मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| देहाभिमान योगी मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - देहाभिमान योगी सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी देहाभिमान योगी Translation - भाषांतर नानापदार्थसत्तेह सर्वादिकारणं वपु: । ततस्त्वां बोधयिष्यामि कारणाकारणं क्रमात् ॥१॥आतां येथूनि देहभास । सांगणें पडले उदास । याचे आधारें सर्वस । देखीजत ॥१॥हरिहर ब्रह्मादिक । गंधर्वगण वृंदारक । दानव ऋषी पन्नक । पितरा द्यस ॥२॥तारा ग्रह शशि भास्करु । विराट हिरण्यगर्भु सर्वेश्वरु । महतत्व माया ईश्वरु । देहरुपी ॥३॥देह चि प्रणव ज्ञान । देह ची सुखसाधन । तैंसे चि ब्रह्मज्ञान । देहे लाभे ॥४॥या देहाचें आधारें । आत्मा रुपासी ये बा रे । देहा वेगळें उरें । तें अनिर्वचनिय ॥५॥च्यार्हि भूतग्राम मुख्य । योनि चौर्यासी लक्ष । अणु दीर्घ असंख्य । दाटलें हे चि ॥६॥ब्रह्म प्रकृति गुणात्मक । पांचही पंचकें पंचभूतिका । यां छतिसां तत्वि येक । देहिं चि होय ॥७॥हे सर्व देह ची निर्धारें । पण जण जन धावे समर्थाचे मोहरे । कां जें थूळें साकारे । रुपा येती ॥८॥गिरी शीला सरिता सागर । देव ऋषि तारा नर । दीर्घ निरंतर । वंदि जन ॥९॥मानवी मुख्य जीवयाति । हे उच्च ते वंदितिं । याचें चोज काई प्रतिमा पूजिति । थूलाथूळा त्या ॥१०॥या चि प्रकृतीमाजि देव । ते उत्तम सर्वत्र सर्व । येर नाना योनिचें जीव । हीन रुपी ॥११॥समस्तां जीवाहुनि सार । ते हे मानवी शरीर । सर्वज्ञ चराचर । हें चि जाणे ॥१२॥या देहाचें आधारें । निर्गुण ब्रह्म अंकुरें । मां वश्य होति साकारें । नवल काई ॥१३॥जें जें त्रैलोक्या भीतरी । तें पाहे ये ची शरीरीं । समुद्र सरीता गीरी । मुख्य करुनि ॥१४॥मोक्ष स्थानें तीर्थे पुरे । मेरु मांदार शीखरें । दीपें खंडे चराचरें । येथें चि पाहें ॥१५॥ईश्वरा पासुनि मशक । येथें चि पाहे सकळैक । वेगळें सांगतां अनेक । वाढती बोले ॥१६॥हें निर्मळ करुनि पाहासी । तरी सर्व येथें चि देखसी । मंदे मळ जालयां होसी । तुं चि अंध ॥१७॥हें शीलें असें करीसी भारी । तरी बुडसी भवसागरी । पाठीं तुज तुझा वैरी । दुजा न मिळे ॥१८॥जरी हे करीसी सोज्वळ । तरी तरता न लगे पान वेळ । तैं तुझा सखा केवळ । तुं चि बापा ॥१९॥हें अविद्या वल्लिचें कुसम । परी फळ दे अनुपम । हें भाविता विषम । भ्रमचक्रीं पाडी ॥२०॥हें वलें तो कांठ मुरडी । यासी दे आत्मगोडी । तेथ दावी अनावडी । संसाराची ॥२१॥तुं ह्मणसी हें अपूरें । तरी येथें ची सार आहे बा रे । अविद्या अहंतेचें कावरें । एणें ची झडे ॥२२॥हे मृगजळाकार दीसे । परि मूर्त्ता मूर्त्त बोल असे । हें नाशीवंत प्रकाशे । अविनाश येथें ॥२३॥जे असती या भीतरी । तें तुझी अपत्यें तुझां उदरीं । हे ज्याची प्रतिष्ठा करी । तें तुझें स्थापित ॥२४॥असें हें समर्थ देह । तुज लाधलें समूह । आतां तूं होय नि:संदेह । याचें नि संगें ॥२५॥असा देहातें चाळीता । तो तु चि समर्थ निरुता । पाहाता तुज होनि समर्थुं आतां । कोण आहे ॥२६॥॥ इति देहाभिमानु ॥====असा सांगतां निधारु । येरां कळला विवरु । तेणें आनंद थोरु । प्रगटला ॥२७॥तो ह्मणे मिं ब्रह्म संचला । वरि हें देह लाधला । कुटुंब परीग्रहो जाला । केवढा मज ॥२८॥मिं पाळिता मी चि कर्ता । मिं संहर्त्ता मी चि धर्ता । बुडे तरे मि मिं वेत्ता । मिं चि मोघु ॥२९॥स्मृति पुराण इतिहास । वेद शास्त्र सर्वस । जल्पना वाचा बहुवस । मज चि स्तव ॥३०॥तीर्थ क्षेत्र तपोवन । मंत्र स्तोत्र पठन । हव्य कव्य दया दान । मज चि स्तव ॥३१॥मिं श्रध्दा कांहिं करुं । ते श्रध्दे मि चि आधारु । माया प्रपंचु ईश्वरु । मिं चि सर्व ॥३२॥मिं मुक्ति पदें कवटीं । तो त्रैलोक्य माझां चि पोटीं । मि चि मज माझा दिठि । समर्थु देखे ॥३३॥असा तो आपुलेंनि सुखें । मिं चि ह्मणौनि प्रेमे तोषे । आश्चर्यें डोले मुखें । हे चि बोले ॥३४॥माथा तुकीतु आवडी । आसनें हि प्रेमें सांडी । कैसी लागली गोडी । मिं पणाची ॥३५॥मिं मिं पणे मदोन्मत्तु । येणें बोधें सर्वागे ढुलतु । तो विनोदु निवांत । श्री गुरु पाहे ॥३६॥॥ इति शीष्यवचन शिष्यबोध ॥====मग तो विचारीं मनी । हा जाला देहाभीमानी । जड हें मीपण घेउनि । फुंडत असे ॥३७॥आह्मिं विनोदें चालविलें । देहकथन निरुपीलें । तो हें बापुडें गुंतलें । साच चि येथें ॥३८॥येणें मिपणाचेंनि वोघें देह पोटळिलें मोघें । हें जड घेतलें सांघे । कवणा दु:खा ॥३९॥येणें सर्वत्र निरसुन । घेतलें भारि मिंपण । हा मुक्त जाला हें प्रमाण । कैसें होईल ॥४०॥षेचराची जाली झाडी । तो नग्र होउन वस्त्रें फाडी । ते बाधा गेली कीं रोकडी । आंगी आहे ॥४१॥ज्वरु गेलया वेळा । सांडी सुस्वाद गळाळा । तो रोगनिवृत्तिचा सोहळा । कोठोनि भोगी ॥४२॥सांघे चिंतामणि घेरि आहे । तो दरिद्री मोळी वाहे । तरि तो असत्यवादी नोहे । कैसा मूढ ॥४३॥जो तरुं ह्मणे भवसागरी । तो मिंपणाचें थीलरी । बुडों पाहे तरी । पोहणारु कैसा ॥४४॥जो मिपणाचेंनि वृश्चीकें । डंखीला व्याकुळ पडे भूमिके । तो येणें संसार पन्नके । वाचे कैसा ॥४५॥मिं पणाचें जठरें । दहति ज्याची शरीरें । तो ब्रह्म सुधाकरें । निवे कैसा ॥४६॥मिपणाचे नळीकें । जे गुंतले ये चि आशंके । ते ये भवपाशिं चुके । ऐसे कैसें ॥४७॥सन्निपातु तुटला पाहातां । धावे वरलातु भल तेउता । तरी चित्त भ्रमु काय मागुता । जोडु जीवा ॥४८॥सर्व बंधनी तुटला । कारागृहिं सांपडला । तैसा हा मुक्त जाला । शीष्य माझा ॥४९॥हा तो ब्रह्म चि संचला । परि मिंपणे झांकोळला । जैसा चंद्र बिंबी आला । कळालोपीं ॥५०॥कां आपुलें निज मलें आरिसा । लोपी आपुलीया प्रकाशा । का पावकाचा धूम्र जैसा । पावकां लोपी ॥५१॥कां सूर्याचे मेघपटळ । आत्सादिति सूर्यकीळ । कां जळाचि बाबूळी जळ । झांकोनि राहे ॥५२॥तैसा जग ब्रह्म चि आइता । वरि प्रगटे अहंता । तै स्मरु सांडोनि भल तिउता । भांबावे भूली ॥५३ । जैसें अंबराचे मळ । पाखाळूनि कीजति निर्मळ । तैसें मींपण झाडोनि चोखाळ । करुं यासी ॥५४॥मिंपण पाति एक । झाडुन करुं ब्रह्म कनक । आतां उपदेशु सुरसीक । ब्रह्म यासी ॥५५॥याचें मीपण दवडू परतें । सवें चि झाडी नाना मतें । मग परब्रह्म आइतें । हा चि होईल ॥५६॥असा जाणौनि निर्धारु । उपदेशु करील श्रीगुरु । श्रीमद्भैरवाचा कुमरु । राजयोगी ॥५७॥तो त्रिंबकु परमानंदे । कथा सांगैल विनोदें । निवती जेथीचें संवादें । शिष्यकुळें ॥५८-६०॥इतिश्री चिददित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे देहाभिमान योगी नाम दशम कथन मिति ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP