मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर अस्यैव भार्या भवितुं रुक्मिण्यर्हति नापरा । असावप्यनवद्यात्मा भैष्म्याः समुचितः पतिः ॥३६॥कृश्ण नोवरा भीमकीलागीं । भीमकी होय कृष्णाजोगी । सृष्टी शोभत इहीं दोघीं । न देखों जगीं तीसरें ॥१५०॥किंचित्सुचरितं यन्नस्तेन तुष्टस्त्रिलोककृत् ।अनुगृह्णातु गृह्णातु वैदर्भ्याः पाणिमच्युतः ॥आमुचें जन्मोजन्मींचें सुकृत । शुद्ध पुण्य जें शोभिवंत । तेणें तर्ही कृष्णनाथ । भीमकीकान्त हो लग्नीं ॥५१॥कांहीं आचरलों असों सुकृता । तेणें तुष्टोनि त्रैलोक्यकर्ता । रुक्मिणीतें श्रीकृष्ण भर्ता । करो तत्वता करग्रहणीं ॥५२॥एवं प्रेमकलाबद्धा वदंति स्म पुरौकसः ॥३७॥ऐसे आशीर्वाद देती । कृष्णरूपें वेधिल्या वृत्ति । प्रत्यगावृत्ति हरि पाहती । नाहीं उपरति जनासी ॥५३॥कृष्णें केला मेळिकार । भीमकें आदर केला थोर । सकळ सैन्या पहुणेर । यथोचित यादवां ॥५४॥भीमकें देखिलें श्रीकृष्णासी । दृष्टि जडली त्या रूपासी । साखरेवरूनि नुठे मासी । तेंवि रायासि पैं झालें ॥१५५॥एवं राज्ञां समेतानां यथावीर्यं यथावयः ।यथाबलं यथावित्तं सर्वैः कामैः समर्हयत् ॥३८॥एवं भीमकें पूजिलें श्रीकृष्णासी । विकल्प वाटेल चैद्यासी । यालागिं सकळिक रायांसी । पूजाविधीसी मांडिलें ॥५६॥यथाकुळ यथाशीळ । जैसें वीर्य जैसें बळ । तदनुसार राजे सकळ । भीमके केवळ पूजिले ॥५७॥कृष्ण आणि हलायुध । आले हें ऐकोनि चैद्यमागध । दचकोनि म्हणती विरोध । थोर आम्हांसि मांडला ॥५८॥कृष्ण आला तो महाबळी । ऐकोनि चिंतेची काजळी । वाढिन्नली हृदयकमळीं । तोंडें काळीं तेणें झालीं ॥५९॥मागध परस्परें आपणांत । कुचकुच करूं लागले बहुत । एकमेकांतें खुणावित । समस्तें त्यांतें मीनली ॥१६०॥भीमकें पूजिलें कृष्णासी । केलें मधुपर्कविधानासी । तोही मिनला आहे त्यांसी । अहाच आम्हांसि योयरिक ॥६१॥लग्न लागलियापाठीं । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करूं दाटोदाटी । आम्ही जगजेठी आसतां ॥६२॥रुक्मिया आहे आम्हांकडे । भीमक सात्त्विक बापुडें । म्हातारपणीं झालें वेडें । त्याचें त्यापुढें काय चाले ॥६३॥वेगीं विस्तारा जी फळ सम्मुख झाले जी पैं सकळ । तुरें लागलीं प्रबळ । घावो निशाणीं घातला ॥६४॥शुद्धमति म्हणे रायासी । तुम्ही विसरलेति कुळधर्मासी । कन्या न्यावी अंबिकेसी । गौरीहरांसि पूजावया ॥१६५॥ऐकूनि रायाचा ज्येष्ठ कुमर । कोपा चढिन्नला थोर । मिथ्या बायिकांचा विचार । केंवि साचारं मानितां ॥६६॥संमति - आत्मबुर्द्धिहितार्थाय गुरुबुद्धिर्विशेषतः ।परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धिः प्रलयंगता ॥आपुली बुद्धि ते हितासी । गुरुबुद्धि त्याहूनि विशेषी । परबुद्धि ते विनाशासी । मुख्य प्रळयासि स्त्रीबुद्धि ॥६७॥अंबालयीं यादववीर । उतरलेति अकर्मकर । हिरोनि नेतील सुंदर । लाज थोर होईल ॥६८॥राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासि माझिया पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अतिकरंटा नपुंसक ॥६९॥आजि कळली तुझी बुद्धि । वांठिव नुसधी हाडिया सांदी । हागीर भ्याड तूं त्रिशुद्धि । गाडा युद्धीं नव्हेसी ॥१७०॥वर्मीं खोंचला रुक्मिया । कन्या नेईन अंबालया । ख्याति लावीन यादवां तयां । मज कोपलिया कोण साहे ॥७१॥ऐसें होतें माझे पोटीं । लग्न लागलियापाठीं । दोघे वधूवरें गोमटीं । न्यावीं भेटी जगदंबे ॥७२॥ऐसा नव्हे कुलक्रम । लग्नापूर्वील हा कुळधर्म । सिद्धि पाववीन सुगम । पराक्रम पहा माझा ॥७३॥ऐसें सांगोनि रायासी । वेगें आला चैद्यापासीं । गुज सांगतसे तयासी । विघ्न लग्नासि वोडवलें ॥७४॥कृष्णाकडे आमुचा पिता । जिवें भावें तिकडेचि माता । कार्यकारणप्रपंचता । मिथ्या दाविती आम्हांकडे ॥१७५॥ऐका आमुचिया कुळधर्मासी । नोवरी न्यावी अंबिकेसी । तेथें सन्नद्ध दळेंबळेंसीं । आलें तुम्हांसि पाहिजे ॥७६॥कन्य चांतःपुरात्प्रागाद्भटैर्गुप्तांबिकालयम् ।पद्भ्यां विनिर्ययौ द्रष्टुं भवान्याः पादपल्लवम् ॥सा चानुध्यायती सम्यड्मुकुंदचरणांबुजम् ॥३९॥यतवाड्मातभिः सार्धं सखीभिः परिवारितां । गुप्ता राजभटैः शूरैः सन्नद्धैरुद्यतायुधैः ।मृदंगशंखपणवास्तूर्यभेर्यश्च जघ्निरे ॥४०॥येरीकडे चौघे बंधु । घेऊनि निघाले जी वधू । करूनि दळभार सन्नद्ध । महावीर उद्यत ॥७७॥भीतरीं परवडी आढाउवांची । शस्त्रें उघडीं होतीं त्यांचीं । मागें परिधि धनुर्धरांची । शितें धनुष्याचीं वाहिलीं ॥७८॥तयांमागें वीरघोडीं । रथ जोडियेले जोडी । वीर बैसविले परवडी । शस्त्रें उघडीं झळकती ॥७९॥तयांमागें कुंजरथाट । गळां सांखळ्या एकदाट । खिळिले चालती गजघंट । दुर्ग अचाट सैन्यचे ॥१८०॥भक्तजनाचिया काजा । जेंवि करिती आवरणपूजा । तैसें सैन्य रचिलें बोजा । कृष्णभाजा भीमकीया ॥८१॥नातरी उपासनायंत्र । तैसें दिसें सैन्यसूत्र । भीमकीमध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्र निजवीजा ॥८२॥जैसी साधनचतुष्टयसंपत्ति । परमात्मा सम्मुख करी वृत्ति । तैसे चौघे बंधु घेऊनि येती । कृष्णसम्मुख रुक्मिणी ॥८३॥नातरी जैसे चारी वेद । उपनिषदें करिती बोध । वृत्ति स्वयें देखे निजपद । तैसे बंधु भीमकीसी ॥८४॥कीं चार्ही पुरुषार्थ जैसे । भक्तांपासी येती आपैसे । चारी बंधु जाण तैसे । भीमकीसरिसे चालती ॥१८५॥वैराग्यविवेकाचेनि बळी । तैसा रुक्मरथ रुक्ममाळी । मागें पुढें जी सांभाळी । पारकें जवळी येऊं नेदी ॥८६॥स्वानंद आणि अनभउ । जिवाहूनि मागें पुढें बहु । तैसा रुक्मकेश रुक्मबाहु । दोघे भाउ दोही भागीं ॥८७॥ऐसे भीमकीच्या चहूभागीं । चौघे ब्म्धु रंगले रंगीं । भीमकीसवें चालती वेगीं । धन्य जगीं रुक्मिणी ॥८८॥वडील बंधु चौघांहूनी । जो अतिगर्वित अभिमानी । तो सांडिला पैं त्यजूनी । साधुजनीं जेंवि निंदा ॥८९॥कृष्णद्वेषिया तो खरा । मिळणी मिळाला जो असुरा । म्हणोनि त्यजिला परबाहिरा । नव्हे सोइरा निजाचा ॥१९०॥भोग त्यजूनि वैरागी । योगसाधना निघे योगी । तैसी मायामाहेर सांडूनि वेगीं । चरणचाली निघाली ॥९१॥लोकप्रतिष्ठा महंतीं । बैसावें अश्वीं गजरथीं । जेणें होय कृष्णप्राप्ति । ते प्राप्तीची गति भीमकी जाणे ॥९२॥पारिखा पायीं कृष्ण ठाके । हें बोलणें समूळ लटिकें । ऐसें जाणोनि निष्टंकें । चरणीं चामके वैदर्भी ॥९३॥कृष्णचरणीं जडलें मन । यालागीं वाचा पडिलें मौन । दृढ लागलें अनुसंधान । सहजस्थिती चालिली ॥९४॥आत्मसाक्षात्कारीं वृत्ति । अनिवार अहिंसादिक येती । तेंवि भीमकीसवें समस्तीं । सख्या चालती स्वानंदें ॥१९५॥जो कां निरपेक्ष मानसीं । सिद्धि तिष्ठती त्यापासीं । तैशा सखिया भीमकीसेवेसी । उपचारेंसीं चालती ॥९६॥वडिलांमाजि वडीलपणीं । निजशान्तीच्या सुवासिनी । वागविती रुक्मिणी । ज्या अग्रगणी सकळिका ॥९७॥बोधपुत्राच्या जननी । ब्रह्मविद्येच्या ब्राह्मणी । अकामकामाच्या कामिनी । स्वयें सुवासिनी चालती ॥९८॥जैसा अनाहताचा गजर । तैसीं तुरें जीं अपार । नादें कोंदलें अंबर । शब्दाकार नभ झालें ॥९९॥पैले उठले घंटानाद । मागें किंकिणींचे शब्द । मधुरशंखांचे अनुवाद । वीणा वेणू रुणझुणती ॥२००॥नाद ऊठिले झल्लरी । मृदंगध्वनि त्यामाझारी । निशाण दुंदुभि लागल्या भेरी । नादाभीतरीं मन निवे ॥१॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP