मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
सांभाळी सदया

श्री स्वामी समर्थ - सांभाळी सदया

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


स्वामी समर्था, सद्गुरू राया
सांभाळी सदया
भक्ता, सांभाळी सदया

तू सर्वेश्वर तूच दिगंबर
तूच कृपेचा अथांग सागर
अविरत गातो नाम समर्था ओवाळून काया
सांभाळी सदया

मी अज्ञानी लेकरू
वत्सलेचा तूच आगरु
परममंगला अत्रिनंदना अघटित तव माया
सांभाळी सदया

सगुण रूप हे ध्यान मनोहर
प्रज्ञापुरि तव वास निरंतर
छत्रचामरे ढाळित वट हा धरी छत्रछाया
सांभाळी सदया
भक्ता, सांभाळी सदया

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP