TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे|
तडितरुप योद्वा कडाडला झगम...

जय मृत्युंजय - तडितरुप योद्वा कडाडला झगम...

गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.


तडितरुप योद्वा कडाडला
तडितरुप योद्वा कडाडला झगमगाट झाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥धृ०॥
वाटत होते नाशिक नगरी
निर्मल सरिताप्रवाहापरी ।
सत्ता परकी सुखकर पावन
शांत सौम्य जिथले होते जन ।
अस्थिर आवृत्त शांति असे ती दिसले देशाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१॥
राज्य इंग्रजी चालवावया
महती परक्यांची पटवाया ।
प्रभागधिपति होता जँक्सन
उत्कर्षाचे जणु आश्वासन
स्वत्वाचे सामर्थ्य कथाया तदा इंग्रजाला ।
अनंत जीन जाळी जाई ज्योति अनंताला ॥२॥
म्हणती जँक्सन होता पंडित
होता संस्कृत भाषामंडित ।
आणि मराठी व्याख्यानांतून
राज्य करी तो लोकां भुलवुन ।
सर्व न भुलले ! होते कांही विटले दास्याला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥४॥
किर्लोस्कर संगीत मंडळी
लोकप्रियतेवरी चालली ।
तेथे विजयानंद मंदिरीं
खेळ शारदा संपन्न करी ।
विजयाचा आनंद मिळे त्या दिनीं भारताला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥५॥
बघू शारदा गंधर्वाची
गोडी चाखू संगीताची ।
अभिलाषा अधिकारी वदता
नाटय ठाकले उभे स्वागता ।
सत्य परंतू होते टपले तया ग्रासण्याला
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥६॥
आणि निवडला नाटयासाठी
दिवस जयाची रजनी मोठी ।
अभ्यागत आले नि घेतले
आसन पहिल्या आवलींतले
चिरनिद्रेचा दूत चिकटला तया आसनाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥७॥
विधिक्रमाने कोणी बालक
वाढत होता अनंत नामक ।
तेजाचा तो अंश झाकला
मिळू बघे उडुनि तेजाला ।
बाल वाढला झाकण फुटले अंश मुक्त झाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥८॥
अनंत, कर्वे कृष्ण, विनायक
देशपांडियांचा स्थिर बालक ।
निघती नाटक बघण्या अथवा
युद्वयोग दाखवाया नवा ।
विद्युत्वेगे भिडले जाउन दुष्ट पाहुण्याला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥९॥
अनंत सांभाळी शस्त्राला
नेम साधुनी प्रहार केला ।
पुन्हा पुन्हा तै चाप ओढला
सात छ-यांनी जँक्सन मेला ।
शैलापरि बटुमूर्ति वाढली ! भिडली गगनाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१०॥
भूंकपाविण भूमि शहारे
धक्क्याने इंग्लंड बावरे ।
भारतीय इतिहासामधलें
पान लोहिताने लिहिलेले ।
वाचुनि बघती अन् ओळखती क्रुद्व भारताला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥११॥
त्रैमूर्तींना आरक्षींनी
अन्य जनांच्या सवे घेरुनी ।
कारागारामध्ये लोटले
छळुनी लोखंडांत बांधले ।
परी वीर ते, वीरपुत्र ते, बघतील कशाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१२॥
न्यायाची मग बसली बैठक
अभियोजक सांगती कथानक ।
न्यायमूर्ति ? छे: दंडसभापति
त्रैमूर्तीच्या प्राणां हरती ।
जीवित राही परी चेतना देश-मोचनाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१३॥
एकोणिसशे दहाची मिती
एकोणिस एप्रिलची होती ।
अनंत, कृष्णा आणि विनायक
उत्सुक होण्या स्वर्गारोहक ।
ठाणे कारा-तीर्थ, स्थानक असे स्वराज्याला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१४॥
स्मरता भावे त्रैमूर्तींना
कधी मृत्युचे भय राहीना ।
हौतात्म्याची गाता कवने
रोम रोम भरतो स्फूर्तीने ।
प्राणपणाने हटवू आम्ही परक्यांचा घाला ।
अनंत जीवन जाळी जाई ज्योति अनंताला ॥१५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-02-12T21:01:45.2330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

fatigue in metals

  • धातू शीणता 
RANDOM WORD

Did you know?

कांही धर्मात प्रेताचे दहन तर कांहीत दफन कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site