मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण पाचवे – हठयोग-साधन आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण पाचवे – हठयोग-साधन सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण पाचवे – हठयोग-साधन Translation - भाषांतर जरी साधू म्हणती हठयोग। तरी महाकठिण असे सोंग ।प्रपंचाअंगी तैसा भोग। घडे केवि? ॥१॥जो नर सोडी प्रपंचभान। तयाने करावा हठयोग जाण ।ब्रह्मचर्य राहोन। मानापमान सांडावा ॥२॥जयाने हठयोग घ्यावा। तयाने अहंभाव सोडावा ।स्वदेहाची पर्वा । न करावी किमपिही ॥ ३ ॥विहंगम मार्ग हठयोग। तेथे भोग तितुका रोग ।॥ इतर सोडोनिया उद्योग। होई सादर नेमेसी ॥ ४ ॥सर्वहि मार्ग एक होत। पाहता दिसती जरी अनेक पंथ ।परंतु सर्वातहि एकांत। साधला पाहिजे ॥५॥करोनिया पाया मजबूत । मग घ्यावा कुणीहि पंथ ।पाहावा तयाचाहि अंत । सुलभ मार्ग अंगीकारूनि ॥६॥असोनिया एका पंथे। मग पडताळी विभिन्न मते ।इकडे तिकडे पाहोनि जाते। राहते वृत्ति अढळचि ॥७॥बोलावयासी वाटे गोड। पंच उचलिता न पुरती कोड ।तो बोलायाची चाड। व्यर्थचि करी ॥८॥मागे सांगितले साधन । पंचमुगायोग पर्ण ।आता हठ योग जाण। वर्णीतसे अल्पमती॥९॥प्रथम पाहोनि एकांत स्थान । जेथे कोणी नसे वास्तव्य करोन।आधी करोनि एकाग्र मन। तेथे जावोन राही तू ॥१०॥ठेवोनिया दक्षिण चरणासी। जाई मणिपूर स्वाधिष्ठानासी।ओढोनिया मूलाधारेसी। स्वस्थ उगा राही की ॥११॥मग सोडी वर प्राण। दोन्ही मिळवी प्राण अपान ।अनाहती विश्वघ्न । दैवत वसे असे जाणबा ॥१२॥गुरु असावा सामोरी। मेरूची गाठ उठते वरी।श्वास रोधी रे निर्धारी। हठयोग असा स्वानुभूत ॥१३॥क्षणोक्षणी चक्रे दिसती। नित्यनियमे जप चालती।षड्चक्रांचे भंवती। अनुभव ऐसा ॥१४॥त्रिकुटी मिळती मुद्रा तीन । भ्रमरगुंफेसी जाती दोन ।पश्चिमेसी तिसरा जाण। एक मार्ग जात असे ॥१५॥पुढे दिसे वैकं ठनगर। अनंत रंगाचे माहेर।उभी असे द्वारी नार। माया राणी ॥१६॥पुढे तया नगरा आंत । कोटि सूर्यप्रकाश दिसत ।गुरूदर्शनाचा एकांत । लाभे तया स्थळी ॥१७॥पाहणे अधिक दिसणे। होती एक अद्वैतपणे॥समाधी राही तयागुणे। अखंडित ॥१८॥मार्गक्रमण कीजे हळूहळू । जैसे तीन महिन्याचे बाळू ।जेवि पिपिलिकेचा खेळू । चालतसे ॥१९ ॥जरी हठयोग केला। हट्टानेचि पुढे गेला।तरी तो हट्ट पाहिजे मुरविला। प्रेमामध्ये ॥२०॥ब्रह्मानंदी उठती लहरी। न चाले द्वैताची फेरी।राहोनि निवांत जैसे तैशापरी। आनंद करी परिपूर्ण ॥२१॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे । वेदान्तसार संमते ।तुकड्यादास विरचिते । पंचम प्रकरण संपूर्णम् ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP