TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
कालाच्या चढुनी श्रमें-

कालाच्या चढुनी श्रमें-

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कालाच्या चढुनी श्रमें-

कालाच्या चढुनी श्रमें वरिवरी चौर्‍यायशी पायर्‍या

अत्युच्चीं नर पायरीवरुनि जो ढुंके न मागें पुन्हा,

कोट्यादी तपुनी तपें करुनिया वातांबुपणार्शना

जो स्वर्गी चढला, बघे तिथुनिया खालील काळ्या दर्‍या,

 

सेवी जो अमरांगनासवसुखा गंधर्व कीं किन्नर !

तेजाचा पुतळा अहा ! प्रभुसभासद्रत्‍न जो मोहक !

आकाशीं शशिच्या प्रकाशिं शयनीं स्वप्नांत तो तारक

हुंगे मात्र मनें अनीतिमदिरादुर्गंध ये जो वर -

उन्मादे शिर तें फिरे गरगरा, काळोख नेत्रां मग,

कोठे कोण न त्या सुचे, डगमगे, हाले, झुले, घेर ये.

येई लोळ झळाळुनी तनुंतुनी, पुण्या पिटाळी अघ,

हा हा हा ! पडला कडाडुनि कुठे ? पाडी जगाही स्वयें.

 

"झाले लोचन लाल, काल जळलें कोठे कुणाचें घर ?"

ठावा मी असुनी प्रिये, पुसशि हें ? कां कोप ? हा मत्सर !

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार - सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - देवास

दिनांक - १ ऑगस्ट १९०३


Last Updated : 2012-10-11T13:13:44.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोंध

  • स्त्री. १ ( राजा . ) गुंतवळ . २ ( ल . ) गोंधळाचें , जिकीरीचें काम ; भानगड . 
  • पु. १ चीक ; डिंक ; हा बाभळ , खैर इ० झाडांच्या चिकापासून निघतो . अरबीगोंद हा सर्वात चांगला असतो . रंग , चिटें छापणें , चित्रें इ० कामीं हा उपयोगी आहे . याचे लाडू फार पौष्टिक असतात . २ सरस ; चिकट पदार्थ . [ हिं . ] 
  • ०दाणी दानी - स्त्री . गोंद ठेवण्याचें पात्र ; डिंकदाणी ; डिंकपात्र . 
  • ०शर्करा ( रसा . शाप . ) डिंकापासून होणारी साखर ( इं . ) अर्बिनोस . गोंदाम्ल - न . डिंकापासून होणारें अम्ल . ( इं . ) अरेबिक अ‍ॅसिड . 
RANDOM WORD

Did you know?

Is there any reference in Vedas or puranas for eating non-veg food?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.