मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण सतरावे – उद्धव-बोध आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण सतरावे – उद्धव-बोध सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण सतरावे – उद्धव-बोध Translation - भाषांतर जणे होय मोक्षप्राप्ति । ते प्राणी चुकले नेणती।काय सांगू जनाप्रती। कोठवरी आता ॥१॥स्वतः सिद्ध व्यापक। सोऽहं नाम सम्यक ।ते जाणूनि न जपती कोणी देख। पडले भ्रांति-पाशी ॥२॥प्रथम गति हेचि देखा। जेणे चौयांशीतूनि सुटका।सोऽहं नाम अजपा-शिखा। निरंतर घ्याइजे ॥३॥पूर्वपार सहजाक्षरी। हाचि मंत्र योगी उच्चारी।धृव प्रल्हादादिका-अंतरी। निश्चय हाचि ॥४॥श्रीरामाते उपदेशी। गुरु वशिष्टि तत्त्वमसि।संदीपने हि कृष्णासी। हाचि योग निवेदिला ॥५॥आता कलिमाजी जाण । तेथे न विश्वासे मन ।करोनि कल्पित साधन। यमसदन भोगिती ॥६॥कोठवरी सांगू आता। पाही प्रचीत तत्त्वता।देही कोणी आहे नांदता। स्वतःसिद्ध जाण तो ॥७॥महावाक्याचा उपदेश। हाचि वेदाचा सारांश।भलते मंत्र जपता बहुवस । काय हातास येतसे? ॥८॥सोऽहं म्हणजे ब्रह्म ते मी। तत्त्वमसि ची हीच ऊर्मि।महावाक्यार्थ हा तत्त्वप्रेमी। अनुभविती ॥९॥सोऽहं-अर्थ ऐसा गहन । लक्षिता प्रगटे आत्मज्ञान ।आणि श्वासोश्वासी जपता जाण। चित्तनिरोधन होतसे ॥१०॥शिव तो भकुटिस्थानी। सोहं शब्द लक्ष तयालागूनि।श्वास प्रत्यक्ष नासिकेकडोनि । नित्य घेती प्राणी की॥११॥जीव तो नाभिकमळी। हं शब्दनाद भूमंडळी।उछ्वासांतूनि घेत उफाळी। हंकार तो जगांत ॥१२॥तो कंठापर्यत येत । मिळवी कोण त्या शिवाप्रत?।सत्य सोडूनि पाषाण पजीत । हेचि खोटेपण ॥१३॥आता याची हातवटी। सांगती बरे पाहे दृष्टी।लक्ष ठेवी, अधर कंठी। नाभिस्थानापर्यंत ॥१४॥तेथूनि उठे जो गद् गद । सोहं शब्दाचा नाद।ज्याचे अंत:करण शुद्ध। त्यासीचि कळे ॥१५॥तो शब्द येत कंठावरी। उगेच बैसता अंतरी ।मग दुमदुमे नासिके द्वारी। सोहं शब्द की ॥१६॥सो शब्द शिववाचक । वृत्तीसि करी अंतर्मुख ।हं शब्द जीवास दावी झुळुक । बाहेरीची ॥१७॥दोघाचिये एकांती। जीव-शिव-ऐक्य उन्मेश वृत्ती।जैसी सुषुप्ति लागिजति। तैसेचि होय ॥१८॥मोठे सौख्य आहे बापा!। मार्गहि स्वाधीन आणि सोपा।कोणी न करिती मापा। बुडविले आळसे ॥१९॥।अंगे नाही होत कसवटी। गोष्टी करिती चावटी।ते गेले गेले निरयकपाटी। सत्य जाण उद्धवा! ॥२०॥म्हणोनि घरी शद्ध भावे । सोहं समाधीतचि राहावे ।त्यातचि आहे बरवे । नाहीतरी फजीत होशी ॥२१॥आता कोणीकडे न घाली मन । कुणाची गोष्ट न एके जाण।निश्चये लावी अनुसंधान । सोहं नामाशी ॥ २२ ॥उगीच कवणा सांगो नये। ना तरी अहंकारे हानि होय ।याचा एकांतचि राहे । न बोलावे पाखांड्याशी ॥२३ ॥पाखांड्यासी निजगुंज। सांगता न होय त्याचे चीज ।म्हणोनि सद्गुरुचेचि काज । नित्य करी उचित ॥२४ ॥सदा सत्पदी भाव ठेवी। काय सांगो सद्गुरुची पदवी।सद्गुरुरूप सोहंभावी। नित्य मानावे ॥२५ ॥ज्याने सत्यरूप दर्शविले। सोहंतत्त्वी रंगविले ।त्या सद्गुरूसी विसरता भले । पावशील पतन ॥२६॥मग उद्धव उगाचि बैसोन। बीजमंत्र हा उच्चारून ।श्वासोछवासी ठेवोनि मन । पाही बरवे अंतरी ॥२७ ॥सोहं नामाचा गजर। चालतसे जो वारंवार ।नाभीपासून कंठावर । ध्वनि उमटती सूक्ष्मसे ॥२८॥आधीच शुद्ध अंतःकरण । त्यावरी कृष्णे बोधिले जाण ।त्या सुखासी मग काय उणे। उद्धवाचिया? ॥२९ ॥श्वासोछ्वासी चाले पाठ । इडापिंगला दुहेरी वाट ।सत्रावीचा घडघडाट। कंठी शब्द झंकारी ॥३०॥त्याचा न घेता अनुभव। अवघे सोंगाचेचि नांव।तैसा नोहे की उद्धव । जया मनी निस्सीमता ॥३१॥वृत्ति शुद्ध एकाकार । सोहंनामी जाहलो स्थिर॥वृत्तिसाक्षी शिव साचार। होऊनि राहिला आत्मबोधे ॥३२॥झाला समाधिस्थ पूर्ण । सोहं-स्वरूपी जाहला लीन ।समाधिसुख जिरवून । आला देहावरी प्रारब्धे॥३३ ॥अष्ट सात्विक भावे दाटला। कंठ-शब्द सद् गत झाला।नेत्री अश्रु ढाळु लागला । नमस्कार केला निजभावे ॥३४ ॥सर्व लज्जादिक सोडून । उद्धवे साधले ब्रह्मनिधान ।जो घेणारा असे जाण । तोचि घेतसे तत्त्वार्थ ॥३५ ॥आता कैसा होईन उतराई? काय अर्पावे सदगुरुपायी?तन मन धन अर्पूनि ही। संपवितो बोधकता ॥३६॥इति श्री उद्धवबोध संपूर्णम् ।पुस्तकालय N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP