मध्यखंड - अष्टदळविवरण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


पुनर्ज्जन्मांकुरं त्यक्त्वा नष्टसंबभ्रष्टबीजवत्‍ ।
पुर्यष्टदलदेवस्य स्वयामात्मानुभूयांत ॥१॥
तब बोले श्रीगुरु । आइक अष्टदळ विवरु । या शरीरा आधार । जेथ असे ॥१॥
कदाचित्कोण्हिं चाळविलें । ब्रह्मीहोन चित्त होईल वाईलें । या निर्धारास्तव मांडीलें । देहज्ञान आह्मिं ॥२॥
प्रपंचाचा उभारा । नाना मतांचा विखुरा । बहुज्ञानें शिष्यव्रा । आणू येथे ॥३॥
भरैल अन्यरसी चित्त । ते आधी च करुं निश्चंत । विस्तार दावाक्या उचित । हे चि आह्मा ॥४॥
जेवण जेवितां मिष्टान्न । न शोभे शाके वाचून । पात्र ही नेक पाकेविण । शोभा न पवे ॥५॥
जेवि येकला चि नरेश्वरु । तो स्वयं चि राज्यधरु । परि जे जो मिळे परिवारु । तो तों शोभा ॥६॥
उगमी चिं तीर्थ गंगा । मिळती नद्या अनेगा । तो तों चि तया आंगा । रुप येत ॥७॥
जों जों मताचि उभारी । जों जों बोलाचि कुसरी । जों जों दृष्टांताची परी । देईजैल ॥८॥
जों जों आणावीं प्रमाणें । जों जों निरसावीं खंड ज्ञानें । जों जों बहुविध बोलणें । तो तों शोभा ॥९॥
बोलता येकविधा अर्थु । सर्वता नव्हे तो ग्रंथु । जैसा येकला समर्थु । राजा नव्हे ॥१०॥
कां येकलें येकें झाडें । वन नव्हे जेणें पाडे । तेवि येकधा बोले न घडे । ग्रंथ नाम ॥११॥
नशुधें माणिक भिर्वणे । यासी जडावो कोण ह्मणें । कां येके चि कणदानें । राशि नव्हे ॥१२॥
जेथें येक चि मंदिर । त्यासी कोण ह्मणे पुर । येकें चि केशें चवर । केवि होईल ॥१३॥
येकें चि शब्दोचारें । ते गोष्टी चि नव्हे निर्धारें । मां ग्रंथसंबंधीके उत्तरें । शोभती कैसी ॥१४॥
यास्तव ब्रह्माचां मिळणी । घालिजे नेकमताचे मणी । तैं चि ते ग्रंथवोवणि । शोभा देईल ॥१५॥
येणें शव्दें परिकरें । भरावें शास्त्राचे हारे । परि रसु ये तैं सुंदरे । शोभती शास्त्रे ॥१६॥
सिध्द सरकीयेंची बोंडे । तेथें ची वस्त्राची दिंडें । परि करणीविण कापडे । रुपा न येति ॥१७॥
निष्कळ सोनयाचे ढाळ । तें चि भांगाराचें मूळ । परि कर्तव्येवीण केवळ । भूषणा नव्हे ॥१८॥
अथवा मृत्तिकेचा गोळु । तो चि घटाचा मेळु । परि केलियावीण रोळु । घटाचा नव्हे ॥१९॥
तेवि यां बोलाचां पोटिं । आहाति शास्त्रांच्या कोटी । परि जितुकी रसाळ गोठी । ते चि शोभे ॥२०॥
यास्तव रसाकारणें । ग्रंथीं दाउ बहुतें ज्ञानें । परी तें तु घेउनि मनें । बैसों नको ॥२१॥
झारा पुंजे ते ही भरी । सेवटी सर्व ही झारी । त्यातु कारण ते चि धरी । येर सांडी ॥२२॥
हे चि तुज सिकवणें । होय सर्वाचें साटवण । परि वस्तुमध्यें मन । घालूनि राहे ॥२३॥
या कारणें हें शरीर । तुज सांगो सविस्तर । करुनि अंत:करण स्छिर । आइक आतां ॥२४॥
॥ इति विचारणा ॥
====
मागां सांगवला सत्सिधु । जो षडांगुळ योनि कंदु । जेणें शरीर सन्मधुं । सर्व चाले ॥२५॥
जे कंदी नाडीका अप्रमाण । कांही तेथीचे करुं ज्ञान । जे बोलिले आपण । धन्वंतरी ॥२६॥
अनंत लक्ष नाडी शीरा । त्या कंदी वेष्टित निरंतरा । परि ज्या ज्या आलिया व्यापारा । त्याची सांगो ॥२७॥
केश स्मश्रृ आदि करुन । याचें तीन लक्ष प्रमाण । आणिक सार्ध्द तीन कोटि पूर्ण । रोमावळी ॥२८॥
एवं या त्रिणि कोटि त्रिपण लक्ष । येथ नाडि चि प्रत्यक्ष । कां जें स्वेदु झेर ते मुख्य । नाडीचि मुखें ॥२९॥
या वेगलिया । आणिका थूळा । त्या बाहात्तरि सहस्र सकला । या शरीराचि कळा । त्या चि होति ॥३०॥
गात्रिं संधि लवनि । करी कुंक्षी कटी चरणी । शीरी मुखी प्रष्टी आणि । हृदयी कंठी ॥३१॥
तीन शतें साठी अस्थि सर्वस । धमन्या रसवाहिन्या चोविस । याचां ठांइ सर्वस । नाडी च या ॥३२॥
जे अस्थि सांदे लवती । ते शत येक नेमले अहाति । याचां ठाइं वर्तती । त्याची नाडी ॥३३॥
अशुध्द जळवाहिका । आंगि दीसती अनेका । त्या ही शिरा नाडीका ।वोळखाव्या ॥३४॥
चक्षु मिलिनी उन्मिलिनी । त्या च्यारि च्यारि नयनी । दृष्टिचा देखणेंपणि । नाडिका चि या ॥३५॥
सर्व इंद्रियांच्या व्यापारीं । नाडी वर्तती या चि परि । चालक देह विकारी । या चि असती ॥३६॥
देह चक्रें थानमान । थूळ लिंग कारण महाकारण । ते ही नाडी वाचुन । न चले कांहि ॥३७॥
सर्वा अष्टादशा प्रमाण । दाहा सर्वांसी कारण । दशव्दारी संपूर्ण । वर्त्तती ज्या ॥३८॥
इडा पींगळा घ्राणिं । सुषुम्णा वाहे वदनीं । गांधारी हस्त जीव्हा नयनी । श्रवणि अयसस्वि पुरवा ॥३९॥
अलंबुका वसे लिंगी । कुहू नाडी गुदभागी । शंखिनी वीर्याचां अंगी । दशम व्दारी ॥४०॥
या माजी प्राण वाहिनी । त्या नाडी श्रेष्ठा तिनी । या मागा अजपा कथनी । प्रांजळ केलिया ॥४१॥
असो हे कंठकंदापासुनि नाळ । उठले सुरेख कोमल । माणिक्य तेज पुंजाळ । बालार्क वर्ण ॥४२॥
ते सर्वांसी कारण । बारा पर्वे लंबायमान । च्यारी अंगुळें प्रमाण । रुंद तें असे ॥४३॥
जे त्रिपुटीसी कारण । तें चि नाळाचे कोण । हे पूर्वील विव्दज्जन । बोलिले असें ॥४४॥
तेथ चतुर्भाव कंचुक । चतुष्टयें व्यापक । चहुं मात्राचें कौतुक । असे तेथ ॥४५॥
त्या कमळाचा विचारु । गणा सांगे श्रीशंकर । चउ कंचुके विचारु । अष्ट पत्रांचा ॥४६॥
येक येक कंचुक । दों दों पत्रासी व्यापक । एवं ते सकळैक । आठ चि पत्रें ॥४७॥
तयाचें हृदयस्थान । ते पुष्प अधोवदन । कदळीकुसुमा असी त्रिगुण । वसे तेथें ॥४८॥
तयाचें हृदय स्थान । ते लिंगदेह अंगुष्ट प्रमाण । परी शंभु बोलिलें नेत्र समान । ज्याचें त्यासी ॥४९॥
ते सोळां कळांचे । लिंगदेह जीवाचें । सविस्तर ज्ञान याचें । केळें मांगा ॥५०॥
प्रकृति अविद्या माया । या हि आलिया या चि ठाया । हे चि भांडार शिष्यराया । नवा रसाचें ॥५१॥
॥ इति कमलनाल लिंगदेह ॥
====
तेथ घेउनी गुणातें । मनदेह समवेतें । पत्रीं पत्रि वर्ते । जीवात्मा तो ॥५२॥
तामसाचें मेळें । आत्मा कम्ळदळीं खेळे । तैं शुभाशुभ सकळें । तामसें होती ॥५३॥
राजसांचा मेळीं । आत्मा भ्रमें कमळदळीं । तैं देहीं दिसे नवाळी । रजोगुणाची ॥५४॥
सात्विकाचें संगे । आत्मा कमळदळीं रिंगे । तैं उमटती सर्वागें । सात्विकगुण ॥५५॥
आत्मा संभूति विकारें । जेणें गुणें धरी शरीरें ।तो अधिक निर्धारे । देहिं गुण ॥५६॥
॥ इति गुणत्रयविकार ॥
====
आइक ते अष्टदळीं । गुणाष्टकाची नव्हाळी । आठ आठ भाव प्रतिकमळीं । अनुक्रमें सांगो ॥५७॥
आत्मा पूर्वद्ळीं संचरे । तैं पुण्यवासना अंकुरें । आठ भाव प्रत्याकारें । सांगो तेथ ॥५८॥
कृपा लज्जा भक्ति धृति । भेद भाव मोह क्षांति । एवं पूर्वप्त्रीं वर्त्तती । अष्टभाव हे ॥५९॥
आत्मा आग्रेय दळावरी । तैं उव्देगु उठे शरीरी । तेथ अष्ट विकारी । गुण असें ॥६०॥
व्यवृत्ति निर्धन दु:ख चिंता । निद्रा तृष्णा विस्मृति विकळता । व्दितीय पत्रिं असतां । या अष्टकळा भोगी ॥६१॥
आत्मा दक्षिण पत्रिं भरें । तेव्हां देही क्रोधु संचरे । अष्टगुण प्रत्याकारें । सांगो तेथ ॥६२॥
दाह भ्रमु शोक स्वेदु । क्लेश भय दु:ख प्रमादु । हा अष्टगुण भेदु । तृतीय पत्रिं ॥६३॥
आत्मा नैऋत्य पत्रीं । तैं पाप प्रगटे सर्व गात्रिं । अष्टगुणि विचित्री । क्रिडाकरी ॥६४॥
रिपुमद उदासीन । कूटि कृपण्य संघटण । निर्दया अभिमानु हे गुण । चतुर्थ पत्रिं ॥६५॥
आत्मा पश्चिमे प्रगटे । तैं क्रीडा विनोदु उमटॆ । अष्टभाव अति गोमटें । तेथ असती ॥६६॥
क्षमा स्मरु हास्य प्रीति । श्रध्दा मधुरता आनंद स्थिति ।या अष्टकळा वर्त्तती ।पंचमा पत्रीं ॥६७॥
क्रीडा करीतु कमळी । आत्मा रिगे वायव्य दळी । ते व्यवसाइक नवाळी । अष्टगुणी उठे ॥६८॥
जाडय मौन उत्साह मंद । शब्द निंदा स्मरु वेवाद ।एवं अष्टकळा भेद । सठां पत्री ॥६९॥
तो जीवात्मा उत्तरे । संचरुनि सुखाभरे । तेथ अष्टगुण प्रत्याकारें । गोड असती ॥७०॥
लोभ उत्साह विचारु विश्वास । अगर्व विद्या विश्रांती अकर्कश । हे अष्टगुणभाव उदास । सप्तम पत्री ॥७१॥
जैं ईशान्ये आधिष्ठान । तैं उपजे वैराग्य ज्ञान । तेथ विकार कळा भिन्न । आठहिं सांगो ॥७२॥
अहिंसा समता मूर्छा मुक्ति । वेधु क्षमा निवृत्ति शांति । हे अष्टभाव दीसती । अष्टमा पत्रीं ॥७३॥
॥ इति पत्रकळा विचार ॥
====
त्या कुमुदाचा देठी । आत्मया सुषुप्तीसी भेटी । विकार सरती पाठी । लीन होये ॥७४॥
तैं नेत्र कंठ विकारु । आत्मा सांडी साचारु । तेव्हा कारणी होय थीरु । अज्ञान वृत्ती ॥७५॥
तेणे सुख दु:ख सकळ । हें सर्व सांडी थूळ । सूक्ष्म ते ही निश्चळ । राहे तेथें ॥७६॥
त्या कमळा मध्यें पाहि । आत्मा वर्ते लिंग देहीं । तेथ स्वप्रेविण कांहि । अन्यत्र नेणें ॥७७॥
तें सूक्ष्म देह संचारे । विपरीत ज्ञान विकारे । कंठीचेनि उद्रारें । स्वप्र देखे ॥७८॥
कमळ कळिकेचां पत्रीं । जागृति वर्ते सर्व गात्रिं । तैं हृदय कंठ नेत्रीं । भोगु त्याचा ॥७९॥
कमळकळकेचां त्यागी । तुरीया बाणें सर्वागी । देहत्रयांचां भोगीं । अतितु होये ॥८०॥
तेव्हा अंगीकरी महाकारण । हे ज्ञप्तीचें लक्षण । तेथ सुखदु:ख कवण । बोलों शके ॥८१॥
सांडी कमळाचि हेतु । तैं उन्मनीसी संघातु । तें सांगावया मातु । कोण उरे ॥८२॥
ते हृदयकमळाचां पोटी । कळा आठें आठ चौसटी । मुख्य आठ गुण हे गोठी । बाहात्रि होति ॥८३॥
असें कंदोत्पन्न निर्मळ । जें तें अष्टदळकमळ । ते हें शुध्द चोखाळ । सर्वा मध्यें ॥८४॥
तेथ गुण कळा परिमळ । भोक्ता आत्मा अळिकुळ । हा सांगीतला सकळ । विकारें सहितु ॥८५॥
॥ इति कळायुक्त अष्टदळ ॥
====
हा आत्मा देवाधिदेवो । सर्वा अंति हा चि ठावो । ईश्वरादि भावो । येथे चि नेमिला ॥८६॥
यास्तव चौघे ब्राह्मण ।यासि ची वर्णिती गर्जून । देति महावाक्यें प्रमाण । याचा चि ठाईं ॥८७॥
तैसें चि साही नागारी । बोलती मोकळां उत्तरीं । हा चि स्वामी साकारी । नेमला असे ॥८८॥
अष्टादश पुराणिक । इत्यादि बालते अनेक । आत्मया वाचूनि आणिक । नेणति नेमे ॥८९॥
हा सचिदानंद अक्षरु । क्षरु न घे विकारु । वैरी मैत्री दावि भरु । जनभावीं ॥९०॥
चहुं भूतग्रामिच्या प्रजा । यासी समर्थु आत्मराजा । तो अष्टदळीं नेमुनि वोजा । बोलिला मिं ॥९१॥
॥ इति आत्मा ॥
====
तवं शिष्यु बोलिला । जीव तो अजपे गुंतला । आत्मा कोण तो या बोला । नेम करा ॥९२॥
तव बोले कृपाळु । जीव शव्दे देहमेळू । तो चौदावा कथनी प्रांजळु । करुं ये खंडी ॥९३॥
जेणें चळे प्राण वातु । तो जीव प्राणतंतु । हा सांगीतला समस्तु । अजपा प्रसंगी ॥९४॥
प्राण तो श्वासोश्वासु । जयासी बोलिजे “हंसु” । अष्टदळीचा सबलाश्रु । जीवात्मा हा ॥९५॥
असो हे येकाचा बोधु । आत्मा देखती त्रिविधु । हा ही अर्थु प्रसीद्भु । करुंनि देवो ॥९६॥
थूळ समुदाव संपूर्ण । यसी उर्मी जरामरण । हा चि आत्मा हें वचन । बहुतांचे असें ॥९७॥
इंद्रिया प्रवृत्ति तेथून । ज्यासी सुखादु:खाचें ज्ञान । असे चाळक मन । तो अंतरात्मा देहिचा ॥९८॥
मन शरीर आधारें जेणें । ज्याचेंनि चळती सगुणें । जो क्षुधेतृषेतें जाणें । तो प्राणु परमात्मा येथें ॥९९॥
तैस्या चि बृहदर्णिका श्रृति । आत्मा त्रिविध बोलती । तेथीचि वित्पत्ति । असी आहे ॥१००॥
उत्पत्ती जागृतीसी अभिमानी । तो येकु आत्मा इह स्थानी । निद्रा प्रलय जेथूनि तो परमात्मा परस्थानीचा ॥१॥
संधी तृतीय हे वचन । तो स्वप्र स्छितीसी प्रमाण । हे प्रांजळ बोलले कथन । उत्तरखंडिचें नवम ॥२॥
इहस्थानी परस्थानी संधी । आत्मा त्रिधा बोले वेदिं । परि राया जनका प्रश्नु सिध्दि । न पवे चि येणें ॥३॥
हे शरीर देह मात्मा । सून्य तो परमात्मा । यातें जाणें तो अंतरात्मा । हें ही नमनि परधियिआ ॥४॥
शरीर मन प्राणु । असा त्रिविध आत्मा मानू । तरि हा चि बोलूं अप्रमाणू । देखिला सिध्दीं ॥५॥
आत्मा मानिला स्वप्रकमळीं । विशेषें मानिला अष्टदळीं । हे देह ज्ञानाची टवाळी । नमने चि देवा ॥६॥
आत्मा येकविधु ह्मणु । अथवा छिन्न भिन्न रुपें मानूं । तरि या बोलातें आछादुनु । बैसले ज्ञातार ॥७॥
हा आत्मा पूर्ण पाहे । अपूर्ण वस्तु कहिं ही नोहे ।पण बहुविध होवावया आहे । कारण तें येक ॥८॥
हा ब्रह्म चि नसुधा । यासी अहंतेचा बाधा । माये संगें धोंदा । जाला तो हा ॥९॥
अविद्यागळें फुटला । जगदाकारें वाढला । नामें रुपें नटला । तो हा आत्मा ॥१०॥
यासी अविद्या सुड भरे । घुमे प्रणवाचे गजरें । मायादेवी राहाणी संचरे । मोकळा खेळे ॥११॥
घुमता दावी भूतसृष्टी । हा चि घुमता दिसे दृष्टी । तरि वावो या भूतगोष्टी । निर्धारें जाण ॥१२॥
हा प्रकृति हा चि भूतें । हा घुमे हा चि घुमविते । हा भोगी सर्व भोगातें । अवयवेंवीण ॥१३॥
यासी देहेविण वर्त्तने । विण करें घेणें । चक्षुविण देखणें । भूतग्रामातें ॥१४॥
हा उदरेवीण तृप्ता । शिश्नेविण भोक्ता । मुखेंविण वक्ता । सर्वत्रांचा ॥१५॥
हा योनिविण प्रसवतु । कंठेविण गर्जतु । विण शिरें डोलतु । ‘होय ’ ह्मणूनि ॥१६॥
हा श्रोत्रेविण आइके । चरणेंविण चमके । सर्व गंधु नासीके । वीण घॆ हा ॥१७॥
हा जिव्हेविण चाखे । भावेंविण तोषे । जन्ममृत्यु सुखदु:खे । लिंपे ना हा ॥१८॥
घट भंगे घटाकारें । नभ नभी च संचरे ।तेवि देही अति निर्धारें । परमात्मा हा चि ॥१९॥
परमात्मा नित्य पूर्ण । असे सर्वत्र वेष्टुन ज । आदि मध्य अवसान । नाहि तया ॥२०॥
हा योगियांचा जीवन झ। हा चि दशेचे मंडन । ब्रह्मज्ञाना भूषण । हा चि होये ॥२१॥
हा चि आधारु वेदा । शास्त्रां हा चि मर्यादा । हा चि वर्णिता सदा । सर्व पुराणें ॥२२॥
हा चि समस्तांसि आद्य ।हा चि दर्शना वंद्य । देवाचें ही सद्य । दैवत तें हा ॥२३॥
 हा चि गुह्याचें गुह्य । हा चि बीजाचें बीज । महामायेचें निज । भुवन ते हा चि ॥२४॥
हा देह सन्मधें अपुरा । आला अष्टदळ गाभारा । जेवि तरंगापुरतें सागरा । होणें जालें ॥२५॥
किं रतीपुरतें सोनें । किं घटापुरतें गगन । किं अंगारापुरातें हुताशन । घेणेंरुप ॥२६॥
परमाणु प्रमाण क्षिति । तेवि देहीचें आत्ममूर्त्ति । अष्टदळा ही पुरती । दशा याची ॥२७॥
हा अष्टदळीं चि वसें । तरि रोमरोमीं कोण असे । हा नाहीं असी वोसें । स्थानें कैचीं ॥२८॥
परि देह चळावया कारणें । लिंगदेह विचरणें । अष्टदळीं ठाणें । घातलें येणें ॥२९॥
हा आत्मा पूर्ण सर्व होय । तरि भेदा लक्षण काय । हे चि लाधली सोय । प्रबुध्दांसी ॥३०॥
असा जो आत्मा ज्ञानी । तो चि आत्मा भर्वसेनि । एवढि दशा आंगा आणि । बालबोधु हा ॥३१॥
ह्मणें तीमा भैरव देवो । हे बालबोध ग्रंथरावो । सर्व ही ज्ञानाचा डावो । येथि चि वोळला ॥३२॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे अष्टदळविवरण नाम सप्तम कथन मिति ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP