मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी संत साहित्य|संत निळोबांचे अभंग|कृष्णचरित्र| १२१ ते १३० कृष्णचरित्र ३० ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १४० १४१ ते १५० १५१ ते १६० १६१ ते १६७ अभंग - १२१ ते १३० निळोबा महाराजांनी बाराशेच्यावर अभंग लिहीले आहेत. सर्व अभंगांतून त्यांनी विठ्ठल भक्ती गायलेली आहे. निळोबा महाराज विठोबाप्रमाणेच कृष्णाची भक्ती करीत. निळोबारायांनी श्रीकृष्ण चरित्र अतिशय उत्तम प्रकारे रचले आहे.Sant Niloba Maharaj wrote more than 1200 Abhanga in praise of Vitthala. Sant Niloba was a devotee of Vitthala. Niloba Maharaj composed Krishna character in his abhangs in very devotional manner. Tags : abhanggaulannilobasantअभंगगौळणनिळोबासंत अभंग - १२१ ते १३० Translation - भाषांतर १२१यावरी आपण वृक्षातळीं । जाऊनियां वरी न्याहाळि । तंव ते म्हणती अरे वनमाळी । आतुर बुध्दि करुं नको ॥१॥येथे हा आघाताचा ठावो । नेणसि तूं त्याचा भावो । अणुमात्र निसरतां पावो । होईल निर्वाहो जिवित्वाचा ॥२॥आपुला घात दुर्जना हरीख । हें तों न करीतीं मूर्ख देख । तुज पुढें तों शाहणे आणिक । नाढळेंचि ये भुवनत्रयीं ॥३॥नायकोनियां आमुच्या उत्तरा । व्यर्थचि वेचावें आत्मशरीरा । दु:खी करुनि मातापितरां । समागमिया देशवटा ॥४॥ऐसा विचार होईल हरी । नको चढो या वृक्षावरी । ठेवितों तुझया पायांवरी । आम्ही सकळहि मस्तक ॥५॥परीं तें नायकोनियां कृष्ण । चढला वरी बैस जाऊन । तया म्हणती अवघे जण । करीं हो सावधानपणें कार्य ॥६॥तयांप्रति बहु बरें म्हणे । जाणता त्रैलोक्याचे खुणे । निळा म्हणे चरित्र करणें । आहे दाखवणें तेंचि करी ॥७॥१२२मग पाय ठेऊनि खांदियेवरी । चेंडा झेपावला हरी । ऐसें देखोनियां इतरीं । केला कल्लोळ खालुता ॥१॥म्हणती रे नको नको हरी । जाऊं तिये खांदीयेवरी । आम्हां तुझी आई घरीं । गांजिल ऐसें करुं नकों ॥२॥तयांप्रति म्हणोनि बरें । खांदि मोडियली भारें । ते आपण येकचि सरें । पाडियला डोहांत ॥३॥देखानियां ते अवघे गडी । शंख करिती थडोथडीं । अंगे घालोनियां गडबडी । लोळती भुई आक्रंदत ॥४॥म्हणति गेला रे महादाश्रय । तयाविण आम्हीं पोरटी काय । नाहीं दवावया ठाय । तोंड आतां कोणीकडें ॥५॥काय म्हणेल ते दसवंती । लोकहि आम्हां फजीत करिति । म्हणती कां जाऊं दिला श्रीपती । तुम्हीं तया झाडावरी ॥६॥हाणेनि घेती उरावरी । मस्तका ताडिती निजकरीं । गाई हांबरडे हाणीती वरी । दु:ख भारी न सोसवे ॥७॥गांवांमाजी गेली वार्ता । लोकहि धांवले ऐकतां । नंदयशोदे प्राणांत अवस्था । हो सरली तेचि क्षणी ॥८॥घरोघरीं हाहाकार । शोक करिती नारीनर । ठाकूनि आलीं तीर । तंव तो कहार गोवळांचा ॥९॥यशोदा म्हणे दावा हरी । केउता गेलारे गे मुरारी । नंदही दीर्घ रुदन करी । म्हणे हरपला गोविंद ॥१०॥दारिद्रीया हातीं रत्न । लागलें न धरे करितां यत्न । तैसि परी झाली म्हणोन । नंद लोळे गडबडा ॥११॥असो तो दु:खार्णव सांगता । पाषाण फुटती तत्त्वतां । मग समोखुनीया उभयता । लोक घेऊनि घरा आले ॥१२॥एका कृष्णविणं नगर । वोस दिसे भयंकर । दु:खार्णवीं नारीनर । पडले तैसेंचि मातापिता ॥१३॥निळा म्हणे इकडे हरि । रिगोनियां सर्पविवरीं । विखार काडिला बाहेरी । काळया तो नाथुनि ॥१४॥१२३सप्त अहोरात्र होतां । तेथें कृष्ण जळाअतोंता । सांगतां युध्दाची ते वार्ता । सर्पी विखारीं वेष्टिला ॥१॥बोलिला उदंड विरुध्द वचनें । युध्दहि केलें अति सत्राणें । परी या त्रैलोक्यजीवनें । लाविली दोरी तया नाकीं ॥२॥मग धरुनियां तें करीं । केलें नृत्य पृष्ठीवरी । सवेंचि आणिला बाहेरी । आपण वरी बैसोनियां ॥३॥देखोनियां अवघे गडी । हर्षें नाचती बागडी । घेऊनियां गोकुळां गुढी । जाणविली वार्ता सकळांसीं ॥४॥ऐकतां हर्षले नागरिक । सामोरे आले ते सकळिक । देखोनियां यदुनायक । लोटांगणें घालिती ॥५॥देऊनियां आंलिगणे । कृष्णें हरिला त्यांचा शीण । मग समागमें अवघे जण आले । कृष्णमंदिरां ॥६॥गाई वत्सां आणि गोवळां । आनंद नरनारी बाळां । झाला ब्रम्हानंद सकळां । म्हणे निळा म्हणे हरिभेटी ॥७॥१२४मग पाचारुनियां प्रांतवासी । व्दिज आणिले भोजनासी । जिताणें करुनियां श्रीकृष्णासी । ओंवाळिती अक्षवाणें ॥१॥काळया सर्प स्थपिला वरी । कळंबातळीं यमुने तिरीं । देखोनि सोहळा तो नरनारी । करितीं आश्चर्य मानसीं ॥२॥पहा रे हें श्रीकृष्णचरित्र । एकाहुनि एक विचित्र । नवलचि देखती आमुचें नेत्र । नित्यानित्य नूतन ॥३॥हेचि घरोघरीं वार्ता । कथिती कृष्णचरित्र कथा । गुढीया उभवूनीयां चित्ता । माजी हर्ष न समाय ॥४॥गाती नित्य नामावळी । तुळसी वृंदावना बैसोनि पाळी । अवलोकूनियां मुर्ति सावळी । करिती जिवें कुरवंडिया ॥५॥म्हणती आमुचें थोर भाग्य । भाग्यें जोडला हा श्रीरंग । याचा नित्य घडतां संग । काय करावें वैकुंठ ॥६॥निळा म्हणे उत्साह ऐसा । मानूनियां निज मानसा । करिती पूजा स्तविती ईशा । जगत्रयाच्या श्रीकृष्णा ॥७॥१२५तंव आली वार्षिक यात्रा । करणें इंद्रपूजा सर्वत्रां । गोरसें काढुनी कावडी भरा । हाकारी तराळ नंदआज्ञा ॥१॥जाऊनियां पर्वतासी । सुरपती पुजावा प्रतिवरुषीं । जागोनियां त्याची दिवसासी । निदसुरियां देती आठव ॥२॥म्हणती उच्छिष्ट न करावें गोरस । दूध दहीं तूप सायास । लोणी भरुनियां कावडीस । रंग लावावा घागरमाळा ॥३॥ध्वजा कुंचे सिध्द करा । विदया लावूनियां अपारा । जावें परिवारेंसी सत्वरा । प्रात:काळीं देवपूजे ॥४॥गोवर्धनीं सुररावो । पूजा इच्छी देखोलि भावो । यालागीं सकळही समुदावो । जावें आपुल्या कल्याणा ॥५॥मेघा तोषोनि यावरी । इच्छिल्या ऐसी वृष्टि करी । तेणें पिकती घुमरी । आणि गोधनेंही दुभती ॥६॥निळा म्हणे ऐकोनि श्रवणीं । विस्मय मानी चक्रपाणी । म्हणे मज प्रत्यक्षा सांडुनी । कैंचा इंद्र आणियला ॥७॥१२६मग सांगे गडियां सुजाणां । जातां कावडीं हिरोनि आणा । काय करितो देवराणा । पाहों चरित्र देवांचे ॥१॥सें सांगोनियां गडियांसी । प्रात:काळींचि हषिकेशी । जाऊनियां मार्गप्रदेशीं । रोखूनियां बैसला ॥२॥तंव ते लोक सकळही । स्नानें करुनियां लवलाहीं । वस्त्रें अळंकार घालुनी देहीं । वादयें वाजवित सुस्वरें ॥३॥करुनि सकळिकां आरोळी । चला चला म्हणती उतावेळीं । मग मिरवित कावडी कल्लोळीं । नाचविताचि चालिले ॥४॥वाणी पढती इंद्रप्रतापें । ठांई ठांई नाचती पडपें । सोहळा देखोनियां तो गोप । म्हणती कृष्णा अवलोकीं ॥५॥कैसा करीतुची हे गजर । आले अवघे नारीनर । तंव कृष्ण म्हणे रे निर्भर । होऊनि लुटा कावडी ॥६॥निळा म्हणे ऐकोनि ऐसें । गोपाळ चौताळले आवेशें । म्हणती आणारे कृष्ण परे ईशें । कवडी इकडोचि आणविल्या ॥७॥१२७ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत ॥१॥ऐंसे एकोनियां गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ । कावडी हिरोनियां सकळ । आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥तेणें जाहला हाहाकार । जहाले घाबरे नारीनर । म्हणे केला केला विक्षेप थोर । पूजेमाजी इंद्राचिने ॥३॥अविवेकी हे धांवोनी आले । बळेंचि इंद्रभाग हिरोनी नेले । यावरी आतां नव्हे भलें । क्षोभलिया सुरपति ॥४॥कृष्णें उघडूनियां कावडी । गोवळ बैसविले परवडी । म्हणे रे गडिहो सेवा गोडी । अवघियाचीच निवाडे ॥५॥आजी आम्हींच इंद्र जाहलों । पूजा घेऊनियां तोषलों । बरे उत्तम धणी धालों । तृप्तीवरी स्वीकारा ॥६॥निळा म्हणे कृष्णचंद्रु । आदि इंद्राचाही इंद्रु । यावरी कृपेचा समुद्रु । करील कौतुक आसमाई ॥७॥१२८यात्रा फिरोनियां माघारी । आली गोकुळाभीतरी । उव्देग करिती घरोघरीं । म्हणती अनर्थ् वोढवलां ॥१॥इंद्र कोपलियावरी । अणुमात्रही वृष्टी न करी । बरग पाडूनियां दारीं । उरों नेदील शेंपूट ॥२॥अनावृष्टी नव्हतां पीक । मरती दुष्काळें पिडती लोक । अथवा अतिवृष्टी करुनी सकळिक । बुडवील निमिषार्धे ॥३॥भयचि अणुमात्र न वाटे कृष्णा । परि हा कोपलिया देवराणा । करील नाश एक क्षणा । पळमात्रही न लगतां ॥४॥हें असो भक्षिला गोरस । तुप्ती सांडी उदगारास । वांकुल्याही गोवर्धनास । कृष्ण म्हणे रे दाखवा ॥५॥हें इंद्र देखोनियां दृष्टीं । क्रोधें संतप्त झाला पोटीं । मेघा पाचारुनियां म्हणे वृष्टी । करा निर्घारें गोकुळावरी ॥६॥पाचारुनि संवर्तका । म्हणे गोकुळीची नुरवीं मृत्तिका । मुसळधारीं वषोंनी उदका । मेळवीं नेउनी सागराच्या ॥७॥येरु म्हणे बहुत बरें । आज्ञा केली ते सुरस्वरें । करीन परी एक दुसरें । पाहिजे मज साह्यार्थ ॥८॥दयावा सवें प्रचंड वात । करावया गोकुळाचा घात । इंद्रे पाचारुनियां त्यातें त्वरित । म्हणे जावें याच्या संगे ॥९॥निळा म्हणे स्वमुखें त्यासी । सांगे जाउनी गोकुळासी । मोडूनियां तेथचिया वृक्षांसी । घरां खोपटांसी उडवावें ॥१०॥१२९संवर्तक वर्षेल जळधारीं । तुवांहि झगटावें तंव त्यावरी ऐसें सांगोनियां प्रेरिले वरी । पांचहिजण अतिक्रोधें ॥१॥आज्ञा होतांचि चालिले मेघ । पवन त्याही पुढें सवेग । तेणें अभ्रें दाटली अनेक । पाडिला अंधकार गोकुळावरी ॥२॥विजुवा चमकती लक्षवरीं । कलपांत काळींच्या जैशा हारी । देखोनियां गजबज भारी । झाली गोकुलीं सर्व जनां ॥३॥म्हणती कालिचि याची इंद्रपुजे । विश्रवंसिलें या नंदात्मजें । तेणेचिं क्षोभोलियां सहस्त्रांबुजे । मेघ धाडिले गर्जती ॥४॥आतां जावें कोणीकडे । पळोनियां देवक्षोभापुढें । अकस्मात अरिष्ट हें एवढें । आणिलें कृष्णें आम्हांवरी ॥५॥मागिल्या अरिष्टांत वांचला । तेणेंचि बहूत वेळ घेतला । घात आमुचा येणें केला । गाईगोवळा समवेत ॥६॥तंव सुटला झुंजात वारा । मेघें घातल्या सरळ धारा । निळा म्हणे नंदकुमरा । करणें त्याचा अवमान ॥७॥१३०मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं ॥१॥मग ते उभे करुनि फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी । आपणही तेथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥२॥हाका देऊनि उचलीती । येकचि हिल्लारी करा म्हणति । उर मस्तक नेटीं लाविती । एक पाठी देती निजबळें ॥३॥एक पडोनियां उचलिती पाय । एक म्हणती न धरा रें भय । एक उभे राहती ठायाठाय । कृष्ण बळिया आमुचा ॥४॥तंव तो अनंतकोटीब्रम्हांडाधीश । परमात्मा हा कृष्ण परेश । विश्रवलाघवी परमपुरुष । न करी तें काय स्वलीला ॥५॥आपोआप चालिला वरी । अंतरिक्षाची निज सत्ता गिरी । धरुनि सकळांते हाकारी । म्हणे वसा तळीं याचीये ॥६॥आपभयेंचि धांवलीं सकळें गाई गौळणी आणि गोवळे । निळा म्हणे श्रवापदें पक्षीकूळें । मुंगीया आदीकरुनी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : August 21, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP