मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ चरणी|
अत्रितनय दत्तात्रय

श्री स्वामी समर्थ - अत्रितनय दत्तात्रय

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतारी महामानव !


अत्रितनय दत्तात्रय
प्रज्ञापुरि राहिला
सगुणरूप पद्मासनि
चिंतनात रंगला

स्वामींचे करित स्तवन
देवदूत सूर्यकिरण
वंदितात विमल चरण
दत्त दत्त गात अनिल
हर्षभरित जाहला

हसति फुले तरु डुलती
पक्षीगण नृत्य करिति
मोद भरे त्या चित्ती
भक्तवृंद मांदिरात
तव भजनी गुंगला

आसमंत दरवळला
भाव सुगंधे भरला
स्वर्ग इथे अवतरला
भक्तीच्या अमृतात
जीव आज नाहला

श्रद्धेची सांजवात
लावियली मांदिरात
उजळित ये अंतरात
नतमस्तक होत इथे
विश्वंभर पुजिला

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP