मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन Translation - भाषांतर बहुत ग्रंथ जरी करिशी पठण। तरी चंचल होय मन जाण।आता संख्या! निवांतपण। करी येथे ॥१॥नाना साधने नाना सुविद्या। नाना पंथ, नाना कुविद्या ।ही सर्वही जगद्वंद्या- I साठी करिजेत॥२॥जोवरी न होय एकाग्र मन । तोवरी करिशी यांत भ्रमण।जेथे सद्गुरुचे चरण। न आढळती॥३॥बोलणे तुला सत्य खास । होई स्वदेहावरी उदासलागे त्वरित सद्गुरुपदास। यापरता मार्ग नाही ॥४॥सेवा करी रे लक्ष लावूनि। तेणे होशील आत्मज्ञानी ।मुक्ति लाभेल तुजलागूनि। तत्त्वविचारे वागता॥५॥पुढे जरी करिशी श्रवण। तरी अल्प सांगेन साधन ॥पंचमुद्रा त्या कवण। परियेसी गड्या। तूं ॥६॥भूवरी चाचरी अगोचरी। खेचरी घेऊनि अलक्ष्य अवधारी।सांगेन परोपरी। उकलोनिया ॥७॥ठेवोनि दृष्टि नासिकाग्री। लक्ष देइजे पृथ्वीभीतरी ।तंव ती झाली भूचरी। मुद्रा पहा ॥८॥दृष्टि असता सम। होईल अगोचरीचे काम ।तीक्ष्णपणे पाहता प्रेम। देईल चाचरी ॥९॥जरी पाहशी ऊर्ध्वीकडे । खेचरी मुद्रा सहज घडे ।आता अलक्ष्याचे पवाडे । सांगतो ऐक ॥१०॥दृष्टि ठेवोनि ऊर्ध्व जाण । नेत्र दुखावती क्षणोक्षण ।वामभागी लक्ष पुरवून । अलक्ष्य मुद्रा साधीरे ॥११॥जंव दष्टि फिरविशी आप। तंव चक्राकार दिसे कंप।पढे नीलवर्ण दिसे चाप। तीच खूण तूर्येची ॥१२ ॥श्रवण मनन निजध्यास । एकाग्र करिशी सावकाश ।तंव तूर्येचा आभास । दिसो लागे ॥१३ ॥रंग तूर्येचा श्यामता। वारंवार पाहो जाता।पीत रंग दिसे त्राता। अद्वैतपणे ॥१४॥पाहणे दिसणे एक होता । लागे उन्मनि अवस्था ।नाभी-कुंडलिनी निगुता। चढे ब्रह्मरंध्री ॥१५ ॥ऐक राया! सांगू वचन । मुद्रेमध्ये रे खंडणIसमाधीचे उत्थान । पावोनि हळू चालावे ॥१६॥प्रथम करोनि पद्मासन । नासिकाग्री नेत्र फिरवून ।दोन्ही अंगुष्ठे श्रवण। बंद करी तत्काळ ॥१७॥नेत्री ठेवोनि तर्जनी। मध्यमा ती नासिक स्थानीमुख अनामिके रोधोनी। श्वास बंद करी तो ॥१८॥ऐसे कीजे दोन्ही करे। लक्ष देइजे सामोरे ।गुरु घेवोनि हाते रे। तदनंतरे पाहावे ॥१९॥शंख मृदंग आवाज। स्पष्ट ओळखो ये सहज।प्रभा फाके गगन-शेज। दंग वृत्ति राहतसे ॥२०॥वृत्तिसाठी ही साधने । रंगरूप सकळ मिथ्या ज्ञाने।ध्वनि मुद्रांची मायिक भूषणे । ब्रह्मरूपी न उरती ॥२१॥झालिया एकाग्र साधन । अलक्ष्य लक्षावे विंदाण ।लक्ष ठेविता अलक्ष्य जाण । होशील पूर्ण गुरुकृपे ॥२२॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।तुकड्यादास विरचिते । चतुर्थ प्रकरणम् ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP