मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
प्रकाशदाता

श्री स्वामी समर्थ - प्रकाशदाता

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


स्वामिनाथ भूवरी प्रगटला
प्रकाशदाता भास्कर गमला

दु:खाने जग होते भरले
सावलीस जन जणू विसरले
अहंभाव, अभिमानी रुतले
घनअंधारा दूर कराया
योगी अवतरला
स्वामिनाथ भूवरी प्रगटला

मानव मानव एकच जाती
मानवता ही एकच जाती
मानवता ही एकच निती
लाभावाचुन द्यावी प्रीती
'विश्वबंधुता' मंत्र तयाने
स्वयेच आचरिला
स्वामिनाथ भूवरी प्रगटला

प्रपंच मांडुन निज भक्तांचा
त्रिगुणात्मक हा दत्त दयेचा
योगिराज त्रिभुवन कीर्तीचा
अत्रिवंश कुलदीप गोजिरा
अंतरिचा कोवळा
स्वामिनाथ भूवरी प्रगटला

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP