मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री किसनगिरी विजय| ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्री किसनगिरी विजय चरित्र अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ श्रीसमर्थ सद्गुरु पादुकास्तोत्र ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : aartikisangirisantआरतीकिसनगिरीसंत ॥ श्री सद्गुरु बाबांची आरती ॥ Translation - भाषांतर आरती सद्गुरुराया । ओवाळीन प्रेमे काया । किसनगिरी नाम तुझे । असे त्रिमूर्तीची छाया ॥धृ०॥वृत्ति तुझी दुर्वासापरी । बहु कठिण निर्धारी । तपश्चर्या केली जिवनीं । दुस्तर पावकापरी ॥१॥ आरती ॥औदुम्बर तरुखाली । अवधूत साक्षात्कार झाला । करुनिया शक्तिपात । गोरविली तुझी काया ॥२॥ आरती ॥दीन-दु:खी व्याधिग्रस्त । पिडियले त्रिविध तापा । करुनिया सकळ शांती । तोषविले इहलोका ॥३॥ आरती ॥निष्कलंक जीवन तुझे । धन्य श्रीगुरुराया । श्रीगुरुदास ठेवी माथा । तव चरणावरता ॥४॥ आरती ॥॥ श्री सद्गुरु बाबांचे स्तोत्र ॥धन्य झालो तव गुण गाता । किसनगिरी देवा । भाविकांना उध्दरिशी तूं । पूर्ण मेघ:शामा ॥धृ०॥गोधेवावी येथे प्रगटोनि त्वा । वंशा भूषविले । कुल-वंशाचा त्याग करोनि । प्रभुला तोषविले ॥१॥दिन-रात्री तप ते केले । प्रवरेला । औदुम्बरासी पालवी आली । ठाव्य असे सर्वा ॥२॥वरद मिळाला शिव -शनींचा । ताराया जगता ।मार्कंडेयाने दिधला ठेवा । भाग्य तुझे संता ॥३॥दत्तात्रयाने मुक्त केले । प्रगटोनि अव्यक्यता । दिगंबर मूर्ति अवधूत दत्त । शोभे तव माथा ॥४॥सहज लिलेनें अवगुण हरिसी । आमुचे तू देवा ।संतपणाचे तेज ते तळपे । तव मंगल भावा ॥५॥प्रवरातीरी देवगड क्षेत्री । वसवुनि अवधुता ।भाविक प्रेमळ धावूनि येती । दर्शनाकरिता ॥६॥अपार कार्य करुनि ठेविले । जनतेचा धाता । भूत-पिशाच्च रोगी जर्जर । तरती तव हाता ॥७॥तूच आमुचा माता-धाता । अवघा भव हरता ।श्रीगुरुदास ठेवी माथा । तव चरणावरता ॥८॥ धन्य० ॥ N/A References : N/A Last Updated : December 07, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP