मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : kisangirisantstotraकिसनगिरीसंतस्तोत्र श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र Translation - भाषांतर ज्या संगतीनेच विराग झाला । मनोदरीचा जडभास गेला । साक्षात् ईश्वर मज भेटविला । विसर कसा मी गुरुपादुकाला ॥ सद्योगपंथे घरी आणियेले । अंगेच माते परब्रह्म केले । प्रचंड तो बोधरवि उदेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥चराचरी व्यापकता जयाची । अखंड भेटी मजला तयाची । परंपदी संगम पूर्ण झाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥जो सर्वदा गुप्त जगात वागे । प्रसन्न भक्ता निजबोध सांगे । सद्भक्तिभावाकरिता भूकेला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥अनंत माझे अपराध कोटि । नाणी मनी घालूनि सर्व पोटी । प्रबोध करिता श्रम फार झाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥काही मला सेवनही न झाले । तथापि तेणे मज उध्दरीले । आता तरी अर्पिन प्राण त्याला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥माझा अहंभाव असे शरीरी । तथापि तो सद्गुरु अंगिकारी । नाही मनी अल्प विकार ज्याला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥आता कसा हा उपकार फेडू । हा देह ओवाळूनी दूर सोडू । म्या एकभावे प्रणिपात केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥ज्या वानिता वानिता वेदवाणी । म्हणे नेतिनेंति ती लाजे दुरुनि । नव्हे अंत:पार ज्याच्या रुपाला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥जो साधुचा अंकित जीव झाला । त्याचा असे भार निरंजनाला । नारायणाचा भ्रम दूर केला । विसरु कसा मी गुरुपादुकाला ॥मंत्रपुष्पांजलि ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्य: संति देवा: ॥ॐ राजाधिराजाय प्रमेह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामानू कामकायाय महयं । कामेश्वरी वैश्रवणो ददातु ।कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नम: । ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्य स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठयं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात् सार्वभौम: । सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथ्विव्यै समुद्रापर्यन्ताया एकराळिती । तदप्येषश्र्लोकोऽ भिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति ॥ N/A References : N/A Last Updated : December 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP