मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर सुस्नातां सुदतीं कन्यां कृतकौतुकमंगलाम् ।अहतांश्कयुग्मेन भूषितां भूषणोत्तमैः ॥११॥विवाहसूत्रकृत सोहाळा । मंगळस्नाता भीमकबाळा । दिव्याभरणा युग्म द्कूला । मंडित वेह्लाळा शुभदर्शनीं ॥३०॥पीताम्बरपरिधान । लेयिली अळंकारभूषण । नोवरीचें दुश्चित मन । कृष्णागमन पाहतसे ॥३१॥नान्दीश्राद्ध देवकविधान । केलें ब्राह्मणांचें पूजन । यथाविधि ब्राह्मनसंतर्पण । स्वस्तिवाचन विधीचें ॥३२॥चक्रुः सामर्ग्यजुर्मंत्रैर्वध्वा रक्षां द्विजोत्तमः । पुरोहितोऽथर्वविद्वै जुहाव ग्रहशांतये ॥१२॥ऐसिये वैदर्भीतें जाण । सामऋग्यजुःसूक्तपठन । द्विजवर करिती वधूकल्याण । आशीर्वचना देऊनी ॥३३॥चहूं वेदींचें बाह्मण । येऊनि पुरोहित आपण । अथर्ववेदें केलें हवन । ग्रहशान्त्यर्थ यथोचित ॥३४॥हिरण्यरूप्यवासांसि तिलांश्च गुडमिश्रितान् ।प्रादाद्धेनूश्च विप्रेभ्यो राजा विधिविदा वरः ॥१३॥सोनें रूपें नानावस्त्रें । घृतसहित तिलपात्रें । गोभूदानें पैं विचित्रें । द्विजां नृपवरें दीधलें ॥३५॥एवं चेदिपती राजा दमघोषः सुताय वै । कारयामास मंत्रज्ञैः सर्वमभ्युदयोचितम् ॥१४॥दमघोष याचिपरी । महोत्सव आपुल्या नगरीं । पुत्रविवाहाचा करी । श्रेष्ठीं द्विजवरीं यथोचित ॥३६॥मदच्युय्द्भिर्गजानीकैः स्यंदनैर्हेममालिभिः ।पत्त्यश्वसंकुलैः सैन्यैः परितः कुण्डिनं ययौ ॥१५॥वर्हाड निघालें बाहेरी । मदगज परिवारिले भारी । सुवर्णरथांचिया हारी । वीर असिवारीं आरूढ ॥३७॥चालती पायांचे मोगर । पातले कौण्डिन्यपुर नगर । आणीक वर्हाडि महावीर । चैद्यभार तेही आले ॥३८॥शाल्व आणि जरासंध । दंतवक्त्र विदूरथ । पौण्ड्रक वीर अद्भुत । सैन्यभारेंसीं पैं आले ॥३९॥भीमकी कृष्णासि होती दिधली । ते शिशुपाळा देऊं केली । ते संधि पाहिजे साधिली । म्हणोनि आले पक्षपाती ॥४०॥वर्हाड मिनलें तें कैसें । महामोहाचें मेहुडें जैसें । खद्योतसमुदाय निशीं वसे । वीर तैसे वाढिवां ॥४१॥कृष्णतरणीच्या किरणीं । मावलतील रणाङ्गणीं । भीमकी उह्लासेल कमलिनी । कृष्णदिनमणि देखोनी ॥४२॥जैसे गंधर्वनगरींचे हुडे । तैसे शिशुपाळाचे वीर गाढे । वर्हाड आलें वाडेंकोडें । भीमकापुढें सांगितलें ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP