मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|कृष्णचरित्र| १५१ ते १६० कृष्णचरित्र ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४० १४१ ते १५० १५१ ते १६० १६१ ते १६७ अभंग - १५१ ते १६० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - १५१ ते १६० Translation - भाषांतर १५१मोडियेला धनुर्याग । हाहाकार झाला मग । आला आला रे श्रीरंग । बंधू बिळिरामा समवेत ॥१॥आले ग्रामव्दारापाशीं । धांविले सकळहि नगरवासी । कृष्णरामाच्या सौंदर्यासी । पहावया उतावेळ ॥२॥उभयतांचेहि स्वरुप अति नागर । ऐकिलें होतें वारंवार । आणि बळियेहि महावीर । तेज प्रतापी आगळे ॥३॥सदा निर्भय मानसीं । आले चौबारा हाटवटिसी । जेवीं कां सिंह गजशाळेसी । शिरतां शंका न धरिती ॥४॥उभे रंगशिळेवरी । अवलोकिता नरनारी । चढोनी माडिया गोपुरीं । गवाक्षव्दारीं पैं एकी ॥५॥एके चढली भिंतीवरी । एक सन्मुखची शेजारीं । कृष्णदर्शनी आवडी भारी । नर बाळा नारी सारिखीचि ॥६॥निळा म्हणे हत्कमळवासी । पूर्णब्रम्ह तेजोराशी । सगुणरुपिया हशिकेषी । कोण मा तयासी नावलोकीं ॥७॥१५२आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥श्स्त्रपाणि रिक्तपाणी । पहाति कृष्णातें ते दुरुनी । अवलोकूनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥२॥घरें सांडूनियां नारी । आल्या कोणीचि नसतां घरी । म्हणती सवेंचि जाईल गे श्रीहरी । आम्ही त्या दृष्टीं न देखतां ॥३॥मग जे उव्दिग्न व्हावें मनीं । तें आतांच कां न यावें पाहोनी । ऐशिया निश्रचयातें करुनी । आलिया एकांतवासीहि त्या ॥४॥जिया बाहेरी येणेंचि नाहीं । आपुलिया सभाग्यपणें कदाही । आल्या धांवोनियां त्याहीं कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥५॥निळा म्हणे घरा भाग्य । आलिया अव्हेरी कोण त्या मग । अधिकाअधीक लाहो सवेग । करुनियां संग्रहिती ॥६॥१५३कृष्ण परमात्मा श्रीहरी । बळिराम शेषअवतार निर्धारी । कैसे शोभले अलंकारीं । निजांगाचियें निज प्रभे ॥१॥मुगुट कुंडले विशाळ डोळे । जैसी विकासलीं सूर्यकमळें । अंगकांती रुप सांवळें । पीतांबराची परिधानें ॥२॥कंठी पदकें सुमनकळा । कौस्तुभ एकावळी रुळती गळां । बाहुभूषणें मुद्रिका सकळां । कांडोवाडी सुशोभित ॥३॥सुकुमार नागर अंगकांती । ज्याचिया तेजें रविशशी दीप्ती । हुताशनीं रत्नीं प्रकाशे फांकती । ज्याचेनियां झगमगती तारांगणे ॥४॥सुवर्ण म्हणती जें उत्तम । तें याचिये अंगकांती सुमहिम । ऐसे सौंदर्य निरुपम । कृष्णाकृती वोसंडलें ॥५॥जैसिया परी तैसा भासे । हेंहि अपूर्वचि एक असे । कृष्णरुपें लाविलें पिसें । न स्मरती पहातां देहगेहा ॥६॥निळा म्हणे बैसली दृष्टी । कृष्णारुपीं ते सहसा नुठी नरनारी विस्मित पोटीं । अवलोकिती श्रीकृष्णा ॥७॥१५४निपुण म्हणती हा आमुचा गुरु । ज्ञानी म्हणति हा परात्परु । योगी म्हणती योग साचारु । याचिपासुनी जन्मला ॥१॥याज्ञिक म्हणती भासे कृष्ण । यज्ञरुपीं हा नारायण । वैदिकांही लागले ध्यान । म्हणती वेद मूर्तिमत हाचि दिसे ॥२॥मला भासे वस्ताद जेठी । शासन करीतया नृपवर श्रेष्ठीं । शस्त्रपाणिया उग्रदृष्टी । सहारकर्ताचि कृष्ण दिसे ॥३॥वृध्दां भासे सकुमार बाळ । तरुणांगियां मदनमूर्तिचि केवळ । ऐसा सर्वी सर्व हा सकळ । भासे जैसिया तैसाचि ॥४॥कृष्णाकृती भुललीं लोकें । जाऊंचि विसरली स्त्रिया बाळकें । तंव ते कुब्जा भरुनी तबकें । घेऊनि आलीं सुपरिमळें ॥५॥उत्तम सुवास चंदनगंध । केशर कुंकम कस्तुरी शुध्द । सुमनहार गुंफिले विविध । सुमनतुरे नानापरी ॥६॥जात होती राजमंदिरां । तंव त्या देखिलें नंदकुमरा । म्हणे आजींचि हे पूजा सुंदरा । चर्चूं श्रीकृष्णा निजहस्तें ॥७॥१५५कंसराया पूजितें नित्य । परि तो असुरचि उन्मत । काय पुरवील मनींचा हेत । दासी किंकर मी त्याची ॥१॥परमात्मा हा सर्वेश्रवर । कृष्ण सुंदरा अतिसुंदर । चर्चनमिसें लावीन कर । अति मनोहर करीन पूजा ॥२॥मग येऊनियां ते निकट जवळी । मस्तक ठेवी चरणकमळीं । म्हणे चर्चीन हा करतळीं । जरी तूं आज्ञा देशील ॥३॥नित्य रायातें चर्चितां । चातुर्य आलें माझिया हातां । आतांही तेथेंहि जात जातां । तूंतें देखिले निज दृष्टी ॥४॥मग तैसीची मी येथें आलें । तुझिया चरणातें पावलें । दासी विद्रूपचि परी मज ठेविलें । रायें याचि कार्यावरी ॥५॥जणोनी तिचा अंतर्भावो । प्रसन्न झाले देवाधिदेवो । म्हणती तरी तूं अवश्यमेवो । चचीं चंदन निज हस्तें ॥६॥निळा म्हणे आली पूजा । नाहींचि त्यागणे गरुडध्वजा । जैसिया तैसे मग हा वोजा । करी देणें यथोचित्त ॥७॥१५६रेखिले निढळीं केशरीं टिळक । तयावरी कस्तुरी परम सुरेख । उत्तम कुंकूं जाउळीं देख । लाविलिया आरक्त अक्षता ॥१॥मग तो चंदन मलयागर । चर्चिला सुवासित अति परिकर । यावरी काढुनी सुमनाहार । उभयतां कंठीं ओपिले ॥२॥तुरे खोविले मस्तकावरी । तेणें शोभले बळरामहरी । मग ठेवूनियां चरणांवरी । मस्तक नमू उभी ठेली ॥३॥कृष्ण बोलिले प्रसन्नोत्तर । कुब्जे तुझा केला अंगिकार । निळा म्हणे तदाकार । वृत्ति झाली कुब्जेची ॥४॥१५७राया जाणविती सेवक । अक्रूरें आणिला नंदबाळक । तेणं मर्दुनी बळिया रजक । धनुर्यागही भंगिला ॥१॥आतां येऊनियां चौबारी । उभा रंगशिळेवरी । अवघ्या पाहाती नगरनारी । लोकपरिवारीं मिळोली ॥२॥उभयतां बंधू अति सुंदर । बळिराम आणि सारंगधर । आणखिही गौळियांचे कुमर । सवंगडे भार पांच शतें ॥३॥कृष्ण लावण्य रुपाकृती । चंद्रसूर्या दवडी परती । अनंग तोहि उषभूपती । ऐसें सौदर्य हरिअंगी ॥४॥लोक मिळाले भोंवते । पाहातां धणी नपुरे त्यातें । जाऊंचि विसरले मागुते । शोधलें चित्तें हरिरुपा ॥५॥आणिक एक वितलें राया । कुब्जे चंदने चर्चिल तया । करुनियां ते दिव्य काया । ठेविली कृष्णें क्षणार्धे ॥६॥निळा म्हणे सांगता ऐसें । चकित रावो निज मानसे । देहीं देहातें नुमसे । चित्रींचे लेप तयापरी ॥७॥१५८यावरी पुढील कार्यार्थु । साधावया श्रीकृष्णनाथु । चालिले राजभुवना आंतु । तंव दारवंटा समस्त मल्ल उभे ॥१॥म्हणती कोठें रे करुनियां मेळ । चालिला ते अवघे गोवळ । नेणोनियां राजाज्ञा बळ । जैसे टोळ सैराट ॥२॥पाठवा पुढें कृष्ण तोचि । आणील परवानगी तो रायाची । तंव गोवळ म्हणती रे हें वायाची । जल्पतां मराल येचि क्षणीं ॥३॥परवानगीये एकचि ठावो । बळिराम अथवा कृष्णदेवो । सांडूनियां कंसरावो । रिघा रे शरण वांचाल ॥४॥तंव तें म्हणती हीं कच्चीं पोरें । चणचणा बोलती न्यायनिष्ठुरें । भयचि हीं गव्हारें । आपटा एकदोनी धरुनियां ॥५॥त्यांचियां कैवारा कृष्णनाथ । येईल आपोआप धांवत । मग करुनियां वरवळां समस्त । त्यासीहि वधूं निमिषार्धे ॥६॥निळा म्हणे चिंतुनी ऐसें । घांविले गोवळांवरी अति आवेशें । तंव ते ओढिले नांगरपाशें । बळिरामें एकदांचि कवळिनें ॥७॥१५९तंव कृष्ण म्हणे बळिरामदेवा । आमुचाही वांटा कांही ठेवा । ते म्हणती यावरी अवघा । तुमचाचि भाग निश्रिचतार्थे ॥१॥कुळवई आणि राजा कंस । अर्थार्थी हे दिधले तुम्हास । कृष्णजी म्हणती हें नये चित्तास । यांतहि वाटा पाहिजे ॥२॥बरें म्हणोनियां बळिराम । यांतहि घ्या हो निमेनिम । मग मिसळले जेंवि निरसावया तम । चंद्रसूर्य पौर्णिमेचे ॥३॥तेथें झाला हाहा:कार । घ्या घ्या शब्द उठिला थोर । कृष्ण नेटका झुंजार । आणि बळिरामहि महाबळी ॥४॥करुनियां मल्लां महामारी । निर्दाळिले एका निमिषावरी । तंव तो कुळवई लोटिला निशाचरीं । कृष्णें सोंडेसीचि धरियला ॥५॥आसडूनियां तो महीवरी । उपटूनि दांत घेतले करीं । ठोकिता तेणेंचि मस्तकावरी । ठिकरिया केली गंडस्थळें ॥६॥निळा म्हणे बळियाबळि । माजी ब्रम्हांडा एक वनमाळी । यापरी करुनियां रवंदळी । निर्दाळिले असुर ॥७॥१६०कुवळई मर्दूनियां उन्मत्त । उपटूनियां घेतले त्यांचे दांत । बळिराम आणि कृष्णनाथ । आनंदें नाचत रणसौरे ॥१॥दोघेहि बंधु अति सुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर । हे देखोनियां महावीर । मुष्टीक चाणूर उठावले ॥२॥ते रायाचे परम आप्त । आतुर्बळी बळ प्रताप । जयां देखतांचि आहाकंप । देवां दैत्या मनवां ॥३॥दंडी मुडपी उरीं शिरीं । अदभुत बळाची उजरी । काळासम तुल्य ते निशाचरीं । जेठिया वस्ताद मल्लाचे ॥४॥तयाचिये दृष्टीपुढें । मेरुमांदार भासती खडे । मल्लविधेमाजी निधडे । वीर उन्नत शिघ्रकोपी ॥५॥जयाचा सदा आडदरा । समुद्रवलयांकिता वीरा । धाकें त्याचिया कंसापुरा । देती करभार सर्वही नृप ॥६॥निळा म्हणे ते आग्रगण । जेठियांमाजी शिरोरत्न । भुजा दंडांतें थोपटून । राहिले उठोन पुढें उभे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP