मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
अनभिषिक्त नृप अंदमानाचा म...

जय मृत्युंजय - अनभिषिक्त नृप अंदमानाचा म...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


अनभिषिक्त नृप अंदमानाचा मार्ग दाखवी दल चाले ।
हिंदु राहिला हिंदू म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥धृ०॥
अंदमानचा कारावास् ।
एकलकोंडीमधे निवास् ।
कदन्न, कोंडा त्याचा घास् ।
परंतु राही बुद्वि विचक्षण मनश्चक्ष भंवती हाले ।
हिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥१॥
घाम गाळतो निढळाचा ।
फिरवी घाणा तेलाचा ।
बैलांनी फिरवायाचा ।
केले गोळा घाण्यामधले समधर्माचे मतवाले ।
हिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥२॥
राज्य पठाणी जणु होते ।
भिंतीच्या आधाराते ।
धर्मांतर लादायाते ।
हिंदु नृपाच्या परंतु वाचें दीनांनाही बळ आले ।
हिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥३॥
अन्यायाच्या निवारणी ।
विषम शक्तिच्या उभ्या रणी ।
संपाची हो उभारणी ।
शिर फुटले परि भिंतहि फुटली रक्ताला त्या फळ आले ।
हिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥४॥
साक्षरतेचे दिले धडे ।
हिंदीचे प्रांगण उघडे ।
शुद्वीची वहिवाट पडे ।
झाले भारत-भाग बेट ते भारतभूकी जय बोले ।
हिंदु राहिला हिंदु म्हणुनी तिथे भारतध्वज डोले ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP