।
तरी त्याचा तुला अनुभव जाला । कैसा तो नकळे ॥६७॥
अरे पराचें जागें असतां मन । काय कल्पितें न कळे पाहून ।
मा निजेल्याचें नेणिवेचें ज्ञान । तुज जालें हा असंभव ॥६८॥
आतां म्हणसी नेणीव आपुली । झोपेमाजीं प्रत्यक्ष पाहिली ।
तरी पाहे पाहे गोष्ट साधली । आमुच्या पक्षाची ॥६९॥
तुवां वृत्ति समूळ नसतां । आपुली नेणीव पाहिली म्हणतां ।
अनुभवून कीं होसी बोलतां । हा अनुभविता साक्षी ॥७०॥
अरे ऐसा टळटळीत अनुभव । लय साक्षी हा स्वयमेव ।
तयासी कोठें असे नेणीव । नेणिवेचा प्रकाशक ॥७१॥
लय काळींही जया ज्ञानाचा । नाश नाहीं प्रकाशाचा ।
जागृतीं स्वप्नीं तो अभाव तयाचा । नाहींच नाहीं ॥७२॥
एवं तिहीं काळींही नासेना । हेंचि सद्रूपत्व असे ज्ञाना ।
सद्रूप तेंचि चिद्रूप आपणा । आत्मयाचें सिद्ध ॥७३॥
जैसें सद्रूप चिद्रूप आत्मयाचें । असे तें निरोपिलें वाचें ।
आतां तिचें लक्षण कां साचें । तें प्रियत्व बोलिजे ॥७४॥
मागें मिथ्यात्मा गौणात्मा । निषेधून जो कां मुख्यात्मा ।
तो आवडता प्रत्यगात्मा । अव्यभिचारें बोलिला ॥७५॥
तोचि आत्मा सुषुप्तीमाजीं । सुखरूप जैसा असे सहजीं ।
तोचि बोलिजे जेथें दुजी । अनुभववृत्ति नसे ॥७६॥
जागृतिमाजीं सुखःदुख होणें । तें एका संकल्पाच्या गुणें ।
तेवींच स्वप्नींही सुखःदुख देणें । संकल्पमात्रें ॥७७॥
झोपेंत संकल्पचि निमतां । सुखःदुखाची नुरे वार्ता ।
तस्मात् सुखःदुखेंचि नसतां । तत्त्वतां निजसुख ॥७८॥
जें सुख वृत्तींत उपत्न्न होणें । तयासी नाश होय श्रुति म्हणे ।
जें उद्भवेना असे सहजपणें । या नांव निजसुख ॥७९॥
तया सुखासी घेईना वृत्ति । म्हणून नोहेचि अनुभूति ।
परी अनुभाव्यरूपी चिन्मूर्ति । आहे तैसा असे ॥७८०॥
आहेपणा तेंचि चिद्रूप ज्ञान । तोचि आत्मा आनंदघन ।
हीं तिन्हीही ब्रह्मलक्षणें । एकत्र असती ॥८१॥
येथें रविदत्ता मानिसी ऐसें । की जडासी सुखःदुखही नसे ।
आणि आहेपणा तो तेथें वसे । तरी असे जडत्वीं सुख ॥८२॥
काष्ठ पाषाण मृत्तिका । येथेंचि आनंद असे निका ।
तरी याचें उत्तर ऐका । बोलिजेत असे ॥८३॥
जडीं सुखदुःखाचा अभाव । म्हणणें हाचि कीं असंभव ।
जें जें उत्पन्न जालें रूपनांव । जड कीं चेतनविकार ॥८४॥
विकारी म्हणजे उत्पन्न जालें । जालें ते वाईट कीं चांगुलें ।
तयासी सुखदुःख नाहीं वाटलें । परी सुखदुःखरूप ॥८५॥
फोडिती तोडिती फेंकिती । एक स्थानीं ठेऊन पूजिती ।
हीं काय तेथें तुज न दिसती । सुखें आणि दुःखें ॥८६॥
तथापि सुखदुःखें तेणें । अनुभविलीं नाहींत मानिसी मनें ।
तरी निजसुखही असे कवणें । रीतीं तेथें ॥८७॥
तेथें सुख आहे तें तुज कैसें । कळलें तें सांग पां आपैसें ।
तेथें हर्ष किंवा ग्लानि दिसे । अनुमानाजोगें ॥८८॥
म्हणसी निजेलिया कोणतें चिन्ह । कीं सुख आहे करावा अनुमान ।
तरी पाहें त्याचें मुख विकासमान । हर्ष खेद नसतां ॥८९॥
तस्मात् सुषुप्तीमाजीं निजानंद । वृत्तिवीण सुखाचा कंद ।
जरी नसतांही हर्ष खेद । सुख तेथें नसे ॥७९०॥
तथापि सुख आहेच म्हणसी । तरी कोण पावे तयासुखासी ।
मिळणी होतां सुख समरसीं । जीव हा सुखी होय ॥९१॥
हा अनुभव सर्वत्रांचा । सुखींच विश्रामती साचा ।
उत्थानीं बोलताती वाचा । कीं काय हो सुखी होतों ॥९२॥
जरी कोणें बळें उठविलें । तें वैरियापरी वाटतें जालें ।
आहा महत्सुख होतें तें गेलें । तेव्हां तळमळी ॥९३॥
उठलिया क्षणभरी । त्या सुखाचि येतसे लहरी ।
पुढें मग येतसे जागरीं । हळूहळू व्यापारा ॥९४॥
आहेपणा तेथें सुख असे । मानिलें जें तुवां मानसें ।
परी जेथें विकार हा उमसे । सुखदुःखाचा ॥९५॥
तेथें आनंद हा लोपत । सुखदुःखेंचि होऊनि निभ्रांत ।
मग असो कोणतीही वस्तुजात । जड कीं चेतन ॥९६॥
जैसें विकार सुषुप्तीमाजीं । सुखःदुखरूप नसती दुजी ।
केवळ निजसुखचि सहजीं । असे तैसें आहे ॥९०॥
अणीक येक करिसी कल्पना । शय्यादि असती सुखसाधना ।
परी ते आरंभी मात्र वृत्तीचे ग्रहणा । होय कीं मी एक सुखी परी गाढ जेव्हां झोंप लागली ।
मग त्या सर्वां वृत्ति विसरली ।
एक निजसुख मिळणी जाली । तेव्हां शय्यादि सुख कैचें हे असे मृदु अस्तरणें ।
झोंप येतां कठिणही न म्हणे । जेथें पाहिजे तेथें पडणें । विश्रांति घ्यावया ॥८००॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP