TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
राजा लंडनमधुनि चालवी हिंद...

जय मृत्युंजय - राजा लंडनमधुनि चालवी हिंद...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


आव्हानाया रिघे विनायक
राजा लंडनमधुनि चालवी हिंदुभुमिशासना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥धृ०॥
देशांत आपल्या उच्च परीक्षा दिली ।
सन्मान्य शिवाजी शिष्यवृत्ति मिळविली ।
ठेविली मनी अन् शिवबाची साउली ।
सागरपृष्ठावरी आंखली स्वारीची योजना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥१॥
क्रांतीचे रुजले बीज तेथ सत्वर ।
वाढले रोप, रक्षणा हात कणखर ।
त्या हातामागे निष्ठा बलवत्तर ।
जमली सेना विद्यार्थ्याची देशाच्या मोचना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥२॥
भारतांत घडले संगर सत्तावनी ।
स्मरणार्थ साजरे केली एकावनी ।
आंग्लभू हदरली, चिंतित झाली मनी ।
शत्रूच्या गोटांत विनायक ठाके आयोधना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥३॥
अन् एके दिवशी थरारली ही धरा ।
बलिदान करितसे मदनलाल धिंगरा ।
ठेवण्या वाहता रिपुरक्ताचा झरा ।
घ्या उसंत ऐकया त्याची मातृभूमि वंदना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥४॥
शमविण्या क्रांतिला इंग्रज सत्तापती ।
क्रांतिच्या नायका श्रृंखलांत बांधती ।
कोंडती वीज या ज्वालामुखी झाकती ।
केले दृढ मन तयें भोगण्या अंधारी यातना ।
आव्हानाया रिघे विनायक रिपुच्या सिंहासना ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:40.6230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शोभा

  • ना. आरास , थाट , दर्शनीय , दिमाख , देखणेपण , सजावट , सुंदरता , सौंदर्य , सौष्ठव . 
  • f  Beauty, comeliness, grace; lustre. 
  • शोभा करणें Adorn, ironically; i.e. disgrace or dishonour. 
RANDOM WORD

Did you know?

विवाह जमवतांना गुणमेलनाचे महत्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site