मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
प्रणयवंचिताचे उद्गार

प्रणयवंचिताचे उद्गार

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


तुज खेळ वाटली प्रीति मना रे वेद्या,

हो अतां तरी खातरी ? जाशि वाटे त्या ? ध्रु०

हो झुंजुमुंजु ती कोठे जैं उशा

तार्‍यांस दाविं मी बोटें दश दिशा'

मिळतील, न वाटे खोटें- किति नशा !

कुणिकडे दडाले पुढें हिर्‍यांचे खडे नभांतुनि सार्‍या ? १

हो उषा प्रखर मध्यान्ह, कुठुनि समजाया ?

मृदु वसंत जैं आयूचा झळकला,

गुल्जारचि सर्व बगीचा भासला,

मग बहारचि गुलाबाचा देखिला.

रे, जरी भरारी पुरी मारिलिस तरी हाय तें वाया !

रखरखित उन्हाळा होय, उरति कांटे त्या. २

झळझळित हिरे ते डोळे पाहुनी

दोल्यांत सुखाच्या डोले मन मनीं,

उरिं धरिन म्हणे मन भोळें फणिमणी

भ्रम भरे अरेरे ! हिरे हलाहल खरें ! कुठुनि समजाया ?

पळ सुटे विकारा उग्र पाहतां सत्या. ३

चंचले विजे गे पोरी निर्दये,

केलीस मनाची चोरी निर्भये,

सरि दिसे गळां परि दोरी कळुनि ये.

हा ! परी कडाडुनि वरी प्रगटलिस खरी, ठार केलें या !

हा ! काय फायदा अतां कळुनि तुझि माया ? ४

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - प्रीतिखेल

ठिकाण - इंदूर

दिनांक -२५ जुलै १९०३

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP