मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक २७ ते ३० अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक २७ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २७ ते ३० Translation - भाषांतर न्यमीलयत कालज्ञा नेत्रे बाष्पकुलाकुले । एवं वध्वाः प्रतीक्षंत्या गोविंदागमनं नृप ॥२७॥नेत्रीं अश्रूंचिया धारा । दुःखें कांपतसे थरथरा । धरितां न धरवे धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥९९॥अद्यापि कृष्णागमनकाळा । नाहीं अतिक्रमली वेळा । ऐसें मानूनि लावी डोळां । बाष्पाम्बुकलासंयुक्त ॥१००॥ऐसी प्रतीक्षा नोवरी । करीत असतां चिंतातुरी । तंव कृष्णागमनसूचकें पुरीं । चिह्नें शरीरीं उमटलीं ॥१॥वाम ऊरुर्भुजो नेत्रमस्फुरन्प्रियभाषिणः । अथ कृष्णविनिर्दिष्टः स एव द्विजसत्तमः ॥२८॥तंव लविन्नला डावा डोळा । बाहु स्फुरती वेळोवेळा । हें तंव चिह्नें गे गोपाळा । प्राप्तिकरें पैं होती ॥२॥भो भो राजा कुरुनरपाळा । ऐसी सचिंत भीमकबाळा । तियेचि अवसरीं गोपाळा । हृदयकमळामाजि गमे ॥३॥मग कृष्णें सांगितलें द्विजासे । वेगीं जावें भीमकीवासीं । थोर अवस्था होतसे तिसी । उद्वेगेंसीं अपार ॥४॥तिसी द्यावें आश्वासन । उदैक आहे तुझें लग्न । तुवा असावें सावधान । पाणिग्रहण मी करीन ॥१०५॥अंतःपुरचरीं देवीं राजपुत्रीं ददर्श ह । सा तं प्रहृष्टवदनमव्यग्रात्मगतिं सती ॥२९॥आठां भावांची परवडी । उभवूनि स्वानंदाची गुढी । द्विज धांविन्नला लवडसवडी । घातली उडी तत्काळ ॥६॥अंतःपुरामाजि रुक्मिणी । कृष्णवेधें सचिंत मनीं । ब्राह्मण तयेतें देखोनी । भुज उभवूनियां आश्वासी ॥७॥भीमकी करितां चिंता । त्म्व द्विज देखिला अवधिता । हरिखें वोसंडली चिता । प्रसन्नता देखोनी ॥८॥आलक्ष्य लक्षणाभिज्ञा समपृच्छच्छुचिस्मिता ।तस्या आवेदयत्प्राप्तं शशंस यदुनंदनम् ।उक्तं च सत्यवचनमात्मोपनयनं प्रति ॥३०॥पहिला बाह्मण हा अतिदीन । याचें पालटलें दिसेअ दिह्न । दिसताहे प्रसन्नवदन । कृष्णागमनेंसीं पैं आला ॥९॥कृष्णदर्शनाचे प्राप्ती । द्विजाची पालटली देहस्थिति । आनंदमय झालो वृत्थि लिहितासाठीं द्विजाची ॥११०॥जीवप्रायाणाची सुमुहूर्तता । कीं भक्तिनवरत्नांचें तारूं बुडतां । कीं धैर्याचा स्तंभ खेचतां । झाला रक्षिता सुदेव ॥११॥कीं मरतया अमृतपान । कीं अवर्षणीं वर्षे घन । दुकळलिया जेंवि मिष्टान्न । तेंवि आगमन द्विजाचें ॥१२॥मोहअंधारीं मणि पडिला । तो युक्तीच्या हातीं चांचपडिला । न सांपडतां दीप लाविला । कृष्णगमनसुखचा ॥१३॥यापरी आला तो ब्राह्मण । कृष्णगमनें भीमकीप्राण । घेऊनि आला संपूर्ण । जीवदानी सुदेव ॥१४॥ब्राह्मण म्हणे नाभी आतां । घेऊनि आलों वो अनंता । देखिला गरुडटका झळकता । आनंद चित्ता न समाये ॥११५॥आंगींची उतटली कांचोळी । मुद्रिका दाटल्या आंगोळी । सर्वांगी हरिखेली वेह्लाळी । जीवें वोवाळी द्विजातें ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP