TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
स्वातंत्र्याच्या वीरा आम्...

जय मृत्युंजय - स्वातंत्र्याच्या वीरा आम्...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


तुझें रे कळलें जीवनसार
स्वातंत्र्याच्या वीरा आम्हां कळले जीवनसार ।
तुझे रे कळले जीवनसार ।
तव नवजन्मी पाहशील तूं स्वप्न तुझे साकार
भारती स्वप्न तुझे साकार ॥धृ०॥
तेजस्वीचें तेज तूं स्वतां ।
धर्मक्षेत्री कृष्ण भारता ।
द्रष्टा, गीतेचा उद्गगाता ।
आम्ही ठेवूं जागृत गीता करण्या आत्मोद्वार
तुझे रे कळले जीवनसार ॥१॥
रुद्रांमध्ये असशी तुं हर ।
आयुधांतला वज्र भयंकर ।
क्रांतिकारकांचा सावरकर ।
देशाचा अनु-रेणु-रुप तूं, राष्ट्राचा ओंकार
तुझे रे कळले जीवनसार ॥२॥
राष्ट्राने द्यावे तुज वंदन ।
असा तुझा तत्त्वार्थ चिरंतन ।
देशासाठी होतां मंथन ।
होइल पश्चिम, पूर्वा, दक्षिण, उत्तरभर विस्तार
तुझे रे कळले जीवनसार ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:02:10.4830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

माळ तुटली, कटकट मिटली

  • माळकरी हा व्रतस्थ असतो. त्याच्या गळयांतील माळ तुटल्यास त्याच्या मागचें नियमांचें लचांड सुटलें असें होतें 
  • यावरुन मोकळें होणें 
  • निर्बेध नाहींसे होणें. 
RANDOM WORD

Did you know?

घरातील देव्हारा पूर्व पश्चिम कां ठेवतात, इतर दिशा कां वर्ज्य?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.