मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - वैदर्भ्याः स तु संदेशं निशम्य यदुनंदनः । प्रगृह्य पाणिना पाणिं प्रहसन्निदमब्रवीत् ॥१॥वैदर्भेचा संदेशार्थ । समग्र परिसोनि कृष्णनाथ । द्विजहस्तासि देऊन हस्त । बोले सस्मित तें ऐका ॥८॥श्रीभगवानुवाच - तथाऽहमपि तच्चित्तो निद्रां च न लभे निशि ।वेदाहं रुक्मिणा द्वेषान्ममोद्वाहो निवारितः ॥२॥मदर्थ भीमकी अनन्य शरण । विह्वळ तैसाचि मी सकरुण । पत्रिकाश्रवणमात्रें मन । भीमकीहरण करूं गेलें ॥९॥माझिया विवाहा विघ्नकर । रुक्मि मद्द्वेष्टा पामर । तेणें रुक्मिणी चिंतातुर । पत्रिकेपूर्वींच मी जाणें ॥१०॥सन्नद्ध करितां दळभार । तेथें लागेल पैं उशीर । मी एकला एकाङ्गवीर । भीमकी घेऊनि येईन ॥११॥जो दुजयाची वाट पाहे । त्याचें कार्य कहींच नोहे । यश कैसेनि तो लाहे । साह्य पाहे सांगाती ॥१२॥विकल्प रुक्मिया मम द्वेषी । तेणें निवारिलें विवाहासी । विटंबूनि त्याचिया मुखासी । रुक्मिणीसी आणीन ॥१३॥तामानयिष्य उन्मथ्य राजन्यापसदान्मृथे ।मत्परामनवद्यांगीमेधसोऽग्निशिखामिव ॥३॥चैद्यादिक पक्षपाती । त्यांसि रणीं लावीन ख्याति । मी कोपलिया श्रीपति । त्रिजगतीं कोण साहे ॥१४॥दोन्ही काष्ठांच्या अरणी । मथूनि काढिजे जेंवि अग्नि । तेंवि अरिवीरांतें विभांडूनि । पवित्र रुक्मिणी पर्णीन ॥१५॥माझ्या कोपाची भृकुटी । रणा आणीन सकळ सृष्टि । त्या मज युद्धाची अटाटी । लग्नासाठीं केवढी ॥१६॥श्रीशुक उवाच - उद्वाहर्क्षं च विज्ञाय रुक्मिण्या मधुसूदनः । रथः संयुज्यतामाशु दारुकेत्याह सारथिम् ॥४॥रुक्मिणीच्या लग्नासी । कवण दिवस कवणे मासीं । कवण नक्षत्र तें द्विजांसीं । मधुसूदनें पूसिलें ॥१७॥सारथि बोलावूनि दारुकासी । वेगीं संजोगूनि रथासी । जाणें आहे कौण्डिन्यपुरासी । मात दुजयासि कळों नेदीं ॥१८॥स चाश्वैः शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकैः । युक्तं रथमुपानीय तस्थौ प्रांजलिरग्रतः ॥५॥जैसे कां चार्ही पुरुषार्थ । तैशा वारुवीं जुंपिला रथ । ऐका नांवें सुनिश्चित । जेथ श्रीकृष्णनाथ आरूढे ॥१९॥शैव्य सुग्रीव बलाहकं । चौथा मेघपुष्प देख । चार्ही वारु अतिनेटक । सारथि दारुक धुरेसि ॥२०॥अनर्घ्यरत्नीं रत्नखचित । गरुडध्वज लखलखित । लोल पताकीं डोलत । रथ शोभत अतिशोभा ॥२१॥शस्त्रास्त्रांचे संभार । रथीं घातले अपार । दारुकें केला नमस्कार । कर जोडूनि राहिला ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP