मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा Translation - भाषांतर श्रोती व्हावे सावधान । प्रेमे बोलेन काही खूण ।जरी सद्गुरुकृपा जाण। पाहिजे तुम्हां ॥१॥जरी जिज्ञासू शिष्य झाला। हदये इच्छी उद्धरण्याला ।तयाने वैराग्यदृष्टी सद्गुरूला। शरण जावे ॥ २ ॥जाणावे सद्गुरुचे लक्षण । पुढे कळेल त्याची खूण॥सद्गुरुपासोनि आत्मज्ञान। प्राप्त करावे ॥३॥ ज्ञान झालिया मागुती। बोधे बाणे सहजस्थिति ।श्रद्धा ठेविता अपरोक्षप्राप्ति । ज्ञाने अद्वैती वृत्ति रमे ॥ ४ ॥प्रथम घ्यावं वैराग्यज्ञान । तेचि करावे शुद्ध वैराग्य जाण ।गुरुपासोनि माहिती पूर्ण । घ्यावी अनासक्तीची ॥ ५ ॥जरी म्हणशी प्रपंची बुडतो। तरी परमार्थ न साधे तो।दोन्ही मार्ग चालू म्हणतो। तो पार कैसा पावेल? ॥६॥संती निर्णित केले होते। सहजासमाधी कवण्या पंथे।पाणियांत असोनि कमळ ते । निर्लेप राही जयापरी ॥७॥पाणी असे पुरुष दोन । पुष्प राही वरीचि जाण ।प्रपंची वासनाक्षयाचे प्रमाण । सद्गुरुलागी पुसावे ॥८ ॥त्या मार्गे शुद्ध वैराग्यी बनशी। मग निजगुह्याचा बोध घेशी।तया बोधास्तव श्रवणेसी। सादर होई आवडी ॥९॥या करिता पुढे श्रवण मनन । त्याचेनि घडे निजध्यास जाण।तेणे होईल स्वानुभव पूर्ण । तुझिये दृष्टी ॥१०॥या सर्व साधन-मिळणी। ग्रंथ वाचावे एकान्त स्थानी।परोक्ष होता निरूपणी। गुरुमुखे रंगोनि जावे ॥११॥ऐकोनिया श्रीगुरुचा बोध । तुज विराले दिसती जगबंध।बनेल विदेहस्थिति अगाध । परमानंदे डुलशी तू ॥१२॥अनंत पुण्याने लाभला। नरदेह हिरा हाता आला।नराचा नारायण झाला । तो ऐसिया कृती निर्भयपणे ॥१३॥सांगू केवी गुरु-महिमान। सद्गुरू तोचि देव जाण ।धरी धरी रे तयाचे चरण । आण माझ्या गळ्याची ॥१४॥चित्त-एकाग्रते कारणे । साधावी अजपादि साधने ।परी अंती आत्मज्ञाने । अद्वैत व्हावे गुरुबोधे ॥१५॥कवण चक्र कैसे पाहावे । ते गुरु योगेश्वरमुखे ऐकावे ।मग अनुसंधान लावावे । तया चक्राचे ॥१६॥श्रीगुरुच्या बोधे करून । जंव पाहशी सात रत्न ।तव साधूनिया आत्मज्ञान । ब्रम्हानंदी डुलशी तू ॥१७॥आता फार बोलू काय । धरी रे आत्मज्ञानाची सोय ।तया वाचोनिया उपाय । ते अपाय होती सर्वहि ॥१८ ॥इतिश्री आनंदामृत गंधे। वेदान्तसार संमते।तुकड्यादास विरचिते । अष्टम प्रकरण संपूर्णम् ॥८॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP