मध्यखंड - अविद्या माया लक्षण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


आदौ देवमयीं देहो यं तत्‍ क्षेत्रं प्रवर्त्तयेत्‍ ।
नामरुपं च भूताना मात्मानं प्रतिबिंबति ॥१॥
शिष्या आइक वचन । हे मनुष्य देह सर्वासी कारण । सर्वांचे हि ज्ञान । हे चि जानें ॥१॥
भोगु स्वर्गु योगु साधनें । गति अवगति पतनें । भावाभावा जाणने नेणने । याचां चि ठाईं ॥२॥
रुपा नावं हें चि ठेवि । हे चि सर्वातें आळवी । येरां जीवाचीं गोवि । येथें चि उगवे ॥३॥
यास्तव हें महाक्षेत्र । क्षेत्रां हि मध्यें पवित्र । पाहिजे तें सर्वत्र । यथें चि बिंबें ॥४॥
पाहातां सवत्र क्षिति । त्रिविध भुमिका आहाति । पाहोनि पेरीलि पीक येती । बीजानुसारें ॥५॥
तैसें नोहे हें पवित्र । शरीर पूर्णक्षेत्र । येथ पीके सर्वत्र । पेरीजे ते तें ॥६॥
जरी बीज न संभवे । तरी वाचा मने चि पेरावें । ते ही येथ उगवे । असें पवित्र ॥७॥
येथ सव्दीज स्थिरावैल । तरी पीक ते क्षेत्र ची होईल । पेरीतां भववली विस्तारैल । चोर्‍यासी लक्ष ॥८॥
जे ज्ञानाग्री स्पृशति । ते पुनरपी अंकुरा न येती । बीजीं क्षत्रे सामावती । हें ही घडे ॥९॥
एवं कृषि होनि पवित्र । मज गमे हे चि क्षेत्र । आतां मुक्ति पावनार्थ । अन्यत्र क्षेत्र विचारुं ॥१०॥
तरी तीर्थें क्षेत्रें देवतें । ते हिं येथें चि निभ्रांतें । स्वर्गापवर्गाते देतें । हे चि क्षेत्र ॥११॥
त्रिभुवन देह संपुष्ठी । येथीचें तीर्थ क्षेत्रें संतुष्टी । तो सर्वबाह्य पोटी । पवित्रु सदा ॥१२॥
क्षेत्रें क्षेत्र उध्दरीजे । असें क्षेत्र नाहीं दुजें । देह क्षेत्रें तरीजे । भवार्णवु हा ॥१३॥
ये क्षेत्रीं घडतीं पापें । ते होति वज्रलेपें । अन्य क्षत्राचें बापें । फीटों न शकती ॥१४॥
जन्मभूमीचें मरणें । चुकती अधोपतनें । यास्तव असणें । क्षेत्रौगमीं ॥१५॥
ये ते परी पवित्र । हें सार देहक्षेत्र । या पुढां अन्यत्र । उपरुं ने घे ॥१६॥
॥ इति देहक्षेत्र ॥
====
देव योनिची क्षेत्रें । सदा सर्वदा पवित्रें । पवित्रापवित्रें । मनुष्य योनि चि ॥१७॥
अन्य क्षेत्रीचे जीव । ते हीन रुप सर्व । क्रीम कीटकाचे गांव । पाहों न येति ॥१८॥
असी यें देह क्षेत्रें । तुज सांगीतलीं सर्वत्रें । क्षेत्र राजाचि चरित्रें । आइक आतां ॥१९॥
जो ये क्षेत्रीं संचरे । क्षेत्र ज्या जयाचेनि आधारे । क्षेत्रें पाळी चळितो निर्धारें । तो क्षेत्र राजु ॥२०॥
जो क्षेत्र संगें वर्त्ततु । क्षेत्राचें भोग भोगीतु । तो जाणावा निभ्रांतु । क्षेत्रेश्वरु ॥२१॥
जो क्षेत्राचि गतिविगती । विद्या अविद्या नाशु उत्पत्ति । जाणें सर्व वित्पति । तो क्षेत्रज्ञु होय ॥२२॥
जो सर्व प्रकारें प्रगटे । जानें क्षेत्रांची मानवटें । तो क्षेत्रज्ञु प्रगटे । वचनें मानि ॥२३॥
॥ इति क्षेत्रराज क्षेत्रज्ञु ॥
====
तव शिष्य ह्मणें कळलें काज । परी येकी श्रध्दा आहे मज । पुसने तें सबीज । निरुपा मातें ॥२४॥
तुमची श्रध्दा बाणें । हे मी पृछा काय जाणें । काय दीपे सूर्यासी पुसणें । तमाची बाधा ॥२५॥
गंगा सींधुचे भेटी । पुसे निर्वोलता गोठी । तेविं मि तुमसी कवटी । प्रपंच पृछा ॥२६॥
मिं देह थिलरीचा दुर्दुरु । जालों भवार्णवीं पोहणारु । तेथे संशयकूपाचा विचारु । काय मज ॥२७॥
परी मज सूचलें येक । देव दिव्यरुप सकळीक । येर जीव अनेक । या पाडाचें ॥२८॥
आणि येकाच्या प्रकृति । प्रळय अंतीं उरती । येकें नाशु पावती । अल्प काळें ॥२९॥
येकु ईश्वरु येक देव । येक मानवी येक पशव । एक आत्मा तरी अवयव । भीन्न भीन्न कां जी ॥३०॥
एक ब्रह्मी विद्यमान । येक समूळ अज्ञान । असीं उत्तरें आइकुन । भवारी बोले ॥३१॥
तो ह्मणे शीष्यराजा । तुं प्राणापढीय आत्मजा । आत्सादलिया ही गुजा । काढिता होसी ॥३२॥
गुरु भूमि गुह्य निधानें । शिष्य साधकें प्रष्णांजनें । मनाचें पायें लपणें । दृश्य करी ॥३३॥
अभिमान देउनि बली । उपसे नम्रतेंचें अंजुळी । तो ची भोगी नवाळी ई । आत्मनिधीतें ॥३४॥
पाहातां परि शीष्य थोरु । जो उपसे गुरु सागरु । या ही वेगळा उपकारु । थोरु असे ॥३५॥
प्रष्णे गुरुसी आठवण । नाठवे तरी विचारी घालि मन । कां इष्टदेवत स्मरुण । उत्तर कांढी ॥३६॥
यास्तव गुरुसी शिष्ये गुरु । गुह्यतारकां तो धुरु । गुरु सरीता तो सागरु । गुह्य जळा ॥३७॥
यास्तव तुं वंद्य मज । या बोला नाहि लाज । माझा नमस्कारु तुज । प्रेम पुरुषा ॥३८॥
माझें गौरवाचें भूषणें । सर्वाद्य न मनावि दुषणें । कांटाळा आंगी वदनें । श्वासु दीसे ॥३९॥
जो ये ज्याच्या उदरा । तो सर्वेपरी त्याचा सोयरां । पूर्वजन्माच्या अधीकारा । पात्र होय ॥४०॥
तुं तो यासी अभावीं । परि माझें प्रेमें गौरवी । आतां स्मरु धरुनि जीविं । उत्तर आइक ॥४१॥
॥ इति गुरुशिष्यवचन ॥
====
करुनि शक्तिचे अंगीकार । जे जे होति साकार । ते मुख्य देवाचे अवतार । देव होति ॥४२॥
ते आपुले इच्छा विकारें । घेति सांडितीसरीरें । येरें आदानें विघ्रे ज्वरें । त्या नाशु नाहि ॥४३॥
जे प्रकृति आधिनें । उठती अविद्या अज्ञानें । तया जीवांसी मरणें । पल्लवींचि ॥४४॥
॥ इति देवजीवयोनी ॥
====
माया ब्रह्मीं विद्यमान । ब्रह्मानंदे संपन्न । यास्तव ब्रह्मपरायण । माया जात ॥४५॥
जे ब्रह्मी विद्यमान नोहे । तिसी चि अविद्या नाव साहे । एवं अविद्याजनित देहें । ज्ञान अंधे ॥४६॥
माया ब्रह्मींचि प्रकृति । ते विद्या सर्व वेत्ति । अविद्या ब्रह्मातें जाणती । तरी अविद्या कां ॥४७॥
तु भाविसीं चित्तिं । जे या दोन्ही देवाच्या प्रकृति । येकि वेत्ति येकीं अवेत्ति । हें कां जाले ॥४८॥
तरी उन्मेष स्फुरण स्थिति । ते महद्योनि सर्व वेत्ति । ते माया मूळप्रकृति । परमेश्वराची ॥४९॥
कोण्हि ह्मणेल माया अज्ञान । तरी ब्रह्मी स्फूर्ति उठे ते कवण । आणि होवावया ब्रह्मज्ञान । कोण शक्य ॥५०॥
तेव्हां शबल ब्रह्म माया । हा समूळ शब्द गेला वाया । तै ते कारण कार्या । वेत्ति नव्हे ॥५१॥
माया इश्वरु आन । ते माया सर्व अज्ञान । हें साच मानितां वचन । असे होय ॥५२॥
तैं भेदें जींकिलि पैज । फळलें न्यायकाचें काज । मिमांसा नाचैल भोज । आनंदाचे ॥५३॥
वेदांता उपनिषदां । पडला पालउ न फीटे कदा । सिध्दांत गेला ब्रह्मनिंदा । जाली ते हे ॥५४॥
ब्रह्म विकारें उत्पन्न । हें चि मायेचे लक्षण । सर्वा वेत्ति कारण । हे चि अंबा ॥५५॥
अविद्या येथें चि जाली ख । ते कां इश्वरातें चुकली । ये आक्षपी सुचली । युक्ती येकी ॥५६॥
तरि गां मूळि होनि भ्रांत । अन्य हेतु भ्रमित । असी जे पीशाचवंत । ते चि अविद्या ॥५७॥
जैसी दृष्टी न पाहे बुबुला । बोधु उगम विषयीं पांगुला । तैसी चूके स्वमूला । ते ची अविद्या ॥५८॥
जें कर्म काम कल्पनें । शाश्वत उन्मत येणें । तें मूळ भ्रांत एषणें । चोज न मानी ॥५९॥
जें जें अन्यथा ज्ञान । तें तें अविद्येचें लक्षण । यासी रुप नाम गुण आन । असे चि ना गा ॥६०॥
एवं अविद्येचेनि भरें । विद्येचा लेशु न थरे । तें अज्ञानकवळित शरीरें । नाना योनिची ॥६१॥
माया अविद्या जेथ जैसी । त्या नरां बुध्दी तैसी । परीसापरी सर्व हेतु सर्वेसी । तें मनुष्य ॥६२॥
तुं मानी हें चि युक्ति । जें सर्वा कारण या चि शक्ति । ब्रह्म रुप लक्षण व्यक्ति । याचि करीतां ॥६३॥
आगा ये पावका रुप नाही आन । दाहिकीचें ते ते लक्षण । ते या प्रकृति पासुन । ब्रह्म जाणावे ॥६४॥
॥ इति मायाअविद्यालक्षण ॥
====
प्रकृति पुरुषाचेंनि मळें । उठती ये सकळें । प्रकृति पुरुषा वेगळें । कांहि चि नसे ॥६५॥
ज्याचा जेथ अधिकावो । त्यासी उपजे तो चि भावो । हें दृष्टातें सांगोंनि देवों । तुज पासी ॥६६॥
स्त्री पुरुषापासुन । जें बाळक उत्पन्न । ते अधीका वीर्याचे गुण । घेउनि उठी ॥६७॥
पुरुषाचा अंशु अधीकु मिळे । तैं पुरुष लक्षणें सकळें । स्त्री भाव तेणें बाळें । स्वप्रि नेणिजे ॥६८॥
कांहिं शोणितांधिके । कन्या होईजे बाळकें । पुरुष भाव तितुकें । लोपति तेथ ॥६९॥
तैसा अधिक ईश्वराचा अंशु । तो ब्रह्मज्ञ पुरुषु । नैसर्गिकु रात्रि दिवसु । गुण त्याचा ॥७०॥
प्रकृतीचें अधिकांशें । तेथ आत्मगंधी लेंशु नसे । तें प्रपंचरत संशय वांसे । वेष्टित सदा ॥७१॥
यास्तव मागिल दृष्टांते । एक मूढ येकु ज्ञाते । या विश्वासा परुतें । आन न मनी ॥७२॥
॥ इति ज्ञानाज्ञानभाव ॥
====
ब्रह्म बिंब आदिवंत । ते माया दर्पणी बिंबत । प्रकृतिबिंब धीमंत । यासी ह्मणती ॥७३॥
ते अविद्या दर्पणी बिंबे । यासी बोलिजे उपबिंबे । हे तुज निर्धारुनि थांबे । तो दृष्टांतु देवों ॥७४॥
दर्पणी बिंबे भास्करु । तो प्रतिबिंब व्यवहारु । उपबिंबाचा विचारु । असा असे ॥७५॥
तो दर्पणु दुजा दर्पणी बिंबत । ते उपबिंब बोलिजात । कां जे सूर्यप्रकाश वर्त्तत । दोहि दर्पणी ॥७६॥
माया अविद्या आदर्श । तेथ उठती ब्रह्म भास । यासी ह्मणती सुडंस । बिंब न्याय ॥७७॥
अविद्या माया परस्परें । येकीसीं येकी संचरे । तेणें प्रपंच विस्तारें । गाहाळीं जाय ॥७८॥
माया अविद्या रुपा येत । या माजी वस्तुजात । अवछिन्न ब्रह्म बिंबत । दर्पण दर्पणाचा पोटी । देखो येती ॥८०॥
तैसेंची त्या माझारी । प्रतिबिंब दपर्णावरी । तेवि माया अविद्या विकारी । ब्रह्म बिंबे ॥८१॥
अविद्या जीविं चि असे । ते शीविं समूळ नसे । परी मायादेवी वसे । दोहीं ठाई ॥८२॥
व्दिपाद नक्षत्र जैसें । दोहिं कळां ते स्पर्शे । माया स्वरुप तैसे । दोहिं पदिं ॥८३॥
व्दिपाद नक्षत्र ते कवण । कळा वेधी कैसेन । पुससी तरि सत्ताविसामाजि तिन । व्दीपाद तारा ॥८४॥
मृग चित्रा धनिष्ठा । या व्दिपाद तारा वरीष्ठा । या चि दोनी दोनि अर्धें सुनिष्ठा । दों दों कळा ॥८५॥
अविद्या नेमस्त येक पदी । माया शबल व्दिपदी । हे चित्सत्वात्मक त्रिपदी । नेमें होय ॥८६॥
॥ इति मायाअविद्या दृष्टांत ॥
====
माया ब्रह्मिंचा विवर्त्तु । प्रपंच परिणाम साद्यंतु । बिंब दर्पण दृष्टांत । भेदिं वलघे ॥८७॥
असा विकल्प घेसिल चित्तिं । तरी जळीं तरगांच्या प्रकृति । तेथ जळ बिंबे हे न सरति । न्या कैसें ॥८८॥
दीपु प्रकृति साचारु । तर्‍हिं होय चि तो जठरु । बिंब प्रतीबिंब व्यवहारु । काय न सरे तेथ ॥८९॥
जैसी सूवर्णी लेणी । तैसी चि घृतेंसी कणी । हे अभेद भेदावाचून । बींबन्याये येईल ॥९०॥
ब्रह्म तें निराभास । परि माया अविद्या साभास । यास्तव सगुण सर्वस । प्रतिबिंब होय ॥९१॥
ईश्वराचें प्रतिबिंब देव । देवाचे प्रतिबिंब जीव । कां जे येकयेका पासाव । होय ह्मणौनि ॥९२॥
जीवा मानवी कारण । मनुष्या देव प्रमाण । देवा ईश्वरीं ज्ञान झ । ईश्वरु ब्रह्म ॥९३॥
यास्तव देवाचेंनि व्दारें । मानवीजाति उध्दरे । भक्ति धर्में प्रत्याकारें । तुष्टावे देवी ॥९४॥
जै मूळ सर्वाचें घेईजें । तैं तव्दत्‍ आपण चि होईजे । तैं सांडी मांडी उरीजे । तो पदार्थ नुरे ॥९५॥
आतां असो हां पूर्ण रसु । आधिं दहाचें चि सोसूं । याचा निराशि प्रकाशु । पूर्ण होईल ॥९६॥
या पुढां कथन येक । देह दाखउं सकळैक । पाहातां सर्वाचें साधक । हें चि असे ॥९७॥
प्रसन्न श्रीहरु विश्वकंदु । वरि चामुंडाप्रसादु । तो त्रिंबक करी अनुवादु । ये आत्मकथेचा ॥९८॥
इति श्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे अविद्या माया लक्षण नाम नवम कथन मिति ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP