मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
कृपायोग

श्री स्वामी समर्थ - कृपायोग

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


मनी माझ्या नाचे । वासनांचे भूत
विवेकाचे सूत । जमेचिना

ध्यान लागो आता । पायी समर्थांच्या
वासना हराव्या । अंतरीच्या

चित्त लागो आता । समर्थ चरणी
कीर्तन भजनी । दंग होता

भेदाभेद मनी । असे अमंगल
लेकुरे सकळ । ईश्वराची

आवर घलिशी । तूच जादूगार
केवळ अपार । खेळ तुझा

स्वामींचे चिंतन । स्वामींचे पूजन
समर्थ साधन । जन्मभरी

स्वामींच्या कृपेचा । योग आज आला
जीव धन्य झाला । ईहलोकी

धाव घाली आता । नको चालू मंद
मिळो ब्रम्हानंद । तुझ्या भेटी

हृदय मांदिरी । लावियला दीप
उजळे प्रकाश । स्वामी कृपे

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP