मध्यखंड - देहस्थानमान

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


अभ्यसबोधविश्रांतौ गुरुशास्त्रैकसेवनात्‍ ।
व्दैताव्दैतदृश: शांत्या निर्वाणोचितमुच्यते ॥१॥
अहोरात्र साटि घटीका । सप्त चक्रें साडेदश शतें पंकोळिका । सासे येकवीस सहस्र नेटका । जपु चाले ॥१॥
हे अजपा भूतजननी । मृतवल्ली संजीवनी । योगिया मोक्षदायिनी । गायत्री ते हें ॥२॥
पूर्ण देहाचे साजनें । हें अप्रत्यक्ष देखिले कोणें । देव देवते तीर्थें स्थानें । येथें चि घेणें ॥३॥
सप्तपुरी सप्तचक्रें । येथ देखावीं सर्वत्रें । एणें चि होति देहगात्रें । मोक्षरुपें ॥४॥
देहीचा आत्मा जो नेणें । जो नानि देहज्ञानें । त्याचें आंधळें बोलणें । न मनें बुध्दा ॥५॥
देह ज्ञानावांचुन । प्रत्यक्ष सुख नाहि आन । असो हें आतां थानमान । देहिचें बोलु ॥६॥
प्रत्यक्ष वैष्णवी कुंडलिनी । तिचें वदन स्वाधिष्ठानीं । नाभि सप्त वळनी । माहामाया ते ॥७॥
इयेचीं नाभि वळने । ऐसी बहुतांचि वचने । परि बोलिले त्रिलोचनें । तें अनारिसें ॥८॥
इचीं सप्त वळनें निर्मळें । यांचां पोटीं सप्तकमळें । भूमध्यें पुछ इचें न चळें । श्वासोश्वासु ॥९॥
महालिंग इचां तळवटी । त्या लिंगासमीप नेहटी । त्रिकोण अग्रीचि आगीठी । अखंड मध्यें ॥१०॥
त्या पावका अध । देवि कामाक्षा प्रसिध्द । ते शक्ति सन्निध । मेहस्थान असे ॥११॥
कुंडलनि कंठा संन्निधु । नाडीचें मूळ योनिकंदु । नाभिमंडला अधु । कारण सर्वा ॥१२॥
जयाचें प्रमाण षडांगुळ । जेथुनि देह चळे सकळ । तो करणें प्रांजळ । अष्ठदळ कथनीं ॥१३॥
तया कंदां तळवटीं । असे विसां पुडांची गांठीं । दुर्गधी त्याचां पोटीं । विस्तीर्ण असे ॥१४॥
तया तळिं मळ असे । वास्तिस्थानी मूत्र वसे । रक्ताचें जीवन तैसें । उर मंडळीं ॥१५॥
नाभी समीप वामभागीं । तीळ प्रमाण दीसे आगीं । उदकें उटे धगी । घृते शमे ॥१६॥
समीप नाभिमंडळा । तेथ सूर्य बारा कळा । उर्मि धूम्र ज्योति ज्वाळा । प्रगटा नसती ॥१७॥
ताळुचां मूळीं पूर्ण प्रकाशी ।सोळा कळा वर्ते शशी । हा आम्रुत स्रवे तें ग्राशी । दिवाकरु तो ॥१८॥
अनुहात चक्रावरी । सुषुम्रा मगराकारी । तेथुनी अंगुळें च्यारी । उर्ध्दकुंडलनी ॥१९॥
ते आउठ वलना व्याली राहे कंठाचा मूळीं शव्दाचा गोंदलीं । प्रगटते ॥२०॥
तियेसी उर्ध्दमेळीं । च्यारिं पर्वें कंठ नळिं । घंटिका मणि सकळीं । जाणिजे वरी ॥२१॥
तयावरी येक अंगुळ । असे रसनेंचें मूळ । जीचां अंगी सकळ । रुचा असति ॥२२॥
तयावरी अधोवदनी । असे जिव्हा विष व्यापिनी । तये देव्हडे दोनि । रत्न कंदुक ॥२३॥
कंठनाळा पासाव नळी । बारा अंगुळे आली तळी । तयेचां अग्रमेळीं । येक घटु असे ॥२४॥
तेथ नव प्रकार । ये शरींरी ते चि सार । ते हिं आतां सविस्तर । सांघीजैल ॥२५॥
काळज फोफस पित्त । तिली दोनि बोके पत्र आणि अंत । त्यासी चुनाळु ह्मणिजत । ते कमळ नवमे ॥२६॥
तो कदळीकमळा ऐसा । या मध्यें लिंगदेहासरिसा । तेथ जीवात्मा असे तो सर्वसा । शरीरातें चाळी ॥२७॥
निडळा उपरी सार । देवटे दोनि भ्रमर । तदोपरी क्रिमिकोठार । अंगुळे च्यारी ॥२८॥
हें जाणावें निर्धारें । कोण्हा न मनिती ये उत्तरें । तरि धूळ मारिलेंया नंतरें । ते घटिका दोनि सचेत ॥२९॥
ते चि कमली अष्टदळ । दुजा न्यायें कंदु मूळ । तेहि करुं प्रांजळ । सप्तमा कथनी ॥३०॥
मुख्य जिव्हेचां तळीं । असे वारुणा मातावली । मुखीं उदकाची उकलीं ।तेथुनी चाले ॥३१॥
रसनामूंळावरी सुभटा । चहुं व्दारांचा चोहटा । पांचवा मार्गु सुनिष्ठा ।तो गुप्त असे ॥३२॥
तया समीप पश्चिम मेळी । तळूली असे निर्झर जळीं । तेथ हंस करी आंघोळी । संध्याकाळी ॥३३॥
या हि विशेषें बरवी । जियेतें जाली सिंधु सेवि । ते परम शक्ति सत्रावी । शीरस्थानी हे ॥३४॥
जेथ अमृताचा गळाळा । जे साधकां जीवनकळा । जे दुर्द्दशा झाडी हेळा । जरा मृत्य ॥३५॥
ते काकीमुख मयूर गळका । गोपादशिरशिखा । हंसाकृत अंबिका । सत्रांविं ते ॥३६॥
तये तली नळिनी । सार रेत जीचां स्थानीं । पाठिं देखिजे तेथुनि । ब्रह्मव्दार ॥३७॥
नासामूळीं भ्रूमध्यस्थानीं । तेथ संगमु त्रीवेणि । हे चि त्रीस्थळी जननीं । मोक्ष रुपा ॥३८॥
इडा वामे मंदाकिनी । विष्णु देव चंद्र वाहिनी ।ते शक्ति नारायणी । चिदात्मक ॥३९॥
पिंगळा दक्षिण नाडी यमुना । ब्रह्मतत्व सूर्यवाहना । ते ब्रह्माणी सगुणा । आनंदरुपा ॥४०॥
मध्यें सरस्वती जननी । ते सुषुम्णा अग्रि वाहिनी । ईश्वरुदेवो भवानि । सत्संत माया ॥४१॥
हे क्षेत्र महास्थूळ । देह चळना मुख्यमूळ । महातीर्थाचें सकळ । बीज ते हें ॥४२॥
मागां बोलिलों चोहटा । तो मार्गु सांगों सुभटा । चहुं व्दारांच्या वाटां । च्यारि त्या ऐसें ॥४३॥
प्रथम मुख्य मार्गु सुसंग । थूळ देह आचार लिंग । हें अधसून्य चांग । खेचरी मुद्रा ॥४४॥
येथ वाचा वैखरी । वर्ते शब्दव्यापारी । ऋग्वेदु येथ अधीकारी । अखंड मान ॥४५॥
येथ हे उर्मिकला विख्यात । मुख्य मुक्ती समीपता । एवं दृश्य गुण मंडिता । प्रथम मार्गु हा ॥४६॥
दुसरा घ्राण मार्ग निर्धारी । धूम कळा मुद्रा भूचरी । मध्य सून्याचा विचारीं । देखणेंपण हें ॥४७॥
मध्यमा वाचा मुक्ती समीपता । येथ गुरुलिंग देवता । सूक्ष्म देह नांदता । यजुर्वेदु तो ॥४८॥
नेत्र मार्गु वाचा पश्यंति । चंचारी मुद्रा कळा ज्योति । उर्ध्दसून्य मुक्ति । सारुप्यता तेथें ॥४९॥
हे शिवलिंगदेह कारण । सामवेद संपूर्ण । स्वरुपाचा प्रकाश देखणेंपण । तेथ असे ॥५०॥
पुढां श्रोत्र मार्गु वेद अथर्वण । जंगम लिंगदेह महा कारण । परा वाचौ देखणेंपण । निर्धारु येथें ॥५१॥
हे चतुर्थ शून्य ज्वाळाकळा । अगोचरी मुद्रा निर्मला । सायुज्य मुक्ति हा आगला । श्रवण मार्गु ॥५२॥
ऐसे प्रगट मार्ग च्यारी । वर्तती चहुं व्दारीं । तो येकु येकु दशधा परी । वर्तत असे ॥५३॥
चहुं इंद्रियांचा वाटा । यास्तव हा चोहटा । सप्त व्दारांचा मूळवटा । हा चि होय ॥५४॥
दोनि मार्ग श्रवणी । दोनि मार्ग नयनी । दोनि मार्ग घ्राणि । मुखीं येकु ॥५५॥
ये प्रत्यक्ष सप्त व्दारें । परि इंद्रियें च्यारि च निर्धारें । चोहटा येणें विचारें । यासी बोलिजे ॥५६॥
येथुनु पांचवा मार्गु पुढें । तो गुप्त आहे भले पाडें । हा ज्ञातारां सांपडे । ब्रह्मव्दारिचा ॥५७॥
ते आनंदें ब्रह्मनिर्धारु । आत्मसायुज्य देह अक्षरु । अलक्ष मुद्रा विचारु । चैतन्य कळा ॥५८॥
ते पूर्ण सून्य सूक्ष्म वेद चांग । निशब्द वस्तु प्रसादलिंग । ऐसें हें स्थान सुसंग । विव्दज्जनाचें ॥५९॥
घ्राणमार्गि पवित्र । असे सूक्ष्म चर्मपत्र । नाद उमटती सर्वत्र । येणें सूत्रें ॥६०॥
वायु चाले घ्राणाव्दारें । त्यावरी पत्र दुसरें । भरला वायु तेणें धरे । निर्धारेंसी ॥६१॥
मागां नळिनीं बोलिलो ब्रह्मव्दारीं । आइक तेथीचि कुमरी । कळा आहे अधोपरी । भली तयेसी ॥६२॥
ताळूसी त्रिकोण जठरु । प्रवाळांकुरु मनोहरु । आणि ब्रह्मांडी निजवीर्य हा निर्धारु । नवनीताकार अध असे ॥६३॥
अग्रि दीप्त होय मैथुनें । ब्रह्मांडीचें वीर्य उत्तेजें तेणें । ते नळिनी भरुनि फीरे जडपणें । तो चि द्रावो ॥६४॥
एवं देहीची थानमानें अनेगें । कांहिं सांगीतली संकळित मार्गे । षटु चक्रें अजपा प्रसंगें । तें ही बोलिलों ॥६५॥
दशदेह आणि अष्टदळ । तें पुढां सांगों सकळ । आतां सांगों सकळ । पुरुषोध्दारण ॥६६॥
सोळा संधी नवनाडी । बाहात्तर कोष्टे परवडी । दशम स्थानाची उतरडी । कळे येथें ॥६७॥
चक्रें वर्तुळें पद्माकारें । ऐसी समस्ताची उत्तरें । बोलिलें पुरुषोध्दारणी शंकरे । आडवीं लांबे ॥६८॥
आधारचक्र चतुर्द्दळ । तें च्यारि कोष्ठ चतुरांगुळ । यास्तव च्यारी पर्वे सकळ । रुंद गुदी ॥६९॥
यावरी स्वाधीष्ठानयंत्र । तें षटकोष्ठ षटपत्र । यास्तव लिंगस्थान सर्वत्र । सा अंगुळें रुंद ॥७०॥
तदोपरी अष्टकोष्ठ । तें चक्र अंगुळे आठ । यास्तव वास्ति निकट । आठ चि पर्वें ॥७१॥
तदोपरि दश कोष्ठ दिग्दळ । तें चक्र दशांगुळ । यास्तव कटि मंडळ । दाहा चि पर्वें ॥७२॥
तदोपरि हृदयपचक्र व्दादशांगुळाकार । ते व्दादश कोठार । यास्तव हृदय लंबाकार । बारा पर्वे ॥७३॥
तदोपरि मनचक्र अपूर्व । चौदा कोष्ठ चतुर्द्दश पर्व । यास्तव स्तनाउर्ध्द सर्व । हें चि प्रमाण ॥७४॥
तदोपरि षोडशदळ । सोळा कोष्ठ षोशशांगुळ । यास्तव स्कंधस्थान सकळ । सोळा पर्वे ॥७५॥
यानंतरें पवित्र ।ते व्दिकोष्ठ व्दिपत्र । ते दोनी पर्वें नेत्र । स्थान दीसे ॥७६॥
एवं नव चक्राचिया माला । या चि नवनाडी सकळा । त्याच्या संधी सोळा । वोळखाव्या ॥७७॥
नव्हाच्या आठ दक्षिणांगी । तथा चि आठ वामभागीं । या सोळा संधी योगी । नेमे जाणाती ॥७८॥
चक्रे त्याची नाडी घटे । निश्चयें याचें बाहातरि कोठे । हे महद्रुह्य निळकंठे । सुंदर बोलिले ॥७९॥
यामेळीं विराट विधान । तेथ बोलिले हे पुरुषोधारण । याचें बीज न्यास पूजन । तेथें चि असे ॥८०॥
या नाडी वेगळे सहस्रदळ । परि ते दशमस्थान निर्मळ । सर्वाचें सार केवळ । हे चि असे ॥८१॥
आइका चोविस तत्वाचे न्याय । पंचमहद्रूतें पंचविषय ।ज्ञान कर्म इंद्रियें । दहा होती ॥८२॥
मन बुध्दि अहंकार माया । एवं ये चोविस तत्वें शिष्यराया । आतां चोविस या चि न्याया । आणूं देहें ॥८३॥
पांच महद्भूतें प्रसिध्दें । साहावें महत्तत्व सुधें । षट्‍तत्वें एवं विधें । मुख्य सारे ॥८४॥
या मुख्य सां उपरी । आइक आणिक देहें च्यारि । विराट हिरण्यगर्भ निर्धारी । अहंकारु माया ॥८५॥
अंत:करण चतुष्टय । आणिके दाहा इंद्रियें । या परी बोलिजति देहे ये । चोविस ऐसी ॥८६॥
पंचधा येक मारुती । तत्त्वाचे गुण विषय होति । यास्तव ये दाहा न येती । तत्वगणनें ॥८७॥
सा च्यारी चौदा ऐसी । तुज निरुपिली अप्रयांसी । आतां बोलुं षोडशी । कळा त्या हिं ॥८८॥
अंत:करण पंचक बा रे । हें भल तेउतें वावरें । यास्तव बोलिलें शंकरें । विषम ते हें ॥८९॥
श्रोत्रवाचादिकें येकवटें । चालति येके वाटे । ये दशेंद्रियें प्रगटे । समे होति ॥९०॥
या पंधरा कळांचें । लिंग देह जीवाचे । जीवा जीवत्व साचे । ते सोळावी कळा ॥९१॥
या वरी सतरांवी कळां । ते आत्ममय निर्मळा । जीचां ठाई सोळा । होति जाती ॥९२॥
इतिश्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे देहस्थानमाननाम पंचकथन मिति ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP