मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
मोक्षदायी नाम

श्री स्वामी समर्थ - मोक्षदायी नाम

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


मोक्षदायी नाम तुझे स्वामी समर्थ दातार ।
तुझ्या पवित्र चरणी नतमस्तक संसार ॥

डोळा पाहुनीया मूर्त माझ्या हृदयी ठसावी ।
रात्रंदिन ध्यानीमनी स्वामी माउली स्मरावी ॥

व्यर्थ संभ्रमी गुंतलो आता शिणले अंतर ।
नको मोह दंभ माया घाली कृपेची पाखर ॥

स्वामी समर्थ जपता घालू साष्टांगे नमन ।
उभा राहील पाठीशी प्रगटता दयाघना ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP