मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| अध्याय नववा श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र श्री किसनगिरी विजय - अध्याय नववा देवगडचे श्री किसनगिरी महाराज यांचा जन्म सन १९०७ साली झाला आणि त्यांनी १९८३ साली समाधी घेतली. Tags : kisangirisantकिसनगिरीसंत श्री किसनगिरी विजय - अध्याय नववा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: । दासाहाती देउनी लेखणी । कवित्व सांगे चक्रपाणी । मी तो नुसता निमित्तकारणी । तंव कृपा माधवा ॥१॥आता दोन धामाचे वर्णन । वदेन आपुल्या कृपेनं । भक्तरक्षका दयाघन । नानारुपे प्रगट्शी ॥२॥संत जनाबाईच्या घरी । जाते ओढिले तूं मुरारी । नाम पालटोनि किसनगिरी । प्रगटला ऐसे भासतसे ॥३॥म्हणूनी पवनाच्या हाती । पसरली तुमची ख्याती । सांगितली जगा न्यायनीति । धर्म आपुला रक्षविण्या ॥४॥आता गुरुशिष्य दोघेजन । आणिक जमवूनी भक्तगण । तीर्थयात्रे कारण । निघते झाले मिळोनी ॥५॥श्री संत मुक्ताबाई संस्थान । महतनगर पुण्यवान भास्करगिरीचे गुरुआसन । तेथ नमून निघाले ॥६॥पुढे नमिले ॐकारेश्वर । नर्मदेकाठी रमावर । ज्योतिर्लिंग विश्वेश्वर । तयेठायी नमियेला ॥७॥तेथे साधुंचे आश्रम । सृष्टीसौंदर्य अनुपम । सत भक्तांचे पुण्यधाम । विश्वकर्मे रचियेले ॥८॥उज्जैन चित्रकुट प्रयाग काशी । गया अयोध्या नैमिषारण्यासी । कलकत्ता कालिका दर्शनासी । गंगासागर पाहिले ॥९॥तेथ समुद्रप्रवास । घडविला भक्तगणांस । विवेकानंद आश्रमांस । भेट दिली संतांनी ॥१०॥जगन्नाथपुरी तिरुपती । मल्लिकार्जुन पाताळेश्वरी । समुद्रस्थान रामेश्वरी । कन्याकुमारी देखिली ॥११॥पुढे देखिले गोकर्ण महाबळेश्वर । किष्किंधा ऋष्यमुख पर्वतावर । आणिक देखिले पंपासरोवर । ऋषीमुनीचें आश्रम ॥१२॥पुढे शबरी आश्रम देखिला । परत मार्गे पंढरपुराला । नमोनी रुक्मिणीवराला । स्वस्थानासी पातले ॥१३॥पाहा श्रोते भाविक जन । गुरुंसी घडविले तीर्थाटन ॥ आणि भाविक भक्तगण । यात्रा करुनी पातले ॥१४॥तरी या तीर्थाचे कथन श्रवण करिती भाविक जन । कोण्या ठायी बाबा किसन । प्रगटले कैसे सांगेन ॥१५॥याचे करिता पठण । कळेल सद्गुरुंचे थोरपण । सहज घडेल तीर्थ दर्शन । माय भगिनी जनांस ॥१६॥करीत असता तीर्थे सुंदर । दशरथाचे अयोध्या नगर । सुंदर एका उपवनात । भोजनासी बैसले ॥१७॥अवघ्या भक्तांच्या मेळी । किसन शोभे वनमाळी । बैसुनी सर्व एकमेळी । भोजन करिती प्रेमाने ॥१८॥तये ठायी वानर । जमा झाले दोनचार । फराळ टाकिती त्यांचे समोर । परि ना सेविती तयासी ते ॥१९॥मग एक वानर । बैसले येऊन बाबांसमोर । भोजन करा म्हणता सत्वर । भोजनासी बैसले ॥२०॥एका पात्रात भोजन करिते झाले दोघेजण । जैसे शोभती राम हनुमान । भेदचि नसे उरलाची ॥२१॥सर्व भोजन उरकुनी । किसनगिरिसी नमोनी । वानर बैसले दूर जाउनी । हे तो आश्चर्य केवढे ॥२२॥ऐसेची तिर्थाच्या ठिकाणी चमत्कार आले घडूनी । तेथील ऋषीमुनी । जणु ओळखती बाबांसी ॥२३॥पूर्वी बाबा बालवयात ॥ आले असे या तीर्थाप्रत । ही गोष्ट ऋषींच्या ध्यानात । राहिली असे पूर्वीच ॥२४॥जात असता गंगास्नानासी । ऋषीमंडळी होती तीराशी । त्यांनी देखता किसनगीरीसी । स्नान घातले प्रेमाने ॥२५॥षोडशोपचारे पुजुनी बाबांस । नेते झाले आश्रमास । तेथे बाबांच्या दर्शनास । समस्त ऋषी जमलेती ॥२६॥आश्चर्य करिती भक्तमंडळी । ऋषी बैसले बाबाजवळी । भास्करगिरी भक्तांच्या मेळी । जैसा कानिफा शोभला ॥२७॥आता पाहा श्रोतेजन । किसनगिरी कोठले कोण । परि संतांचे महिमान । जाणति संताचि एक ते ॥२८॥संत ओळखी संताची खूण । इतरांसी काय कार्ण । घडले बाबांचे दरुशन । ऋषी म्हणती धन्य झालो ॥२९॥आणिक पंपा सरोवर । शबराच्या आश्रमावर । भक्तांसमवेत श्री किसनगिर । तया ठायी पातले ॥३०॥ही शबरी म्हणाल कोण । ती तो जातीची भिल्लीण । तियेचीच कुळी जाण । किसन अवतारी जन्मला ॥३१॥मायपित्याच्या घरी । शबरी असाता कुमारी । पाहुणे आले तयाचे घरी । नोवरी पाहण्या कारणे ॥३२॥तव शबरी बोले पित्यास । लग्न कासया आम्हास । मग सोडूनिया पितृगृहास । अरण्यवास सेविला ॥३३॥पंपा सरोवरी येऊन । तेथे ऋषींचा आश्रम देखून । त्यांचियाची आश्रयाने । राहू लागे वनामध्ये ॥३४॥.य्त य्प-स्ज़्च गनित्य रामभक्ती करुनी । भक्तिभावेची सुमने अर्पूनी । तयांचा निकट आश्रय करुनी । रामध्याने रंगली ॥३५॥पंपा सरोवर जाउनी । प्रभातकाली येई स्नान करुनी । श्रीराम चरणी मन अर्पूनी । ब्रह्मानंदे डुल्लतसे ॥३६॥ऐसे लोटले बहुत दिन । एक दिन पुसे ऋषीकारण । केव्हा भेटेल दयाघन । राम माझा ईश्वर ॥३७॥तिये बोल्से ऋषीश्वर । तुझी भक्ती महाथोर । येईल येथ कौशल्यकुमार । तुज भेटण्याकारणे ॥३८॥शबरी आनंद झाल । सांफ़्गे वृक्षापाषानाला । लता वेली फुल झाडाला । श्रीराम येणार म्हणत असे ॥३९॥तेव्हापासून शबरी भिल्लीण । आतुर झाली भेटी कारण । गाई रामाचे गुणगान । पाने फुले धरुनीया ॥४०॥तव तो सुदिन आला जवळी । आश्रमात घाली सडा रांगोळी । येउनी पंपा सरोवराजवळी । स्नान करण्या ते ठायी ॥४१॥स्नान करुनी तळ्याकाठी । शबरी बैसली एकटी ऋषी शिष्यांची झाली दाटी स्नान करण्या तळयात ॥४२॥श्रृंगऋषीचे शिष्यगण । पाहती तळयाकाठी येऊन । तव ती शबरी स्नान करुन । तळयाकाठ्ही बैसली असे ॥४३॥हे पहात शिष्यगणांनी । शबरीस बोले क्रोधेकरुनी । म्हणे तूं आमुच्याहुनी । थोर झाली कां येथे ॥४४॥अमुचे स्नान झाल्यावाचुनि । तूं कां आली या ठिकाणी । अपवित्र केले तळयाचे पाणी । अघम नारी तूं असे ॥४५॥आम्ही तपस्वी महाज्ञानी । तूं तर स्त्री पापिणी । ऐसे बोलती तिये लागुनी । द्वेषभावे शिष्यगण ॥४६॥तव शबएरी दु:खी होऊनी आली आश्रमा लागुनी । दर्भासनावरी बैसुनी । ध्यान करी श्रीरामाचे ॥४७॥इकडे पहा शिष्यगण । तळयाच्या काठी येउन । स्नान करण्या म्हणून । स्पर्श केला जलासी ॥४८॥तो काय झाला चमत्कार । पाण्याचे जाहले रुघीर । लालभडक दिसे सरोवर । अशुध्दपणे मिरवले ॥४९॥जलाचे रुघीर झाले । हे अवघ्यांनी देखीले । मुनी म्हणती हे काय झाले ? । कोणा काही कळेना ॥५०॥मम कशाचे स्नानध्यान । हे विपरीत आले घडून । तैसेचि मागे परतून । आश्रमासी पातले ॥५१॥झालेला वृत्तांत । गुरुंस सांगितला समस्त । म्हणे हे अदभूत । कैसे घडले कळेना ॥५२॥शिष्यांसी म्हणी ऋषीश्वर । आज येणार दशरथ कुमर । शबरीची भक्ती महाथोर । आपुले भाग्य उजळले ॥५३॥परि शिष्यांचे मनी न भावे । म्हणी स्नानाशी कोठे जावे । गुरुंसी आता काय सांगावे । न सांगावे तरी कोपतील ॥५४॥हे जरी गुप्त ठेविता । राम येतील अवचिता । सरोवरी मग पाहता । जाणतील सर्वेश्वर ॥५५॥ मग मनी विचार करुनी । शिष्यबोले गुरुलागुनी । म्हणे गुरू तळयाचे पाणी । रुधिरासारखे झाले हो ॥५६॥गुरु म्हणती सेवकांसी । कुणी बोलले कां शबरीसी । कुणी तिच्या रामभक्तीसी । निंदीले कां सांगावे ॥५७॥शिष्य बोले सर्वाआधी । तिने स्नान केले तळयामधी । तळयाकाठी लाउनी समाधी । बैसली होती शबरी ॥५८॥मग सर्व तियेवर कोपले । नाना अपशब्द बोलिले । आणिक मारिले पाषाणे । म्हणे पाणी तळयाचे नाशिले ॥५९॥परि ती काही न बोलली । आश्रमात निघून गेली । ऐसी शिष्य मंडळी बोलली । सत्य वार्ता गुरुंस ॥६०॥गुरु बोलिले शिष्यासी । व्यर्थ गमविले तपासी । भक्त सखा श्रीरामासी । दु:खविले आपण ॥६१॥शबराच्या भेटीकारण । येथे येणार श्रीराम लक्ष्मण । आपणा कैसे पावेल दर्शन । छ्ळ भक्तांचा केल्यावरी ॥६२॥होणार ते होऊन गेले । शिष्यगण पश्चातापले । म्हणे एवढे तप आचरिले । निष्फळ झाले अहंकारे ॥६३॥अभिमान मनी धरिला । श्रेष्ठ्ह मानिले स्वकर्माला । निंदिले रामभक्ताला । म्हणोनि पश्चाताप पावलेती ॥६४॥मग एक निश्चय करुनी । शबरीस शरण जाउनी । चुकलो एकदा म्हणुनी । क्षमा तियेसी मागतसे ॥६५॥इतुक्यात श्रीराम आले म्हणुनी । शबरी गेली भांबावूनि । हाती टोकरी घेउनी । फळी आणाया लगबगे ॥६६॥बोरे आणिली टोकरी भरुनी । परि आधी पाहिली खाउनी । गोड बोरे निवडूनी । श्रीरामाप्रती आणिले ॥६७॥इकडे रामप्रभू आले । सारे अरण्य आनंदले । मंद वारे वाहु लागले । स्वागत करण्या रामाचे ॥६८॥सरोवरी दृष्टी टाकिता । पूर्ववत झाले तंत्वता । मग शबरीसी भेट देता । आनंदले दयाघन ॥६९॥सर्व ऋषींसी दर्शन देउनी । शबरीची बोरे भक्षूनी । रामसीता लक्ष्मण गुणी । झोपडीत बैसले आनंदे ॥७०॥राम सर्वांचा सर्वेश्वर । तयां नमीति ऋषीश्वर । दया केली सर्वावर । ऋषी शिष्यांसहित ॥७१॥शबरीस निंदिले तरी । श्रीराम तयावरी कृपा करी । शरण तयां गेल्यावरी । दु:ख मुक्त होतसे ॥७२॥शरण जाउनी श्रीरामासी । शबरी बोले कृपानिधीसी । मज वनी पाडसासी । भेट दिली आईने ॥७३॥ऐसे म्हणोनी वारंवार । मस्तक ठेवी चरणांवर । तेणे तोषे रघुवीर । संवाद अल्हादे करीतसे ॥७४॥नवविधा भक्ति कथन । सांगु लागे दयाघन । श्रवण करी भक्तिभाव । शबरी मायी तेधवा ॥७५॥मंत्र ओळखण्याकरण । दृढ धरावे संतचरण । सत्संगतीचे सज्जन । भक्तिमार्ग दावितसे ॥७६॥माझिया कथेची आवडी । मना लावावी गोडी । सतधर्म कदा न सोडी । माझ्या भेटी कारणी ॥७७॥द्यावा अभिमान सोडूनी । लीन राहावे सद्गुरु चरणी । मग मी सर्व अंगानी । सांभाळितो तयासी ॥७८॥कापट्य मनीचे सोडावे । माझे गुणगान करावे । तेणे मी जानकीसवे । सुखी करील तयांसी ॥७९॥सदा माझे नामस्मरण । चित्त होईल समाधान । रामनामी विश्वास धरुन । ही माझी भक्ति पांचवी ॥८०॥वेदामध्ये जे प्रसिध्द । इंद्रिय निग्रह हा निश्चित । तेणे सर्व कार्य सिध्द । होते ममकृपेने ॥८१॥विनाशीचे वैराग्य । संत सेवा हीच योग्य । संतसंगतीचे भाग्य । तयासी मी देत असे ॥८२॥जे थोडे बहुत मिळाले । समाधान त्यात मानिले । निंदा दोष टाळीले । ते भक्त मज आवडती ॥८३॥राहावे सरळ लीनपणे । कोण्या जीवासी कपट ना करणे । ऐसी भक्तिची नऊ साधने । शबरीस कथिली श्रीरामाने ॥८४॥तरी ही कथा घेण्याकारण । शबरी कुळीचे बाबाकिसन । या भूमीवरी प्रगटून । भक्ति महिमा वाढविला ॥८५॥श्रीक्षेत्र देवगड संत माहेर । सप्ते भंडारे होय अपार । योगियांचा योगीश्वर । करी कृपा भक्तांवरी ॥८६॥आता श्रोते पुढील कथन । वदविन सद्गुरु कृपेने । संतभेटीचे हे साधन । सहज लाभेल साधका ॥८७॥म्हणुनी ग्रंथाचा कर्ता । श्री गणेश दु:खहर्ता । नित्यनेमे पठण करिता । भयदु:ख जातसे ॥८८॥इति श्री नासिकेतरचित । श्री किसनगिरी बाबांचे चरित्र ॥ गंगेसम असे पवित्र । नवमोऽध्याय गोड: ॥८९॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 30, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP