मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण सोळावे – अंतिम-कथन आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण सोळावे – अंतिम-कथन सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण सोळावे – अंतिम-कथन Translation - भाषांतर थोडे करीन अंतिम कथन । साधु नसे म्हणती जन।सर्व भोंदूचे थैमान। जगी चाले॥१॥एक म्हणती देव नाही। सर्व माया-लेख पाही।आपण करू जे लवलाही । तेचि होय पैं ॥२॥तरी हा विकल्प सांडोन। करा स्वयेचि साधन ।मुमुक्षूसी सद्गुरुचरण। लाभतील आपसया ॥३॥दांभिकांच्या जाळी न पडा। कानफुकणी दूर सांडा।साधा सत्संग चोखटा। निवडोनिया विवेके ॥४॥अंतःकरण होता शुद्ध। लाभे आपेआप सद् बोध ।ज्ञानतत्त्वचि गुरुदेव सिद्ध। कृपा लाभे साधनी ॥५॥दूर होता जिवीचे मळ । प्रगटे परमात्मरूप सोज्ज्वळ ।आत्मसुख लाभता जंजाळ। दूर होय भोगांचे ॥६॥अरे! जाणा आता खरे। काय भ्रमता जगतांत रे!करा पांडुरंगा सोयरे। माझिया बापा! ॥७॥लोकी सत्य पाहाल काही। तरी ते न दिसे सर्वथाहि ।म्हणोनि स्वये सत्कर्म पाही। केलेचि करा ॥८॥सत्कर्मासाठी ईश्वरी सत्ता। देव देईल सुफळ तत्त्वता।की जेणे स्ववेचि देव होता। वेळ न लागे ॥९॥एक म्हणती हेचि कथन । महाग्रंथी झाले जाण ।यांत काय हो प्रमाण। विशेष ते? ||१०॥अरे! जन्मापासूनि कर्म करणे। तेच ते वेळोवेळा अनुसरणे।तैसे केले तुकारामाने । जे ज्ञानदेवे हि संपादिले ॥११॥ऐसे नवीन झाले जे काही। अंधश्रद्धा सांडोनि पाही।जुने चि रूपांतर तेहि। धरा वेगी प्रसंगोचित ॥ १२ ॥प्रथम बीज मध्ये बीज । फळी पुष्पी गुप्त सहज ।अहो! शेवटीहि बीज। तेचि तेचि ॥१३ ॥परी पुरातन बीजाहूनि। नसे नव्यामाजी उणी।हदयभूमीमाजी पेरूनि। सुखी व्हा रे! ॥१४ ॥अधिक न कळे फार मज। थोर ग्रंथांचे ते गुज ।स्वामीकृपे सत्य ते सहज। बोलिलो मी ॥१५॥सहज पावलो चिमूर ग्रामी। विठ्ठल गुरुमूर्ति-प्रेमी।फाल्गुन वद्य द्वितीयेसि नेमी। तेथे केला ग्रंथारंभ ॥१६॥विचारणा झाली जी खचित । ते ते वदलो प्रमाणभूत ।घेऊनि बहुतांचे संमत । अनुभवयुक्त जुनेहि जे ॥१७॥स्वानंदाचे अमृत । जे आत्ममंथने होय प्राप्त ।जयाचेनि जीव प्रशांत । सुखदुःखातीत होतसे ॥१८॥ते लाभावे सकळासी। याची पात्रता मनबद्धीसी।म्हणोनि दाविले बहु साधनांसी। प्रकृतिभेदा जाणोनि ॥१९॥करोनि सुगम साधन-निश्चय। साधूनि सत्संगाची सोयआत्मरंगी व्हा हो निर्भय । सद्गुरुकृपे निजाभ्यासे॥२०॥हाचि असे येथीचा सार । करा पावन हा संसार।आपण तारोनि व्हा सादर । तारावया सर्व जीवा ॥२१ ॥आता अधिक सांगो काय। धरा आपुली आपण सोय।संती कथिला हाचि उपाय । माझिया बापा! ॥२२ ॥संवत् एकोणवीसशे त्र्यांशी। प्रभव नाम संवत्सरासी।आषाढ शुक्लपक्षेसी। तिथि असे द्वितीया ॥२३॥भृगुवासरी शुभ योगी। हरिस्मरणी लागवेगी।सद्गुरु-चरण शिरोभागी। वंदोनि ग्रंथ संपविला ||२४ ॥इति श्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।तुकड्यादास विरचिते । षोडश प्रकरण संपूर्णम् ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP