मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|कृष्णचरित्र| १०१ ते ११० कृष्णचरित्र ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४० १४१ ते १५० १५१ ते १६० १६१ ते १६७ अभंग - १०१ ते ११० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - १०१ ते ११० Translation - भाषांतर १०१गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥देउनी समर्थ हा घेणार । सर्वी सर्वात्मा ईश्वर । म्हणोनियां हा हुडकूनियां घर आणी बाहेरी लपविले ॥३॥कोठेंहि उरों नेदिचि संचित आणी बाहेरीं ते अकस्मात । वाढूनि सौगडिया देत । आपणहि स्वीकारित त्यांच्यासंगे ॥४॥देखोनियां तें वृध्द नारी । बोभाट करिती यशोदे व्दारी । म्हणती गे कुमारा आवरीं । नव्हाडी केली गोरसाची ॥५॥नित्य संवकलासे आमुचे घरीं । धांवोनि तो निशीच्या भरीं । निद्रिस्त असतां शिकींचि उतरी । आणि गोवळां चारी गोरस ॥६॥निळा म्हणे न सोसवे आतां । नित्य उपद्रव याचा होतां । आणखीही गुह्य गोष्टी सांगतां । होईल लौकिक आमुचाचि ॥७॥१०२सुनाकुमरी आमुचे घरीं । त्यांतेही चाळवुनियां निर्धारी । लोळे सेजाबाजावरी । आणखीही करी काय नेणों ॥१॥तया नावडतिचि भ्रतार । सासासासरे भावेदिर । करुनिया यासिची परिचार । रतल्या निरंतर याची संगें ॥२॥खाता जेवितां स्मरति यातें । लेतां नेसतां यापेंचि चित्तें । कामकाजीं जैसि भ्रमितें । तैसिया उदास वर्तती ॥३॥यशोदा याणेंचि लाविला चाळा । वेडयाचि केल्या सुनाबाळा । देखता याचिया श्रीमुखकमळा । मग त्या नव्हतचि कोणाच्या ॥४॥ऐसा चोर हा शिनळ । यशोदे आवरी आपुला बाळ । येणें बुडविलें आमुचे कुळ । न कळे आकळ खेळयाच ॥५॥सांगता हे ऐशी गोष्टी । क्रोधची उपजे तुझया पोटीं । परीहा भला नव्हेचि शेवटीं । उभ्यकुलां बुडवणा ॥६॥निळा म्हणे त्यांचि वचनें । ऐकोनि यशोदा क्रोधें म्हणे । काय गे बोल त्या माझें तान्हें । बाळक हें नेणें चोया करुं ॥७॥१०३नाहींचि तुम्हां भीडचाड । येथें करुं अल्याति बडबड । कृष्ण माझा अवघ्यांसीं गोड । तुम्हांसी कां गे वीट याचा ॥१॥जाऊं नेणेचि बाहेरी । तयावरी घालितां गे तुम्ही चोरी । आलगटा अवघ्याचि नारी । नसतींच गाहाणीं आणित्या ॥२॥घरीं काय त्या उणें झालें । जे तुम्हां घरी दूध दहीं चारिलें । नेऊनियां कोठें सांठविलें । कृष्ण खणार तें किती ॥३॥लेंकरुं माझें कोडिसवाणें । विकारमात्र कांहींची नेणे । तयासी शिनळ चोर हें म्हणणें । फजीत पावणें आहे तुम्हां ॥४॥जा गे आतां धरुनि आणा । खोटें शिनळिय येरी श्रीकृष्णा । नाहीं तरी फजीतपणा । व्यर्थचि पावाल या बोलीं ॥५॥कृष्ण तो अंतर्बाह्य निर्मळ । जैसी कां शुध्द स्फटिक शीळ । तया चोरियेचा लावितां मळ । जिव्हा कांटतील तुमचिया ॥६॥निळा म्हणे परिसोनी येरा । क्रोधेंचि चालिल्या आपुल्या घरा । म्हणती धरुनियां श्रीवरा । आणूं तैसाचि इयेपाशीं ॥७॥१०४मग लाउनी शिंकियाच्या हारी । बैसल्या जागत आपुल्या घरीं । कवडाआड आणि माजघरीं । शिंकिया जवळी भोंवताल्या ॥१॥पाटीये तळीं झांकोनी दीप । बैसल्या दवडोनियां झोंप । तंव हा सच्चिदानंदस्वरुप । आला चोरिये त्याचि घरां ॥२॥गडी ठेवूनियां बाहेरी । चाहुली मारुनियां संचार करी । तंव या शिंकियाचिया हारी । चाचपडतां सांपडल्या॥३॥तेणें हरिखेला अंतरीं । म्हणे आतां साधली चोरी । बरा निवाड फावला वरी । निजल्या नारी नेणती ॥४॥गोड चाखोनियां तें पाहे । हातोहातीं लांबवीत जाय । दूध लोणी वरील साय । दहीं साजुक विरजलें ॥५॥आपण खाये गडियां चारी । गोड आहे म्हणे हरी कुचकुचिती हळूचि करीं । म्हणतीं बाहेरी निघावें ॥६॥तंव सांचल ऐकोनियां गौळणी । आवेशें धांविल्या अवघ्याजणी । दीप उघडिला तंव हा नयनीं । देखियला चोरिये भक्षितां ॥७॥झडा घालुनियां वरी ॥ कवळिल्या अवघ्या नारीं । म्हणती कैसी करुनी चोरी । घरे आमुची बुडविली ॥८॥निळा म्हणे बोलोनि ऐसें । चरणी बांधति आवेशे । तया किंव दावितसे । म्हणे मी आलों भुलोनिया ॥९॥१०५काली माजुम घेतला होता । गडियांसवें म्यां नेणतां । तेणेंचि आजि माझिया चित्ता । झाला विभ्रम ऐशापरी ॥१॥न यें सोडाल आजि तरी । तुमचे घरीं न करीं चोरी । मस्तक ठेवितों पायांवरी । करा उपकार आजि मज ॥२॥एकी म्हणती विश्वास नाहीं । याचिया शब्दाचा वो कांही । आजि सोडितां हा उदयांही । ऐसेंचि करील येउनी ॥३॥अवघाचि चोरुनीया गोरस । नित्य खातो सावकाश । आमुचें घरीं नुरवी लेश । पहा माणसें रोडेलीं ॥४॥आपुलिये हा सुटिकेसाठीं । उदंड सांगेल ऐशिया गोष्टी । परि निष्ठूर आणि कपटी । या ऐसा नाही भूमंडळीं ॥५॥आतां यासि न्यावें तेथें । यशोदे दावावे निरुतें । तियेसि सत्य वाटत नव्हतं । फेडावा संदेह तियेचा ॥६॥निळा म्हणे मग बांधोनी गळा । धुलकाविती अवघ्या बाळा ॥ गाळी वोपुनियां सकळां । आणिला धरुनी यशोदेपें ॥७॥१०६म्हणती दसवंतीये देख देख । वोजे पाहे याचें मुख । लोणीं माखलें साजूक । आणि दहींही गिरबडलें ते वरी ॥१॥पाहे यशोदा जंव निर्धारी । तंव माग देखे मुखावरी । मग झडपिती अवघ्या नारी । कैसें बोलत होतीसी ॥२॥याचिपरी आमुच्या सुना । कुमारीही लाविल्या ध्याना । सांगता हें तुमच्या मना । सत्य नव्हतें वाटत ॥३॥आतां शासन करिशील तरी । खोंडी सांडील हा वो निर्धारीं । नाहीं तरी नाकळे हरी । नित्य कलह तुम्हां आम्हां ॥४॥लाडिका तरी बांध गळां । परी नको सोडूं हा मोकळा । आम्ही उत्तीर्ण आपुल्या बोला । सांगोनियां या काळें ॥५॥यावरी चोरिये देखतां । न सोडें जिवें या तत्त्वतां । नेऊंनियां निज एकांता । बांधू गांठी जिवाचिये ॥६॥येणें गोरसाची धुणी । करुनि फोडियेली दुधाणीं । त्याचाहि हिशेब तुज लागुनी । न देववे यशोदे सर्वथा ॥७॥ऐशिया निकुरेंसी या नारी । शिव्याहि देती तोंडचिवरी । म्हणती यशोदे तुझी ही थोरी । नुरेल यावरी जाण गे ॥८॥निळा म्हणे खादलें वित्त । देणें लागेल तुज तें सत्य । ऐसेही दावूनियां संकेत । ताडिती कृष्णा निज करें ॥९॥१०७देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं ॥१॥किती तरी हे अपवाद । सोसूं जनाचे वेवाद । उदंड सांगताहि हा गोविंद । न सांडीचि खोडी आपुली ॥२॥मग म्हणे तूं गोपाळा । न संडिशीचि आपुला चाळा । शिक्षा लावीन याचि वेळां । मग तूं शहाणा होशील ॥३॥यावरी नेदीं घरात येऊं । तुजला न घाली खाऊं जेऊं । तुझिया खोडी माझा जिऊ । बहुत तपिंनला या काळें ॥४॥मग लाऊनियां दावें गळां । नेऊनि बांधला त्या उखळा ॥ म्हणे सांडिता ऐसा चाळा । तुज सर्वथा न सोडीं ॥५॥हांसती भोवत्या अवघ्या नारी । म्हणती करिशील आतां चोरी । नासिंले खादलें तें आजिवरी । फावलें ऐसें म्हणों नकों ॥६॥यावरी येशी आमुचा घरां । चोरीये जरी दधीक्षीरा । तरी नेऊनियां कौसासुरा । हातीं देऊं तुजलागीं ॥७॥ऐसें बोलोनियां सुंदरा । गेल्या आपुलिया मंदिरा । यशोदा म्हणे रे चक्रधरा । घरीं काय उणें तुज ॥८॥निळा म्हणे बोले हरी । गोड न लागेचि तें निर्धारीं । चोरियेचेंचि आवडे भारी । करील याहिवरी चोरीया ॥९॥१०८ऐसें एकोनियां यशोदा । म्हणे तरी मी न सोडी तूंते कदा । अंतरलें काम माझा धंदा । राहें गोविंदा ऐसाचि ॥१॥बोलोनियां तें ऐसें गेली । आपुल्या कामा वरीपडि झाली । पुढें कृष्णे युक्ति केली । अति विचित्र ते ऐका ॥२॥मग त्या उपडुनियां उखळा । आला बाहेरीं तया वेळा । दावें तैसेंचि असतां गळा । उखळ आडकवी वृक्षेसी ॥३॥विमलारर्जुन कुबेरनंदन । नारदवचनें शाप पावेन । होते राहिले वृक्ष होऊन । कृष्णचरणस्पशें उध्दरावया ॥४॥त्याचें उदित झालें भाग्य । यालागीं येऊनियां श्रीरंग । करिते झाले तो प्रयोग । सावध मनें परियेसा ॥५॥ते उभयतांहि शेजारीं । वाढले होते दिव्य सहस्त्रवर्षेंवरी । उंची पाहातां गगनोदरीं । शाखपल्लव डोलती ॥६॥त्या उभयतां माजी उखळ । आडकवुनी कृष्ण् गोपाळ । तया नेटी देउनी चरणतळ । हेलावा देऊनि उपटिलें ॥७॥तिहीं गर्जना केली कैसी । प्रळयकाळींची विदयुल्लता जैसी । उध्दार पावेनियां हरिचरणासी । वंदूनियां ते गेले ॥८॥ऐकोनियां तो घोषगजर । यशोदा धंवली अति सत्वर । पाहे तंव तो सारंगधर । माजि वृक्षा पडियला ॥९॥मग उचलूनियां करतळीं । आलंगिला हदयमेळीं । निढळ मेळउनी निढळीं । अवलोकीं वदन क्षणक्षणा ॥१०॥म्हणे भ्यालिसी गे माझी माय । थोर केला म्यां अन्याय । उखळीं बांधलीसी हा अपाय । थोर वरुनि चूकला ॥११॥मग सोडूनियां कंठीचें दावें । मुख पुसी निजपल्लवें । निळा म्हणे याचीं लाघवें । नेणवतीचि ब्रम्हादिकां ॥१२॥१०९तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी । आश्रचर्य करिती आपुलाले मनीं । म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥यशोदा सांगे तयांप्रती । बांधला होतां म्या श्रीपती । तेणें येऊनियां आचिती । उखळ वृक्षाबुडीं अडकविलें ॥३॥गौळणी सांगतां गाहाणें । मीहि संतापलें मनें । तेणें गळां बाधोनियां तान्हें । उखळेंसी म्यां ॥४॥गेलें आणिकियां कामासीं । कृष्णें उपडूनियां उखळासी । वृक्ष मोडियेलें आवेशीं । माजीं आपणही पडियेला ॥५॥थोर चुकलें हें अरिष्ट । तळीं सांपडतां होतां पिठ । ऐसें बोलोनियां अदृष्ट । ताडी आपुलिया निज करें ॥६॥निळा म्हणे घेउनी त्यासी । सफुंदे यशोदा उकसाबुकसी । म्हणें माझिया हषिकेशी । कोणीहि देखों न शकती ॥७॥११०म्हणे बा गौळणीचिया रागें । तुज म्यां बांधलें रे प्रसंगें । तंव त्वां उपटूनियां श्रीरंगें । उखळ येथें अडकविलें ॥१॥परी तें नयेचि तुज उगवितां । म्हणोनियां बळें ओढिलें ताता । तंव हे वृक्ष पडिले रे भाग्यवंता । अदृष्टें आमुच्या वांचलासी ॥२॥मग त्या म्हणती गौळणी नारी । खेद न करीं वों सुंदरी । त्वांचि हा परमात्मा श्रीहरि । मारिला होता निज हस्तें ॥३॥गत गोष्टी काय ते आतां । न करीं यावरी जिवा परता । उदंड गाहाणींही सांगतां । तूं तें तत्वतां मानू नको ॥४॥आजींचाचि पाहें पां अनर्थ । केवढा चुकला अवचिता घात । अदृष्टाचा हा कृष्णनाथ । म्हणोनियां वांचला निज भाग्यें ॥५॥आतां तरी सांभाळुनी । पहा हा भ्याला असेल मनीं । हे केवढे वृक्ष पडिले अवनीं । घोर घोषें दणाणिले ॥६॥निळा म्हणे यावरी यशोदा ॥ पुसे भ्यालासि बारे गोविंदा । तव तो हांसोनियां गदगदा । म्हणे मज भ्य कोणाचें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP