मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ॐनमोजी विनायका । स्वरूपसुंदरा सुखदायका !सकळ विघ्न निवारका । मूळपुरुषा गजानना !॥ १ ॥सरळ सोंड नासिक । लंबायमान लवचिक ।दंती तेजाची झुळुक । दीप्ति पड़े मुखावरी ॥ २ ॥मस्तकी मुकुट रत्नांकित । कंकण मुद्रिका मंडित हस्त ।उदरी त्रिवळी शोभत । त्रैलोक्य संपूर्ण भरले असे ॥३॥तू सिद्धिबुद्धीचा दाता । सकळ विद्यांचा भर्ता ।सकळ कलांचा अधिष्ठाता । सबल मायाभंजना ! ॥ ४ ॥तूचि सर्व सृष्टीचा कर्ता । मायातीत गुणभरिता !तू ब्रह्म सनातन अव्यक्ता ! निर्विकारा जगद्वंद्या ! ॥ ५ ॥तुझे वर्णू जाता गुण । वेडावला चतुरानन ॥वासुकी पावोनिया शीन । जिव्हा चिरोन बैसला ॥ ६ ॥श्रुतिस्मृतीचे भांडार । उकलिता सापडे सार ।ऐसा अगम्य अगोचर । लंबोदर मूर्ति तू ॥ ७ ॥तुझा ऐसा गुणार्णव । वर्णावया न चले वाव॥तेथे मी अल्पमति मानव । काय वर्णं शके? ॥८॥ग्रंथरचनेची आर्त । मने घेतली स्फूर्त ।निर्विघ्न करी सावचित्त। विनवणी हेचि असे ॥९॥आता नमूं शारदा सुंदरी। हंसवाहिनी बीणा करी।शुभ्रवसन, कंचुकी वरी। शोभे सुंदर मौक्तिकांनी ॥१०॥कपाळी कुंकुमतिलक। वाटे के वळ माणिक ।नासिकेचे झळक ती मौक्तिक । प्रभा पडे मुखावरी ॥११॥रत्नखचित किरीट । मस्त की शोभे लखलखाट ।पदी जोडवे अनुवट। काय वर्ण शोभा ती ॥१२॥मस्तकी कुरळ केशकलाप। जण दिसे षट्पदांचा गुंफ।सुगंध देखोनिया अमूप। भ्रमर घालिती रुंजीते ॥१३॥आदिमाया मूळप्रकृति । चहू वाचांची जन्मदाती।सकळ विद्यांची स्फूर्ति । देशी भक्तां लागुनी ॥१४ ॥तरि या ग्रंथाचिये अवधाने । रस भरी वो रसने ।दास- इच्छा कृपादाने। पूर्ण करी कृपावं ते! ॥१५॥आता मागणे यापरी। मम रसनेवरी वास करी।रंग कला नाना कुसरी। ग्रंथामाजी ओवी वो ॥१६॥यथामति तुझे स्तवन । केले असे अल्प जाण।प्रेमभरे करी ग्रहण। हीच सेवा दासाची ॥१७॥गंगोदके गंगापूजन। जेवि करिती सज्जन ।तेवि वागीश्वरी तू असोन । तुझी वाणी तूज ओपिली ॥१८॥लोकसेवेचे निमित्त करून । मने घेतली धाव जाण।म्हणोनि आनंदामृत गंथ प्रमाण । निरूपणार्थ घेतला ॥१९॥महाराज आडकोजी समर्थ । तुकड्यादास तयाचा अंकित ।सेवूनि तयांचे पदामृत। चरणी लीन जाहला ॥२०॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे।वेदान्तसार संमते ॥तुकड्यादास विरचिते । प्रथम प्रकरण संपूर्णम् ॥१ ॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP