मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| ब्रह्मसिध्देशोपदेश मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - ब्रह्मसिध्देशोपदेश सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी ब्रह्मसिध्देशोपदेश Translation - भाषांतर दुष्ट नक्षत्रीं संचरे । कां गुविणी भक्षि तिखीं क्षारें । तो गर्भ न थरें । मातु कुक्षीं ॥६१॥दाहा मासाची प्रवृत्ति । गुर्विणी होय प्रसूती । हे वेळ चुके ते बोलिजती । काळलोप गर्भ ॥६२॥तैं अपान बैसोनी मूळीं ।निरुंधीं गर्भु कमळीं । हो नेदी मोकळी । तो वृध्दि ना प्रसूती ॥६३॥असो हें मणिपुरा खालुता । स्वाधिष्ठानां वरुता । ते स्थानीं वाढता । होय गर्भु ॥६४॥आणि त्या गर्भाचें नाळ । नव्हे बरे वेगळे । ते बरेचा देठु मूळ । मातु कमळीं ॥६५॥जे गुर्विणीचें भक्षण । त्याचा रसु कारण । तेणें होय पोषण । गर्भाचें त्या ॥६६॥ते गर्भ कमळ व्दारें । वरेचेंनि पदरें । नाळा अंगे संचरे । बाळनाभा ॥६७॥हे चि गर्भासी जीवन । विचारु नाही आन । कां जें सर्वव्दारां निरुंधन । असे तेथें ॥६८॥जैसें तरुचें सार सकळ । देंठ व्दारें घे फळ । तेवी त्या गर्भासी नाळ । कारण असे ॥६९॥कां तरुलतेचेनि मूळे । पोषती शाखा पत्रें फळे । तेवी मातु कमळवरनाळें । वृध्दी गर्भा ॥७०॥असो तो गर्भु वोटीया दाटोनी । वसेकटी नाभी स्थानी । कुक्षीं ते भरुनि । वाढता होय ॥७१॥पुत्र वसे दक्षिणांगी । कन्या वाढे वामभागीं । मध्य नपुंसक दोहि अंगी । दोनि बाळें ॥७२॥पुत्र अधिकें शुक्लिते । कन्या अधिके शोणिते । रक्ता रेता समवेते । नपुंसक ॥७३॥ऐक्य जालया रक्तरेता । मध्ये अपानु पडे अवचिता । तेणें गोळु फुटे तैं उभयतां ।वाढती बाळें ॥७४॥विभागीं अधिक शुकित । तेथें आत्मजु वाढे निभ्रांत । न्यून जालयां रेत । वधू होय ॥७५॥कर पाद अंगमेळी । मुखीं शीरीं करांजुळी । अधकंठ शीरतळीं । वसे गर्भु ॥७६॥तो नाळे गिवसीला । वरुनि वर मोटा बांधला । मळ मूत्रें दाटला । कष्टरुपी ॥७७॥ऐसा संकष्टीं दाटला । ह्मणसी तो कैसा वांचला । तरी जाति स्मरु आपला । सुचोनि असे ॥७८॥आणिक परवस्तुचां स्थानि । लय लक्ष ठेउनि । या कष्टातें साहोनि । जठरीं होता ॥७९॥स्वयं आत्मा मानित । एव्हडा परमानंदु जेथ । बाह्य कष्टातें तेथ । कोण मानी ॥८०॥जैसा योगी समाधी । बाह्य संकोचु न बाधी । कां जे स्वयमात्मा ओषधी । सेविली तेणें ॥८१॥तैसा गर्भु उदरीं । दु:ख नेणें सर्वेपरी । हें दु:ख देखता तरी । साहाता कैसा ॥८२॥तैं गर्भीं सर्वव्दारा निरुंधन । मध्यें चि प्राणाचें भ्रमण । लिंग मस्तका पासुन । मर्यादा त्याची ॥८३॥तैं पुढां घालूनि ‘ह ’ कारु । ये पाठिलगा ‘स’ करु । ऐसा शरींरीं चि निरंतरु ।प्राणु खेळें ॥८४॥एवं नव मास क्रमून । होय गर्भाचे उन्मळन । निगतां योनिमुखें दारुण । कष्ट होती ॥८५॥यास्तव जाति स्मरु विसरे । प्राणु चाले घ्राणव्दारे । तैं पुढिल अक्ष्रर होय माघारें । ‘हंस’ हा जपु चाले ॥८६॥पूर्विल ‘सोहं’ गेलें । ‘हंस’ ‘हंस’ जपु चाले । गर्भि होतें ते विस्मरेंलें । बाह्यकष्टीं ॥८७॥कां जे वोढितां योनिव्दारे । दु:खें स्वबोधु विसरे । ‘कोहं’ दीर्घस्वरे । गर्जोंलागे ॥८८॥आतां असो हे मातापिता उभयतां । सात्विकबुध्दी रमतां । तैं देवभक्तु शांतव्रता ।उपजे बाल ॥८९॥हाव भाव आलिंगनें चुंबनें । राजस वृत्तिचें रमणें । तो व्यवसायीकें लक्षणें । उपजे बाळु ॥९०॥क्रुर बुध्दिं तामसिं । रमतां असंतोष दोघांसीं । तें तामसें नष्टें तैसी । होती बाळे ॥९१॥अति कामातुर पुरुषु । अधीक होय शोणिताचा अंशु । तैं कन्या उपजे परी हव्यासु । पुरुषाचा तिंसी ॥९२॥तेथ अधीक शुकित । तो पुत्र होय बळविख्यात । नारी कामातुर बहुत । तै ऐसें घडे ॥९३॥तेथ अधीक जालयां बीज । त्या पुत्रासी भाव सहज । अधीकें रक्तें सुलज । उपजे कन्या ॥९४॥नपुंसकासी भाव । कामातुराचें सर्व । आधीं द्रवे त्याचें अवयव । बालका होति ॥९५॥आदित्य भौम संक्राति पित्रदिवसीं । अष्टमि पूर्णिमा दर्शीं । गर्भ संभवे त्यासीं । पवित्रता नसे ॥९६॥शशिसूर्याचां ग्रहणी । गर्भी संभवे प्राणि । तो राखोंडा वदनीं । तें चि चिन्ह ॥९७॥अपकरेती रक्त मिळे । कां गुर्विणी भक्षीं कंदे मूळें । तें हिंसारुप काळें । उपजे बाळ ॥९८॥वातुळे उपजे अंगहीन । गौल्य भक्षितां गौरवर्ण । महुरी तैलापासुन । श्वेतकुष्टी ॥९९॥तीव्र उष्णें भक्षितां अंबिळे । रक्तवर्णें होति बाळें । यास्तव गुर्विणी सकळें । मधुरे भक्षांवी ॥१००॥देवी गोवरु हे दोनि । दोष पितुवीर्यापासुनी ।हे अस्थि शिरा भेदुनी । प्रगट होति ॥१॥कांजनी गोदडी शोणितीं । हे मांस त्वचे प्रकटती । हे मातुगर्भींचे असती । दोनि दोष ॥२॥हे च्यारी नेमले सृष्टी । आणि षष्ठी दोष दृष्टी । या सप्तगंगौसंकष्टी । उतरे बाळ ॥३॥एकें दों तिं दीवसीं । संभूत होय अहर्निशी । दीर्घायु त्या बाळासीं । बोलों नये ॥४॥पाचां सातां नवां अकरां । या दीसी । संभूति होय गुरोदरा । तैं जन्म कुमरा । भर्वसेंनि ॥५॥येरा सम दिवसीं । संभूति होय नारीसी । तैं ते अपत्य कुंसी । कन्या होय ॥६॥पुरुष पिंगळा दक्षिणश्रवणें । नाडी इडा वाम कानें । विषमा दीसी ऋतु देणें । अवश्य पुत्रु ॥७॥नरु इडे वामभागीं । नारी पींगळे दक्षिणांगीं । द्रवती समदिनी संयोगी । तैं सत्य कन्या ॥८॥हें अगडेंसी वचन । बोलिले माहारुद्र आपण । परी प्रत्यो पाहिल्या वाचुन । विश्वासु नसे ॥९॥उभयांचे अंत: करण चळे । ते मुकीं बधिरे होति बाळें । मन निद्रे विस्मृति खेळे । ते लुंलीं होति ॥१०॥निद्रे विस्मृति आलस्यें रमती ई। तेथुन तें अंधें पंगें होति । संतोषु नसे चित्तिं । ते बोबडीं बाळें ॥११॥विपरीत रमतां स्वभावें । अवचिता गर्भु संभवे । तें बाळ जाणावें । नष्ट दोषी ॥१२॥जे अक्षरी संभूती । ते चि भोगी फळश्रुती । जन्मपर्यंत या स्थीति । वर्ते बाळक तें ॥१३॥ब्रह्ममूहूर्त्तसंभूतीकाळीं । ते चि अक्षर पडलें भाळिं । अन्य लेख न निडाळिं । असे चि ना ॥१४॥पुरुषाची श्रधा धरी । कामें विकळ होय नारी । उर्ध्दोदर निद्रा करी । द्रवे ऐसी ॥१५॥त्ये असतां रितुवंती । तिचे रेत पडे तिचा शोणिती । या परी संभवती । ते अल्पगर्भ ॥१६॥तेथ भाव नसे पितयाचा । नसुधें रक्त मांस त्वचा । अस्थि शीरा मज्ज्या यांचा । अंशु नसे ॥१७॥सा धातुचें सकळैक । हें देह षट्कौशिक । या धातुचें कौतुक । ऐसें असें ॥१८॥अस्थी शीरा मज्ज्या या तीन । धातु पितयापासून । रक्त मांस त्वचा पूर्ण । मातेच्या धातु ॥१९॥जें जें देहीं असे श्वेत । तें तें पीतयांचे निभ्रांत । आरक्त ते समस्त । मातेचे होय ॥२०॥रोम आणि कुरळ । उभयांचें सकळ । दोनि भाव प्रांजळ ।येथ दिसत ॥२१॥कामक्रोधु शोक मोह भय । ये पांच नभाचें कार्य । धावन चळन आकोचन वाय । निरुंधन प्रसरण ॥२२॥क्षुधा तृषा निद्रा आलस्य कांति । ये तेजाचीं गा शीष्यमूर्ति । लाळ मूत्र श्वेदु रक्त रेती । आदि तोये ॥२३॥रोम त्वचा शिरा मज्जा मांस। हे पांच महीचे अंश । पंचतत्वाचे पंचवीस । गुण ते ये चि ॥२४॥जायते स्थितियेते विवर्ध्दते । विपरीणमते । अपक्षीयते विनस्यति ये निरुतें । विकार नाहीं ॥२५॥जायतें तें जन्मतें । अस्ति ह्मणिजे असणें । विवर्द्धते वाढने । विकारु तीजा ॥२६॥तारुण्य तें विपरीणमते । जरा ते अपक्षीयते । सठा विकारु मरणातें । विनश्यति ह्मणीजे ॥२७॥क्षुधा तृषा मोह शोक । जरा मृत्यु इत्यादिक । या षडूर्मीचें कौतुक । थोर असे ॥२८॥अशन पिपासा प्राणा । शोक मोह हें मना । देह जरा मरणा । योग्य होये ॥२९॥ऐसें हें पूर्विची सकळ । देह जालें प्रांजळ । जन्मवेळे वगळे । समिश्रदत ॥३०॥यापरी संसारीया । वृध्दी होय इंद्रियां । क्षुधा तृषा सावया । उपरु दाविति ॥३१॥आशा मनसा तृष्णा कल्पना । या आकळिती प्राणा । इंद्रिये धरुनी वासना । धावती सैरा ॥३२॥काम क्रोध मद मत्सरु । दंभ प्रपंच अहंकारु । शोक मोह विकारु । पैसु दाविति ॥३३॥भय लज्या व्देषु । विषाद मैत्री हर्षु । अविद्ये होय विशेषु । आकळे आत्मा ॥३४॥पुत्र कळत्र पशु दासी । माया वाढे दिसेंदिंसी । मन धावे हव्यासी । संसारांचा ॥३५॥क्षांति क्षमा निवृत्तिं । त्या होति या गर्भस्थीति । त्या समस्तां हारपती । अविद्येमध्यें ॥३६॥ज्ञाना आछादी अज्ञान । बैसे संशयबंधन । हव्यास वाटॆ तो दारुण ।दीवसेंदीवस ॥३७॥या शरीराचें गणित । मोटकें प्रमाण आऊट हात । आउठ पीठेंसी नांदत । त्रिखंड तें हें ची ॥३८॥हें व्दिभाग संपुट । सोळा संधी बाहतरी कोष्ट । नवनाडी पुराष्ट । नवव्दारें यासी ॥३९॥येथ तीन लक्ष त्रीपन कोडी । बाहातरी सहस्र शिरा नाडी । तीन शतें साटी अस्थी एव्हडी । शरीरमीलणी ॥४०॥ये शरीरीं साचोकारें । अखंड झरती नव ही व्दारें । देव ग्रह याचि भीतरे । वोळखावे ॥४१॥याची विवंचना सकळ । येथून करुं प्रांजळ । तें हें मध्य खंड सकळ । देहज्ञान ॥४२॥या शरीराची कळ । चळे तों योनीकंदु समूळ । याचें प्रमाण षडांगुळ । नेमले असे ॥।४३॥येथीचें प्रमाण ऐसें पाहे । तीन अंजुळे सर्व मेहे । मूत्र अंजुळे च्यारी आहे । हे वृध्दीं बोलिजे ॥४४॥श्लेष्मु देहीं षडांजुळ । दाहा अंजुळे येथ जळ । नव अंजुळे रसाळ । रमु येथ ॥४५॥मळ तें अंजुळे सात । अंजुळे च्यारी सर्व पीत्त । आठ अंजुळे देही रक्त । कोष्ठे ऐसी ॥४६॥येर ये शरीरीं सर्वस । अस्थि शीर मज्ज्या मांस । त्वचा रोम बहुवस । दाटले असे ॥४७॥आणिक क्रीमि जीवसंत । या देहामध्ये असंख्यात । याचें कारण साक्षांत । पुढा असे ॥४८॥येथीचि थानमनें । चक्रें देवते भुवनें । ते आयकुनि कथनें । सुखीया होसी ॥४९॥ईश्वरादिक सिध्दयोगी । जें जे बोलिलें जें जें प्रसंगी । ते शिष्या तुझें आंगी । बाणें तें करुं ॥५०॥ऐसी कथा रसाळरंगी । बोले त्रिंबकु राजयोगी । निर्धारु बाणें जो जो आंगी । ते तें दाखऊ ॥५१॥इतिश्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे पिंडोत्पत्ति नाम तृतीय कथन मिति ॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP