TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
शैशवदिन जरि गेले निघुनी

शैशवदिन जरि गेले निघुनी

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


शैशवदिन जरि गेले निघुनी

शैशवदिन जरि गेले निघुनी

निर्मळ किति तरि ती शिशुहूनी !

छबि जरि खुलली नसांनसांतुनि

ह्रदय विशुद्ध अती. १

मास दिवस सुखिं भितचि लोटतां

होइल विकसित रति मनिं आतां;

गुलाब उकली ह्रन्मधु, स्वता

वसंतमृदुकिरणीं २

ऐसें वाटे आम्हांला जरि

तरी हरीची रचना दुसरी;

दिव्य नभोज्योति ती सुंदरी

केवि धरेस पचे ? ३

बाल्यदशाचि न जोंवरि सरली

तोंचि अहा अंतर्हित झाली !

हाय हाय ! ती गेली गेली !

काय अतां उरलें ? ४

घनपल्लवयुत तरुराजींतुनि,

पक्षिगानही जातें लोपुनि,

मधुर हास्यही वदनावरुनी

याचपरी वितळे. ५

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - अंजनी

ठिकाण - इंदूर

दिनांक - २१ मे १९०३


Last Updated : 2012-10-11T13:13:39.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेवाळी

  • पु. न . स्त्री . १ पाण्यावर किंवा ओलसर जागेंत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती . २ पाण्यांत उगवणार्‍या शेवाळीसारख्या कांही झुडुपांस सामान्य नांव उदा० हड , गोंडाळ , नीळ . [ सं . शैवाल ; बं शेयाला ; हिं शेवाल ] शेवाळणें - अक्रि . १ शेवाळीने युक्त होणे ; शेवाळ उगवणे ; ( दात ) बुरसणे ; बुरशी येणे . २ ( ल . ) गुबगुबीत होणें ; गोंडस दिसू लागणे ; पोसणे ; पुष्ट होणे . शेवाळें - न . शेवाळाचे लांब तंतु . - वि . शेवाळलेले ; शेवाळीने युक्त . तें पंचक्रोश होते शेवाळे । म्हणोनि शंभु स्थापिला स्वलीळें । - कथा २ . १६ . १२६ . 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.