TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
दगड मोगरीमधे सापडे सोड ना...

जय मृत्युंजय - दगड मोगरीमधे सापडे सोड ना...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


दगड मोगरीमधे सापडे
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ।
धरा मृत्युने जसे कुटावे तंतु जीवनाचे ॥धृ०॥
जुटला बंद्यांचा संघात्  ठेका धरुनी चाले हात
आघातावरती आघात्
पिंजुनि बनता सळ, आवळती दोर त्या सळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥१॥
दिनभर चाले काथ्याकूट पुरी भरे तंतूंची फूट्‍  
तेव्हा शिक्षेमधुनी सूट्‍
अमिष तेवढे पुरते वाटे दंडिता फळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥२॥
सडके तुटके फुटके दोर्
नवे व्हावया पुन्हा समोर्
पुन्हा साहती घाव कठोर्
येई नवता, तंतू वळतां तेज ये बळाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥३॥
पंचमहाभूतांची खाण्
जीवतंतु करते निर्माण्
विणते आयुष्याचा ताण्
सडे ताण अन् करी वेगळे मृत्यु तंतु त्याचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥४॥
विलीन होता पंचत्वांत्
तंतू पुन्हा रुप घेतात्
नियतीचा जै फिरता हात्
आयुष्याची वटी बने ते जिणे मानवाचे ।
दगड मोगरीमधे सापडे सोड नारळाचे ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:51.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

समक्षासमक्ष

  • prep  Before or in presence of. 
  • f  Presence. 
RANDOM WORD

Did you know?

What is Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.