मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| सर्वोपाधिडंबरनिरसन मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - सर्वोपाधिडंबरनिरसन सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी सर्वोपाधिडंबरनिरसन Translation - भाषांतर अकारणं तु यत्सर्व मिथ्या भावा भ्रमोदिता: । कारणेन विना मोक्षो मृगतृष्णांबु लभ्यते ॥१॥तव बोले श्रीगुरु । शीष्या तुज असें करुं झ। ये उपाधीचा डंबरु । सर्व निरसु ॥१॥या प्रपंचाचेनि अनुवादें । सुखें तोष आनंदे । परी तुं ब्रह्मानंदे । सुखी होई ॥२॥प्रकाशु जालिया सदा । तो निरसेना कदा । तुं तुझ्या आनंदा । पात्र होय ॥३॥सूर्यासारिखें तेजीष्ट । परतापन उत्कृष्ट । परी तें स्वयं देहा दुष्ट । होउ नेणें ॥४॥महानदीचि कीडाळें । हारपती समुद्रजळे । परी समुद्रा समुद्रु कोण्हें वेळें । गिळुं न शके ॥५॥तेवी यें सर्वमतें । निरसी उपाधीचे हातें । पाठीं स्वयंप्रकाशु तुझा तुतें । शाश्वतु होईल ॥६॥अपुरी उपाधी न साहे । कां जे ते पूर्वापर पूर्ण आहे । यास्तव तुं सहजीं राहे । चळों नको ॥७॥धरुनि उपाधीचा हातु । भेदु मानू नित्यवंतु । तै प्रत्यक्ष ब्रह्मघातु । आह्मी च केला ॥८॥हे उपाधी आणू रसी । वस्तु नेमुं अन्य देशी । तै श्री सिध्देशें ज्ञानराशी । लाजविला तो ॥९॥सहज पूर्ण ते अभेदु । हें विभांडून कीजे बहुतविध । यासी प्रायश्चीत प्रसीध । कोठें पाहे ॥१०॥निर्धारें हें ची टाळीं । सीध्द तें न विटे कोण्हे काळी । उपाधी उपाधातें गीळीं । हे तो दीसे ॥११॥॥ इति पूर्णप्रतिपादन ॥ऽऽ॥====आइक अनित्यें असत्य स्थळें । जें निरर्थकें निर्मूळें । तें संवादि रसाळें । अबुधें जनें ॥१२॥अस्ति मवाळ ना रसाळी । पशु स्वलाळा चघळी । तेवी निमुळें टवाळी । शोचिती मूढ ॥१३॥अंडजें स्वेदजें उत्बिजें । ये बोलो नेणति सहजें । मनुष्या वाचुनि जारजें । ते हि तैसी ॥१४॥जे आपुलि हि जाती नेणती । ते कथा गोष्टी अनुवादिती । याचे श्रोते वक्ते आहाती । मंद अथ बुध ॥१५॥काष्टा पाषाणा वाचा । मां पाडु का आणिकाचा । असा ही संवादु येकाचा । आईकुं आह्मिं ॥१६॥घेती बोलाचा ओडंबरु । त्यासी प्रमाण ना आधारु । जैसा नटाचा श्रृंगारु । सगर्भु नोहे ॥१७॥गतक गोष्टी मृत्यु कथा । प्रत्यक्ष नव्हे सर्वथा । मां सांगतां आइकता व्यथा । कोणते हरे ॥१८॥जैसा गारुडा खेळु । दीसे साचु परी वोफळु । वाय शब्दाचा मेळु । तैसा असे ॥१९॥ऊँ डंबरिचा दिठिवां । असानु परि दिसे बरवा । वावो गोष्टीचा जीवा । विश्वासु तैसा ॥२०॥आत्मरहित पुराणें । आणि बाह्यशास्त्रें प्रमाणें । ये ढांडोळिता मनें । आसुळ होईजे ॥२१॥तरी गा स्वधर्मि असावें । पूर्ण तें वोढोनि ध्यावें । फापारुं नये हेवें । पुढीलाचेंनि ॥२२॥जो चुके स्वधर्मपाहाटे । चाले दर्शनाचे वाटे । तर्हिं हिं संशयाचें खरोटें । झाडावें चि तो ॥२३॥जो आपुली कुळभूमि सांडी । निघे दर्शनाचे दरडी । तर्हिं हिं आत्मतत्वाचें थडी । मिठी घालावी ॥२४॥जयासी हें असें न घडे । तो तो दोही परी नाडे । सीध्द गृहस्थधर्म न घडे । योगु हि भ्रंशे ॥२५॥॥ इति भेदमत ॥ऽऽ॥====जीव प्रपंचौ देवता आन । यासी ईश्वरु असे भीन्न । ये नित्य असें वचन । स्थापिलें तेहीं ॥२६॥जरी हा भेदु प्रमाण । तरी यासी मूळ ते कवण । हें प्रबुधाचें नित्य समान । परस्परें असे ॥२७॥ते ईश्वरीं सदा भिन्न । या लागी भक्तिधर्मु अप्रमाण । प्रबुधाचें लोचन । देखती असें ॥२८॥जो सच्चिदानंदपर । तें तो प्रत्यक्ष निराकार । तेथ घेती अवतार । आपाइते ॥२९॥चैतन्यापर तो देहमुर्त्ति । त्याचा माग मोडी धावती । तत्व रहित ते ह्मणती । पंच अवतार देव ॥३०॥लीळा चरीत्र सामर्थ्यें सर्व । असें वर्त्तती ते देव । हें ह्मणों तरी दानव । कोणें सामर्थ्ये उणें ॥३१॥लीळा पीशाचे का बाळे । ऋषी चरीत्रें आगळे । ऐणें बोले नाडळे । पूर्ण देवपणेंपण तें ॥३२॥मूलामा काखे घालुनि नरीं । चोरुनि विकावा घरोघरी । तेणें अभोळ नरनारीं । नाडती चि तो ॥३३॥ते आणू नये चोहटां । दूषण पावे नानवटा । असें या मतां कपटा । घेउं नये ॥३४॥कांनफुकीचिं उत्तरें । तें आहाचें असारें । कां पूर्ण ब्रह्म तें अपुरें । असें नव्हे ॥३५॥बोलीजे हळुवा गोष्टी । कां यकांति देविजे दृष्टी । तेणे प्रपंचीकु संतुष्टी । प्रबुधा सीणु ॥३६॥॥ इति भटमार्गु ॥ऽऽ॥====ताल राग स्वव्र तंतु । येथेची हेतु । हे शुध्दसार परंतु । बोलु नसे ॥३७॥हा चि पंचमा वेदु ह्मणौनि । संतोषती रागज्ञानी । तरी हें सामगा वाचूनी । दुजें नसे ॥३८॥या परीचें नवरस । तें आत्मरसीं विरस । कां जे कोण्हें हीं रसें स्वप्रकाश । न सधे वस्तु ॥३९॥नादु चि परवस्तु मानीजे । तरी तो नादु कोठो न उपजे । हें बारें न घलीजे । प्रबुधां आंगी ॥४०॥॥ इति नादराग ॥====एक डांबिक प्राणिं । आपण वंद्य होउनी । ते फुंडती मनी । भाते जैसें ॥४१॥वाचासीध्दिचेंनि बळे । सेवे बोडिती आभोळें । तरी हें त्याचें त्यासी न फळे । अन्यत्रा काई ॥४२॥तरी गा आशाबध्द सैराट । तेथे लागती लागट । जैसें भगवयाचें सुनाट । भगवें गीवसी ॥४३॥ना ना जैसें धातुवादि । धावे धातुचां वेधी । तेवी प्राणि मंदबुध्दी । पाहाती यातें ॥४४॥सुवर्ण पंथीचे नाते । साचापरी मानूं येतें । बोहरुपीयाचें सीध्दांते । सीध्दी साधती ॥४५॥वोडंबरीचा दीठिवां । किं गारुडाचा यावा । वाधीकडाचा नाडावा । नाडे तेवी ॥४६॥असें नाडीति जना । ते नाणावे प्रमाणा । या माजी ब्रह्मज्ञाना । कोण येती ॥४७॥पाहा पां अविद्येचेनि मते । मेलीं मारिलीं भूतें । तें करुनी देवतें । पूजिताति ॥४८॥मनी मन संचारें । आसनी घुमे घुमारे । हे खुण घुमारे जाणे दूसरे । वेधे यासीं ॥४९॥हे होणार ते होत । फळलें तैसा च दैवत । न फळे तैं आणित । कर्मावरी ॥५०॥तैसी चि प्रतिमा देवतें । रुपें घडोनि यथोचितें । प्रतिष्ठा करुनि त्यातें । पूजिजे प्रेमें ॥५१॥तेथ आपुला चि भाव । फळे तो फळला देव । न फळे तै डावो । दैवावरी ॥५२॥या चि परी व्रत नेमु वोवसे । पूर्व कथा श्रवण रसें । न कळे तर्हि सायासें । आचरे जन ॥५३॥तेणें वनें तीर्थें क्षेत्रें । हेवे चि कीजती सर्वत्रें । प्रत्यक्ष कोणाची गात्रें । पवित्रें जाली ॥५४॥याही होनि समर्थ । बोले चि आणिति पदार्थ । परी अपूरें आहाच व्यर्थ । घेउं नये ॥५५॥एकादशी साकार । तेहिं नेघावें साचार । यवनमतिचे निराकार । हे ही नको ॥५६॥सर्व दिशा सांडोन । जयासी प्रतिची प्रमाण । तया पूर्ण निरुपण । कैचे बापा ॥५७॥तरी गा भेदाचा टीका । तो येथें चि लागला निका । विरोधु भेदु या लोकां । मध्यें चि वसे ॥५८॥प्रत्यक्ष नसधे निराकार । ह्मणसी घेउं साकार । तरी गा दुरोनि च डोंगर । शोभिवंत ॥५९॥प्रत्यक्ष पाहे साकार । भक्तसृष्टी अपार । या माजी कोणाचें शरीर । उपमलें दीसें ॥६०॥तरी या पूर्विला गोष्टी । आपण आइकुनी संतुष्टी । परी कोणा कहि संकष्टी । सद्य नये ॥६१॥प्रत्यक्ष नव्हे कव्हणा । तरी ह्मणती भावो नाहि मना । कां जन्म संस्कार विवंचना । हे चि करीति ॥६२॥कां ह्मणती युगमहिमा । कां डाव आणिति पूर्वकर्मा । नां तरी करणी आचरण धर्मा । चुकी पडली ॥६३॥तरि बाळ वार्ध्दक्यापासून । भक्ति धर्म दान दमन । हें सर्वही भावहीन । कैसें जाले ॥६४॥यास्तव अपूरीं दिनें । ते नेघावी सुजाणे । जें पूर्ण विषई प्रमाणें । येति तें साचें ॥६५॥साच चि येक देखोनि परा । आचरति नेमा आचारा । परी मना आणि निर्धारा । गांठी नाहि ॥६६॥जो ब्रह्म वस्तुचा लाभु देखे । तो कर्मोद्यमु करी सुखे । न बुडतु जन्मदुखें । ब्रह्म होय ॥६७॥जो सार ते स्वप्री नेणें । कर्म करी अभिमानें । तो न चुके जन्ममरणें । कोण्हे काळीं ॥६८॥कर्म केधवां न संडावें । समूळ फळ त्यजावें । अभीमानें न पडावें । कर्त्तव्याचें ॥६९॥आत्मा नातुडे घरीं । लाभे अन्य देशांतरीं । असी आहाच अपूरीं । वस्तु नव्हे ॥७०॥आणि कुटंबे देहिचि देव्हडी । देही करीति तडातोडी । तें दुष्टे घे आवडी । महा मोघु ॥७१॥यास्तव जे अंतरल्यागु । या नाव राजयोगु । येणें बाहिरिल संयोगु । मोक्ष रुप ॥७२॥॥ इति निर्धारु ॥ऽऽ॥====उपाधी कोठें न मिळे । तैं जावें दर्शना जवळें । डंब प्रपंचाचें फळें । ते तेथे चि लागे ॥७३॥पैल दर्शन पाशुपती । तें शिवातेंची मानीति । वरी मंत्र जपति । षडाक्षरीं ॥७४॥तया लिंगो धारण । ह्मणति तरलों आपण । तैसें चि चार्वाक दर्शन । भेंदी असे ॥७५॥जेथ मुख्य उहापुह । तें कैसें नि:संदेह । येक ह्मणती देह । हें चि कारण ॥७६॥तरी शरीर मात्र अनित्य । हें केवी होईल सत्य । एक ह्मणती नित्य । मूळ प्रकृति ॥७७॥आत्म परीणाम जेथ । माया कोण देखे तेथ । प्रकृति निंद्य त्या शून्य वादातें । स्पर्शु नये ॥७८॥ह्मणती शून्याचें सकळ । या वेगळे जगडाळ । येथ भदाचें बळ । विशेषे देखे ॥७९॥जेथ भोंक तेथ ढोंक । हे गुह्य मानीति येक । परी परमार्थ विषई संतिक । हें ज्ञान नव्हे ॥८०॥॥ इति दर्शन ॥ऽऽ॥====बुध्दी आत्मा आंतुडे । येक हे चि घेति कोडें । तें ही नव गुणेंसी पुढें । सांगों आतां ॥८१॥श्रृत दुष्ट अनुमानें । जो निर्धारु ते बुध्दीचीं लक्षणें । ये बुध्दी पासाव प्रेत्नें । उठीजे तेथें ॥८२॥ते साधनी ईछा व्देषु अंकुरें । ईछा व्देषीं सुखदु:ख संचरे । सुखा दु:खाचें आधारें । पुण्य पाप ॥८३॥पुण्य पापापासुनी । संस्कार पावे प्राणी । असी येकयेकापासूनी । वृध्दी होय ॥८४॥असे बुध्द्यादि नवगुण । हें संसृतीसी कारण । एवं याते विव्दज्जन । आरुतें देखती ॥८५॥॥ इति बुध्यादि नवगुणा ॥ऽऽ॥====जैन जीव दया प्रतिपाळन । वरी केशाचें लंचन । तर्हिं पूर्ण प्रकाश ज्ञान । न देखो येथें ॥८६॥या चि परी कपाळी । ते शरीर कर्में बळी । भक्षाभक्ष दुफळी । नसे तयां ॥८७॥श्रवण छेदक योगीजन । सर्व ज्ञाती भीक्षाटण । ज्यासी श्वासाक्षर प्रमाण । प्रणवें सहीत ॥८८॥आदिनाथ आदिमाया । तमाळ घर गुह्य तया । आदि अनिळ तो कार्या । कर्त्ता पुरुषु ॥८९॥पूर्णाक्षर दोनि पदें । ते हि मानिलीं प्रसीध्दें । साही गुह्यें एवं विधें । मानिली तेहीं ॥९०॥वरी सोहं बीज प्रमाण । जन्म नदेखती आन । यास्तव रक्षण । देहाचें करिती ॥९१॥परी गा प्रबुधाचें विचारें । हें येवढें हि दिसे अपुरें । कां जे परब्रह्म पुढारें । समर्थ आहे ॥९२॥॥ इति मार्ग गुह्य ॥ऽऽ॥====एक ग्रामस्थ एक वनी । येक दृढ आसनी । येकांचे आचरणी । भवरे पडले ॥९३॥येक साधकाचें सिधिं । आदिकरुन समाधी । दाविति नाना विधि । करामति ॥९४॥येक अगोचरीचेनि कोडें । लोक भोंदिति बापुडें । हें विस्तारुनि उघडे । घालूं नये ॥९५॥असो ठाइहुनि प्रसिध्द । कर्मिष्ठां भेद चतुर्विध । तें आइक प्रसिध्द । पूर्विहुनि ॥९६॥शैव आणि शांभव । स्मार्त आणि वैष्णव । याचें आचारभाव । भिन्न भिन्न ॥९७॥वाचा श्रवणी दृष्टी । नावडे विष्णु च गोष्टी । शिव नामें संतुष्टी । ते शैव ॥९८॥शिव लिंग उपासक । शीव मंत्र वाचक । तयासी शिवा वाचुन आणिक । दैवत न मनें ॥९९॥या चि परि वैष्णव । मेलियां हि न ह्मणति शिव शिव । विष्णु वाचून सर्वं । न मनिति ते ॥१००॥तैसें चि गा शक्ति । केवळ शक्तिचे भक्त । शक्ति वाचुन अयुक्त । सर्व तयां ॥१॥आइक स्यार्त आचार । ते सर्वाचे भक्ति सादर । हरिहरादि सुरवर । वंदिति ते ॥२॥असें चतुर्विध जन । नव्हे अभेंदी प्रमाण । सर्वे प्रकारीं पूर्ण । हारविलें तेहिं ॥३॥वेदगर्भदर्शन मत । जें पठन तें चि हित । पठनें चि साक्षांत । मोक्ष प्राप्ति ॥४॥परि गा वेदाचें पूर्ण ज्ञान । ते वस्तु विषईं कारण । येर सर्व ही ज्ञान । संशय रुप ॥५॥नैय्यायिक दर्शन । तया कर्तव्य प्रमाण । सहज वस्तुचे स्वप्र । नसे तया ॥६॥मिमांसा उपाधिक । हें हि संशय बाधक । भेद बुधी सार्थक । कोण्हांचें नव्हे ॥७॥ब्रह्म ज्ञान नव्हतां । कां ब्रह्मार्पण न करीतां । कां निराश बुधी न भजतां । कर्म जे जे ॥८॥ते ते सर्वही जड । धाय संशयाचें तोंड । संसार तरुचे पेड । पोषे येणें ॥९॥स्वधा स्वाहा हव्य कव्य । कर्म सव्य अपसव्य । केलें तर्हिं नव्हे सेव्य । ईश्वरें विण ॥१०॥कर्में नित्यें नैमित्यें । श्रोतें स्मार्तें सत्यें । परी जे ज्ञान अंधे तें अनित्यें । भर्वसेनि ॥११॥जें आपण आचरीजे कोडें । तें ना ह्मणौनि निघे पुढें । तैं उपाधीचें विरुढें । नुगवे कैसें ॥१२॥पुराण प्रामाणिका जना । भेदु चि ये प्रमाणा । त्याची अभेदीं वाचना । उठे कैसी ॥१३॥शब्दापशब्द चें भरी । जे पडले आजन्म वरी । ते विश्रांतिचे घरी । येति कैसें ॥१४॥जे जन्म पर्यंत भेद सागरीं । डहुळत राहिले माझारी । ते पूर्णतेचा तींरी । सुखावती कैचें ॥१५॥येक शब्दातें राखोन । करीति पराचे छळन । तया बापुडीयाचें ज्ञान । चर्मवेधक ॥१६॥सांडोन सर्वागा सकळा । क्षत पाहे काउळा । मासिचाहि जीवाळा । ते चि ठाईं ॥१७॥असो हे ब्रह्मचारी वानप्रस्थ । हे भेद स्छाई स्वस्थ । निवडने व्यस्ताव्यास्त । हे दशा त्याची ॥१८॥जे कर्माची पूर्ण दशा । ज्याचेंनि रुपा यें मिमांसा । तो शुध्द सचिळ जैसा । चिदादित्य ॥१९॥तत्वमस्यादि वचनें । महावाक्यें प्रमाणें । तें उठविति ठाणें । माये अविद्येचें ॥२०॥माया अविद्या मूळीं देखे । त्याचां निराशीं तोषे । सांडी मांडिचे सुखे । सुखातें पावे ॥२१॥एकदंडी व्दिदंडी त्रिदंडी । हंस दीक्षा येवढी । सहसा संशयाचां सांकडी । नांदणे याचे ॥२२॥पुढां वेदांत दर्शन । हे सर्वा कारण । जेथ होय विध्वंसन । सर्व मतां ॥२३॥जेणें चुके लोकोपवादु । निरसे संसार बंधु । असा डाउका प्रबुधु । असावा कीं ॥२४॥बीज अकुंरु न मोडी । देखें फळाची गोडी । अवघेची संसार झाडीं । क्रीडा करी ॥२५॥जें येकविध अपुरें । तें निरसूनि टाकावें बा रे । हें चि वर्म सोपारें । आत्मसीध्दी ॥२६॥सिध्दिसाधीचिया दशा । या आत्म विषइ वायसा । जें जें कल्पिजे तो तो फांसा । दृढ होय ॥२७॥प्रत्यक्ष आत्म पुरुषा । नसे दुसरी भाषा । या प्रकृति अशेषा । या चि मध्यें ॥२८॥उपाधीचा डागु साहे । परी तुं सीध्द स्वरुपीं राहे । हें चि वर्म आहे । श्रीसिध्देशाचे ॥२९॥यास्तव सहजा परुतें । खण नाहीं निरुतें । सर्वही जोडे आइते । तीमा ह्मणे ॥३०॥इतिश्री चिदादित्य प्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे सर्वोपाधिडंबरनिरसन नाम त्रयोदशकथन मिति ॥१३॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP