मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|मध्यखंड| देहहंतानिरसनयोगो मध्यखंड वरदमूर्ति श्री भवानी शंकरस्तुति मंगला चरण जीवसृष्टी युक्त मानी देह उत्पन्न सात्विक गुण राजसगुण तामस गुण गर्भवासु गर्भस्छान ब्रह्मसिध्देशोपदेश जीवाचें लक्षण प्राण शतायु आधार स्वाधिष्ठान मणिपूर अनुहात विशुध्दचक्र अग्रि चक्र सहस्र दळ अजपा विवरण षटचक्र देहस्थानमान दशदेह कथन अष्टदळविवरण अभ्यास योगो अविद्या माया लक्षण देहाभिमान योगी देहहंतानिरसनयोगो आत्माप्रतिपादन सर्वोपाधिडंबरनिरसन जीवनिर्धारनाम जीवप्रलय मध्यखंड - देहहंतानिरसनयोगो सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी देहहंतानिरसनयोगो Translation - भाषांतर विध्य यदि देहादि वस्तु सत्ता तदस्निते । अभाव देह भावस्य स्वरुपं सकळात्मकं ॥१॥असो हें हासत हासतां । जाला श्रीगुरु बोलता । ह्मणें तु भला रे आतां । कळसासी मज ॥१॥आह्मि मागां कथन करुं । तेथीचें जड तेथं चि सारु । तुज निर्धारीसे सभरुं । ठाइं ठाइं ॥२॥एवं तुज केलें पूर्ण । हर्षलें माझें मन । प्रतीति पाहावया उचलोन । घातलासी देही ॥३॥तो फांकली तुझी मति । हे चि मानिली निश्चींति । आतां तुज पुडतो पुडती । काय सांगणें ॥४॥पंधरें सांडोनि केवळ । पदरी बांधे पीतळ । कीं अमृत सांडोनि अंचुळ । तक्रा कोडवी ॥५॥सांडोनि मधुच्या घागरी । पडे गंधेलाचे भरी । कीं प्रकाश सांडोनि आंधारी । कवळी प्राणी ॥६॥सांडुनि धेनूचे दूहन । दूही अजागलस्तन । तैसें पूर्ण टाकोन मिंपण । साधलें तुज ॥७॥गोडी नेणतां चुके । हे येकें परी निकें । पूर्ण जालया देहां बिके । भरलासी वायां ॥८॥हो कां माझें जीविचा जीउ । काय तुझें जीवीं ठेउ । कीं हे माझें देह अव्हेरुनि देउं । सामर्थ्य तुज ॥९॥एणें जाणपणें सर्व । तुवां मोडिली माझी हांव । तंव येरु ह्मणें आह्मां मानू नये वाव । वचन तुमचें ॥१०॥तर्हि जी मिं भला । देह ज्ञानीं संचरला । वरि मिं च ब्रह्म इतुला । विश्वासु होय ॥११॥मिं ब्रह्म ये निष्टे । वचने प्रतिष्टिली वसिष्टॆं । कपिली मुनीश्वरें सुष्ठें । हें चि नेमिलें ॥१२॥ईश्वरादिक आदिकरुन उत्तम । ह्मणती सर्व मि चि ब्रह्म । अहं ब्रह्माहमस्मिन् नेम । श्रृति असे ॥१३॥तत्व मस्यादि वचनें । आपण चि ब्रह्म होणे । सोहं बीज प्रमाणे । ये चि विषयीं ॥१४॥वरि तुमचा वाक्य विश्वासु । मज हा चि प्रकाशु । तरि जी मि नव्हे उदासु । एणें बोले ॥१५॥जे जे वडील बोलती । ते ते इतर मानिति । वडीलाचे धर्म चालवीति । सर्वप्रजा ॥१६॥वडिलाचें कर्म गुण । इतरा तें चि आचरण । बोलणें चालणें वर्तमान । तें चि सर्व ॥१७॥यास्तव तुमचेंनि बोले । हें मज सत्य मानलें । तुह्मी निरसीतां निरसलें । आतां चि हे जी ॥१८॥या वरी बोले प्रभु । जो देह ज्ञानासी दुल्लभु । तो परमार्थ सुलभु । करुं तुज ॥१९॥आतां हें चि कथन कादूं । देह वादाची मुरकुंडी पाडूं । येथीचा अभिमान तोडूं । विचारखडें ॥२०॥या देहाचें आधारें । देवो वस्तु साचोकारे । परी तुज या भीतरें । बुडो नेदों ॥२१॥दीप तेजा पासुन । हाता ये निधान । तें साधलया प्रयोजन । काय दीपें ॥२२॥टाकावया पैलपारु । तो चि पोटालीजे तारु । तैसा देहाचा आधारु । ज्ञानसाधना ॥२३॥तरि हें पाहता आहे असे । द्राविक मात्र पात्रीं जैसें । निश्चळ जलयां दीसे । सर्व तेथें ॥२४॥ते पाहाता निर्धारें । कांहि नाहिं साचोकारें । तेवी या देहा भीतरें । दिसे ते वावो ॥२५॥पाहे पां नलिनी बिंदुभेदें । तो घेईजे अशुध्दे । या उभयापासुनी साधे । शरीर हें गा ॥२६॥हें रक्तमासांचें भंडार । मळसूत्राचें थीलर । अस्ति मेदा कोठार । चर्मवेष्टित ॥२७॥आर्त्ते मिष्टान्न भक्षिजत । तें ये देहीं काय होत । नव्हा हि व्दारि झरत । ते कोण शुध्द ॥२८॥या देहाचे संभूती । मातें दोषु नेमिति । तयाचि जालया उत्पत्ति । सूतक शब्द ॥२९॥जैं आत्मा सांडी या अपवित्रा । तैं विटाळु सर्व गात्रां । पाठिं नातळति पुत्रा । कोण्हि यासी ॥३०॥असें सर्व देहमात्र । पाहे पवित्र किं अपवित्र । तुं सर्वज्ञुं सर्वत्र । जाण यातें ॥३१॥रायें प्रतिष्ठिलीं सुंदरी । तीस भला हि नमस्कारु करीं । कुळ ज्ञाती कुसरी । नाणिजे तेथें ॥३२॥तेवी आत्म देवाचे आधारें । हें पवित्र आहे बा रे । जैसें प्रतिबिंबे साजिरें । आरसेंपणें ॥३३॥याचें चाळक तें सत्य । येर हें सर्वथा अनित्य । तो जाणिजे तैं नित्य । स्वरुपी हे चि ॥६४॥देह ज्ञान समस्त । शिष्या नमनाचे स्वस्थ । प्रतिबिंब तें व्यस्त । सर्व दीसे ॥६५॥असें समर्थि जाणून । केलें देहज्ञानासी मार्जन । गंगोळी घातली पूर्ण । परब्रह्माची ॥३६॥वेदांति सीध्दांति कोडें । पुसोनि देह ज्ञानाचे धडे । निश्चयें उजळिलें पुढे । ब्रह्मज्ञान ॥३७॥माहा रामायणिं वासिष्ठिं । कुंभा शिखिध्वजासी गोष्ठी । करी पडली दृष्टी । देहावरी ॥३८॥देह ज्ञानें बहूतें । निरसीलिं आत्रयें अवधूर्ते । तो चालिला पूर्णपंथें । हें तों कळलें ॥३९॥एकादश स्कंधी अनंतें । काय थापिलें निरुतें । देहा निर्धार भगवद्रीते । कोण तो जाला ॥४०॥देह ज्ञानाचा हरळु । निरसूनि काढिला वगेळु । पाठीं केला निर्मळु कार्त्तिक शिवें ॥४१॥देह वादु साच होता । तरि वेदु येथ थिरावता । नेति नेति कां ह्मणता । वस्तुविषईं ॥४२॥समस्ता हि उपनिषदिं । काढिलि देहांतुन बुध्दी । भृषंडीने वसिष्ट संवादि । वारिले कयासीं ॥४३॥जेथ आत्मबोध संचरण । तेथ पायरवे देह ज्ञान । तरि कां नोहे सांडन । नाना मताची ॥४४॥यास्तव समस्त । वाचांळ देहीचें मत । येथ कांहिं दृष्टांत । सांगों आतां ॥४५॥नर उष्ट्र गज वारु । बुध्दिबलाचा परीवारु । चले जुझे मरे मारु । साच तें काय ॥४६॥चाले धावे नाचे खेळे । छायामंडपी सूत्र चले । या परीवाराचे बळें । जुझो नये ॥४७॥खांबसूत्रीचि बाउलीं । हावभावा प्रवर्त्तलीं । तें संवादा नाथीलीं । आणू न येति ॥४८॥गड दुर्ग डोंगर । अभ्रिं दीसे अपार । याचें बळें वैराकार । नृपतिसीं न कीजे ॥४९॥डोहो लहरीया तरंग । मृगजळी दीसती अनेग । याचें आधारें चांग । न पीकती मळें ॥५०॥चंद्रिचें त्रिमिर भाळे । जर्हिं दीसती आलें । परी हातें झोंबतां फळलें । कोणासी काये ॥५१॥नागवल्लीचि कणिसें । जर्हिं मळिलिं सायासें । तर्हिं तेथ न दिसे । बीज मात्र ॥५२॥भरे कोथंबीरीचे टवके । क्षीर देती कां तितुके । तरी दुहितें कौतुकें । कासवी कोण्हीं ॥५३॥या परी देह ज्ञान । होतें प्रबुधा प्रमाण । जैं आतुडतें स्वप्र । जागरावस्ते ॥५४॥तरी गा जळीचि मासोळी । क्रीडा न करी वेगळी । तेवी देहीचा देही बळी । देह ज्ञानी ॥५५॥कां पाखांणांतुल पूतलें । वेगळें न जीये बापुडे । तैसें देहवादी देहा पुढें । उपेगा न ये ॥५६॥जेवी चक्षांतुल पूतलें । करुं नये चक्षां वेगळें । तेवी देहांतु चि सकळें । देह ज्ञानें ॥५७॥जें देहि देह आटोपे । त्यासी पूर्ण केवी आटोपे । जेवी ब्राह्मांडा हातदीपें । उजेडु नव्हे ॥५८॥देहिचें देहज्ञान । तें देहि च प्रमाण झ । परवस्तु पावन । कैचें तेथ ॥५९॥सागरीं तरंग पातें । पडतां पर्वतु धरीते । तैं देह ज्ञाने तरीजते । भवार्णवी ये ॥६०॥जैसें लवणाचें वळन । न करी जान्हवी जळा बंधन । तैसें देहज्ञानें पूर्ण । नातुडे ब्रह्म ॥६१॥आत्मा आतुडे देहज्ञानी । होय संसार भांजणी । तैं दवणें सहस्रमणी । ग्राशीला चि तो ॥६२॥दहन कीजे रीपु पुरी । आंग टाकीजे वरी । तेवी संहार संहारी । देह ज्ञानें ॥६३॥देह वादी ज्याची बुध्दी । त्यासी कैची आत्मशुध्दी । जैसा सूर्यो रात्री मधिं । नातुडे कोण्हा ॥६४॥ना तरी अर्ध्द रात्रीचे वेळां । कोण्ही शुक्र देखते डोळां । तै परब्रह्म सोहळां । भोगी तो देहीं ॥६५॥भानुतारा पूर्णीमेसी । येउनि गीवसीति शशी । तैं देह बुध्दी ब्रह्मेंसी । समरस होति ॥६६॥देह ज्ञानांचा पेटारी । जैं तरीजे भवसागरी । तैं साची अंबरीं । दळला पंथु ॥६७॥असें नाहिं देह वादक । देह थापीति सकळैक । ह्मणती संसारछेदक । आन नाहि ॥६८॥तरि देह चि संसार निर्धारें । याचें चि ज्ञानें हें चि तरे । तैं घोरफडेचे आधारें । साच जालें ॥६९॥मुखीं विषयाचा ठेवा । ठेउनि अमरेंसी हेवा । तेवी देहज्ञान भवा । नाशक होय ॥७०॥एणें ज्ञानें भवनाशे । अविनाश वस्तु प्रकाशे तै करतळ चि आरिसे । निर्मळ जाले ॥७१॥हे हीन विवेकी क्षिती । असी स्थळें प्रतिपादिती । ते दीवा घेउनि पाहों जाती । चंद्र बींबें ॥७२॥देहीं । देवो आकळे । फुंजती येणें बाळें । तैं डोळां अंत्राळें । गीवसुनी घेतली ॥७३॥देही होउनि बळी । मांडीति पूर्णेसी फळीं । चंद्र जीणावया काउळी । तया परीं ॥७४॥थिलरी सांपडे इंदु । द्रोणी तै संटवे सींधु । तैस आत्मा सच्चिदानंदु । नातुडे जडी ॥७५॥भुजंगी सांडिलीया कांती । त्यासी चळन ना आकृती । तेवी या शरीराची जाती । आत्मेंविण ॥७६॥हें क्षणभंगुर शरीर । केवळ जळीचें घर । आगी जींकिले मंदिर । तया परि ॥७७॥सर्पामुखीचा दुर्दुरु । जैसा वेटाळी आहारु । तैसा हा देहविचारु । साच होय ॥७८॥मिथ्या तें साच करुनि । फुंजताति वपुज्ञानी । जैसें आंगोठे घालूनि वदनि । सुखावे बाळ ॥७९॥वत्साचे चर्म काढीजे । भूस भरुनि उभेकीजे । नेणें चि मोहे माजे । वोरसे धेनु ॥८०॥तैसें माजले अविचारें । घेति हे चि साचोकारें । परी न साधीति याचे आधारें । परवस्तु ते गा ॥८१॥जो हें आहे अवयवें । तो पर वस्तुतें पाहावें । याचे लाहे धावावें । आपुलेया हिता ॥८२॥अस्तु नव्हता शरीर । तों ठाकावे ब्रह्मपुर । नाहीं तरी पुढां बाहार । बहुत आहे ॥८३॥जैसें थीलरीचें पाणि । तलिशोषि मेदिनी । वरि तपे तरणी । ग्रीष्मऋतु ॥८४॥हे नेणती जळचरें । केळी करीति हर्षे थोरें । आदळू न पडे तो ओघव्दारे । न ठकती चि सिंधु ॥८५॥तैसें काळें संसारें बापुडें । देह वोढिजे देव्हडे । चुकउनि दोहिची तोंडें । वस्तु घ्यावी ॥८६॥देहसाधनी सादरु । राखोनि होंउ पाहे अमरु । अंती देंह ना साक्षात्कारु । परब्रह्मी ॥८७॥देह दुग्धपतुची घडी । दीसे सर्वही मोडी । परी पांघुरीजे येव्हडी । दशा कैंची ॥८८॥पाणि हेळावे भरे । माजी चंद्रबिंब विखुरे । ते मानुनी साचोकारें । वेचु नये ॥८९॥तेवी देह साधनी । रेखीजे ब्रह्मतरणी । तेथूनि निगतां क्षणी । स्वप्र स्वादु ॥९०॥सृष्टी बोलें मृगजळें । तै कोण चिंती घनपटळें । तैसे देही सकळे । तै विशेषु काय ॥९१॥यास्तव ज्ञानमूर्ति । तो कां अपूरें धरील हातिं । जो स्वामि सर्वार्थीं पति । तो तो मोळी वाहेना ॥९२॥जो सेवील चिंतामणीं । तो कां भोगील दैनी । तेवि ब्रह्मीष्ट देहाचा अभीमानी । संचरेना ॥९३॥तुं देहाचा अभिमानु सांडी । घे आत्मतत्वाची गोडी । या बोलातें न संडी । कोण्हें काळीं ॥९४॥हृदय मांदुस करुन यत्नें । सांटवीं ये शब्दरत्नें । तुज आणिकें प्रयत्नें । चाड नाहि ॥९५॥असो या पुढील कथन । ते सत्याचें प्रतिपादन । यरां मतांचें करु निरसन । त्रिंबकु ह्मणे ॥९६॥इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे मध्यखंडे देहहंतानिरसनयोगो नाम एकादश कथन मिति ॥१॥ N/A References : N/A Last Updated : March 09, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP