मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| तामस गुण मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - तामस गुण सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी तामस गुण Translation - भाषांतर आतां तमोगुणजनित । जें वेद शास्त्र मार्ग रहित । आधारें विण आचरत । पराचें हेवें ॥३०॥कां उद्देश धरुनि शरीरी । आपले मनें मानिलें करी । सांडनें बळिसी खेचरी । भक्ति त्याची ॥३१॥पिशाच यक्षिणीं भूतें प्रेतें । यासी चि आराधी आर्ते । चेटकें कुमंत्र सहिते । सप्त करणें मानी ॥३२॥तो आतुटांया उगयां चि करीं । नेणें फळकर्मकुसरी । तें जाणावें चातुरीं । तामसकर्म ॥३३॥तो भक्ति धर्मु ऐसा मानी । वधी पशुच्या दावणी । हिंसा घातांचा मनी । आनंदु तया ॥३४॥उछिष्टें अपवित्रें रुक्षान्नें । मेद मांसादिक भक्षणें । ऐसी ज्याची भोजनें । ते तामस प्राणी ॥३५॥लोकु नेमें दुल्लभु । नसे मानवी देहाचा लाभु । अवगतिचा सुलभु । भोग त्यासी ॥३६॥व्याघ्र सर्प श्वान शूकर । ऐसे क्रूर जीव अपार । या अधोयोनि भोगिती नर । तामस जे ते ॥३७॥कीति एकांच्या स्मृती । यमलोकु ते अधोगती । कीति येकाच्या युक्ति । ऐसें न मनें ॥३८॥देहा वेगला जीव राहे । तैं तो यम लोकु साहे । तरि बृहदर्णिकी गीतेसी आहे । प्रमाण याचें ॥३९॥“ तद्यथा तृणजळयुक्त ” । ऐसें बोले कांडिका । आणि “ वासांसी जीर्णानि ” या श्लोका । आदि कृष्णु ॥४०॥निफजलें देह अंगीकारी । तेव्हा पुर्विल अव्हेरी । यास्तव देहेची भोग निर्धारीं । जीवांसी असें ॥४१॥ह्मणौनि त्या क्रूर योनी । भोगीति तामस प्राणी । एवं गुण त्रयांचि मांडणी । ऐसी आहे ॥४२॥॥ इति तामस गुण ॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP