मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे Translation - भाषांतर सद्गुरु कैसा करावा हा प्रश्न । याचे सांगतो गा निरूपण।कवणा गेलिया शरण। मुक्ति लाभे? ॥१॥कवण सद्गुरु कैसा करावा? कवणापायी भाव ठेवावा?की जो तया अन भवा। पाववील ॥जगी बहुविध संतजन । कित्येक ते पोटाकारण।कित्येक ध्यानस्थ मौन धरून। बसती पहाडी ॥३॥कित्येक भजनी संत होती। कित्येक नवविधा पंथ धरिती।कित्येक योगरूपे राहती। जगामाजी॥४॥कित्येक मचविती ढोंग। कित्येक घेती स्वामी- सोंग।कित्येक औदासीन्याचा रोग। शिरी धरिती ॥५।कित्येक दाविती चमत्कार । भूत – भविष्याचे आडंबर॥कित्येक परोक्षी निर्भर। जगामाजी ॥६॥कित्येक नारळ दुपट्टा घेती। जनी बहूत शिष्य करिती।शिष्यास सेवे राबविती। मी गुरु* म्हणवोनिया ॥७॥कित्येक विदेहरूपे राहती। कित्येक कोणासहि न कळती।कित्येकांची सिद्ध स्थिति। अबाधित राहे ॥८॥गुरु शोधावा यामधून । सत्य मत तयाचे जाण ।नित्यानित्य-विवेक करून । पाहील जो सत्यवस्तु ॥९॥न घे जो शिष्याची सेवा। शिष्य गुरुत्वे मानावा ।सत्य – स्वरूपी मेळवावा। ऐसे मत ॥१०॥शमदमादि साधने । ठेवियली स्वाधीन जेणे।स्वरूपावाचून अन्य नेणे। सोहं तोचि सद्गुरु ॥११॥ऐसा करावा सद्गुरुराव । तेथे वसावा शुद्ध भाव ।करील जो पार नाव। सत् शिष्याची ॥१२॥जी जी निघेल परमार्थ शंका। सदगुरु फेडोल ती कुशंका।सत् शिष्याचा मान राखा। असे म्हणोनिया ॥१३॥ज्याचा असेल शुध्दभाव । तया नलगे काही उपाव ।कोणताहि फळे त्या गुरुदेव । सुदृढतेने ॥१४॥शद्ध भाव व्हावयासी। जावे लागे संतापाशी।या कारणेच मानसी। गुरु भजावा ॥१५॥जयाची फिटे अज्ञानदृष्टि । लागे चित्तशद्धीचिये पाठी ।तये स्वरूप-ज्ञानासाठी। सद्गुरु करावा ॥१६ ॥अद्वैत करील जो वृत्ति । षविकारांतुनि फिरवी मतिसदा नामस्मरण-पंक्ति । घोषवी जो ॥१७ ॥ऐसा काढावा शोधून । सिद्धस्थिति ज्याची जाण ।तया साष्टांगे नमन। करावे वेगी ॥१८ ॥करावे आज्ञेचे पालन। वेचूनि घ्यावे ज्ञानकण ।तत्त्वनिष्ठेने सेवा पूर्ण । शंका-समाधान निश्चये ॥१९॥यास्तव शिष्य कैसा असावा? जेणे परमार्थ साधावा।जयास मोक्षचि व्हावा । यमनियमी बरबा तोचि तो ॥२०॥अपरोक्ष नाही मज ज्ञान । मी तो बालक अज्ञान ।परी सद्गुरुकृपे करून । वदलो असे ॥२१॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते ।तुकड्यादास विरचिते । दशम प्रकरण संपूर्णम् ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP