मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप Translation - भाषांतर नमो आता सद्गुरुनाथा! कर द्वय जोडूनि नमितो त्राता!मज लाविले नाथपंथा। त्वांचि येवोनिया ॥१॥तुझे नवल वर्णावया। वेदहि शिणले वाया।ऐसा तू कृपाळू गुरुराया ! धन्य लीला तुझी ॥२॥त्वाचि उपजविला भक्ति भाव । तूचि जगाचा उद्घारिता राव।निर्मिले ब्रह्मा विष्णु महादेव । तुझेचि शक्तियोगे ॥३॥तव स्वरूप वाटे सत्य सुंदर। मुळी असशी निर्विकार।निरंजना! तुज नसोनि आकार। दाविशी लीला जगी पै ॥४॥वाढविले देव- महिमान । जगी प्रगटला भक्तिकारण।असोनिया स्वयेचि पूर्ण । पूर्णात्मा चितूनि दाविशी॥५॥पाहोनिया तुझे स्वरूप। उद्धरलो वाटे आपोआप।सुटे कामक्रोधासी कंप। वास करी क्षमाशांति॥|६॥उडता धूळ तव चरणांची। कायावाचा साची।तुटे बाधा द्वैताची। अद्वैत जोडी लाभूनि ॥७॥आता नमस्कार तुजलागूनि। अन्य दुजा कवणा न मानी।तूंचि मूळ कर्ता जाणोनि । शरण आलो तवपायी ॥४॥प्रेमे गाता तव महिमा। तन्मय होई अंतरात्मा।चालविणे नलगे इसर नेमा । गुण जो नित्य गाई तुझे ॥९॥तूचि केला देश समोर। इतरांचा न लागे थार।जेथे शिणला धराधर। तूचि आधार गुरुराया! ॥१०॥त्वाचि वाढविला भक्ति-पंथ । बहुत उद्धरिले पापी अनाथ ।न पाहशी शुद्ध शेत। कृपा करिशी दीनावरी ॥११॥तूंचि प्रेमानंद सदोदित । राहशी सर्वांशीहि अलिप्त ।तुझिया नामाचा पंथ । वाढू लागला जगामाजी ॥१२॥काय उतराई होऊ संता। लाविले जेणे भक्तिपंथा।परमहंस कृपानाथा। वरदान देई दासासी ॥१३॥तूचि सद्गुरु रूपे येऊनि । उत्पत्ति स्थिति लया दावूनि ।कर्ता-कारण-करणी। घेतली हाती तुवा ॥१४॥विधिरूपे उत्पत्र करिशी। विष्णुरूपे प्रतिपाळिशी।महेशांगे संहारिशी। सूत्रधारी तूचि एक ॥१५॥जागृति स्वप्न सुषुप्ति तूर्या । साक्षि तूचि गुरुवर्या !।उपजोनि सृष्टि जाई विलया। नित्य तुझ्या दृष्टिपातें ॥१६॥सकळ सूत्रे तुझ्या हाती। अभक्ता लाविशी भक्तिपंथी।रिद्धि सिद्धि लोळती। चरणी तुझे ॥१७॥तूंचि चराचरांचा कर्ता। सर्व जग हे तुझीच वार्ता ॥इच्छेनुरूप केली समर्था ! फार काय बोलू? ॥१८॥पूर्ण ईश्वर गमसी मजला। शरण जाऊ मी कवणाला?।जैसा देही स्वर्ग उतरला। दुमदुमोनिया ॥१९॥गुरुराया! तुझे आसन । दशव्यावरी करिशी शयन ।जेथे नलगे मानपान। वासना आदि ॥२०॥आता तन मन धनदि करून। तुला अर्पिला हा प्राण।मज देई देई ज्ञान । ग्रंथवचन वदावया ॥२१॥माझिया सद्गुरो मुरारी! धाव धाव गा जिव्हाग्री।बैसवोनिया सत्रावी-तिरी। लोटवी पाझर प्रेमाचा ॥२२॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।तुकड्यादास विरचिते । द्वितीय प्रकरण संपूर्णम् ॥२॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP