श्री स्वामी समर्थ - वटवृक्षचि हा
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !
वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी
आसमंत हा अखंड गातो दत्त प्रेमलहरी
इथे प्रकटला दत्त दिगंबर
श्री स्वामींच्या रुपे भूवर
आशीर्वच हा, दत्त कृपेचा वर्षत सकलांवरी
वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी
श्री स्वामींची अमृतवाणी
भक्तिफुलांची सुंदर लेणी
प्रज्ञानगरी त्यांच्या योगे झाली अलकापुरी
वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी
भजनानंदी तल्लिन व्हावे
देहभान अवघे विसरावे
अवधूताच्या नामचिंतनी पावन हो वैखरी
वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी
सगुण रूप हे ध्यान मनोहर
मुक्तींचे मोहर शुभंकर
वास करितसे सदैव अपुल्या भक्तांच्या अंतरी
वटवृक्षचि हा छत्र धारितसे स्वामी समाधीवरी
N/A
References : N/A
Last Updated : May 23, 2023
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP