मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
नीज नीज दत्तात्रया

श्री स्वामी समर्थ - नीज नीज दत्तात्रया

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


बा नीज सुखे बाळा स्वामी सदया
नीज नीज दत्तात्रया
मी जोजविते माता तुज अनसूया
नीज नीज दत्तात्रया

त्रिगुणात्मक तू असशी रे लडिवाळा
मी केले तव प्रतिपाळा
या भूमीचा तूची पालनहार
पतितांचा करि उद्धार
तू भक्त सखा झालासी
त्या हृदयी तू वसलासी
ते स्थान तुझे अविनाशी
त्या युगे युगे लाभो तुझीच छाया
नीज नीज दत्तात्रया

विश्वात्मक तू ब्रम्ह सनातन थोर
तव माया अपरंपार
भावसागर तू करून देशी पार
संकटी तुझा आधार
अवतार तुझा यतिवेषी
तू प्रयाग आणिक काशी
माहेर मुक्तिचे असशी
बा करुणेशा स्वामि समर्था राया
नीज नीज दत्तात्रया
मी जोजविते तुझा पाळणा रया
नीज नीज दत्तात्रया

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP