मध्यखंड - अजपा विवरण षटचक्र

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आधार स्वाधिष्ठान । हे अधखंड अधभुवन । पाताळ लोकु प्रवीण । हा चि ह्मणति ॥१४॥
मणिपुर अनुहात मिळोनि येकु । मध्यखंड मृत्य लोकु । मध्यभुवन संतिकु । यासि जाणे ॥१५॥
विशुध्द अग्रिकमळ । हे उर्ध्दखंड स्वर्गमंडळ । उर्ध्दभुवन निर्मळ । यातें बोलिजे ॥१६॥
यावरी आउठावे पीठ अगोचर । तें सहस्रदळ त्रिकुटशीखर । आउटावेंखंड साचार । परम स्थान हें ॥१७॥
मातृका उत्पन्न विचारे । पांच ही तत्वें सर्व सारें । या पांचां चि अक्षरें । पांच ही बीजे ॥१८॥
पंचविस हिरण्यगर्भी पासुनु । तितुकीं विराटीं उत्पन्न । महतत्विं कारण । येक बीज ॥१९॥
पंनास षट्‍चक्रीं वाटलीं । पांच चक्रबीजें पहिलीं येकें वस्ति घेतली । येकें सहस्रदळीं ॥२०॥
या पंनासा वेगळा दोनि । जे बीजें त्रीभुवनीं । गुतंली प्राण जपा अझूनी । ते लेखना न येती ॥२१॥
अहं जीव अहं शीव । हे शीवा जीवा बीज भाव । हं सं हं सं गौरव । सोंह ब्रह्म ॥२२॥
आणिक येक साचोकारें । शिष्या सांगों निर्धारें । महागुज बाहिरें । प्रगट करुं ॥२३॥
पानरटि लिहिलि तो येणें भावें । यासि कोण्हि हि हळुवे न ह्मणावे । ज्ञातारें हृदईं धरावें । अपूर्व ते तें ॥२४॥
जैसी भारतामध्यें गीता । ते न मनावी मृत्युकथा । वेदगुह्य परमार्था । शुध्द बीज ते ॥२५।
तेवी कथारुपें न मनावें । गुह्य तें हृदईं धरावें । वनि लाधलें सेवावें । कल्पदृमु ॥२६॥
नाना शिळाचां मिळणि । सांपडला न संडीजे महामणि । पाणि झरा जोडे पाणि । घ्यावें चि अमृत तें ॥२७॥
तेवी पानरटातील गुजें । जाणौनि हॄदयीं धरिजे । तैं गुरु करावया काजें । सिणो नये ॥२८॥
असो हें तिन्हि पूर्णे मिळोनि । अक्षरें होत आहाति दोनि । येक प्रवृत्तिस्थानीं । दुजें ब्रह्मीं ॥२९॥
ज्यासी देखसी मातृका । ते प्रवृत्तिबीज वंद्य लोका । मातृका नसती तो निका । परस्थानीं बीज ॥३०॥
मातृकामय विश्व जालें । ते हें बीज प्रवृत्तिसी आलें । नाम पुससी तरी संचलें । ऊँ कार ब्रह्म कां नेणसी तुं ॥३१॥
मातृकारहित शुध्दाक्षर । तो तु वोलखा गा लं कार । पाठिं पाहावा निर्धार । गुरुकृपे याचा ॥३२॥
प्राणु गेलीयां ही अन्य स्थानी । हे गुह्य नेदिती ज्ञानी । ते म्यां मोकळा वचनि । प्रगट केलें ॥३३॥
एवं श्रीहराचे प्रसन्नते । गुह्यें केली हातायीते । त्रिंबकु ह्मणे ये स्वमते । नव्हति माझी ॥३४॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे अजपा विवरण षटचक्रनाम चतुर्थ कथन मिति ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP