मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५३ वा| श्लोक २१ ते २६ अध्याय ५३ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २६ श्लोक २७ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ अध्याय ५३ वा - श्लोक २१ ते २६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २६ Translation - भाषांतर बलेन महता सार्धं भ्रातृस्नेहपरिप्लुतः । त्वरितः कुंडिनं प्रागाद्गजाश्वरथपत्तिभिः ॥२१॥रथकुंजरादि पालाणा । सन्नद्ध करा चतुरंग सेना । घाव घातला निशाणा । केली गर्जना बलभद्रें ॥६०॥सेनापति तो सात्यक । भारीं बलराम नेटक । यादववीरांसि हरिख । अतिसुटंक दळभार ॥६१॥सुख संतोष आणि स्वानंद । कैवल्यापासीं निजबोध । तैसा पावला हलायुध । यादववीर हरिपासीं ॥६२॥ना तरी शमदमादि संपत्ति । बोधावेगळी नव्हे निश्चिती । तैसे कौण्डिन्यपुरा येती । जेथ श्रीपति उभा असे ॥६३॥तंव येरीकडे राजकुमरी । अवस्था लागलीसे भारी । कां पां न येचि श्रीहरि । विचार करी लिखिताचा ॥६४॥भीष्मकन्या वरारोहा कांक्षंत्यागमनं हरेः । प्रत्यापत्तिमपश्यंती द्विजस्याचिंतयत्तदा ॥२२॥वरारोहा भीष्मककुमरी । कृष्णागमनाची अवसरी । विप्र न परते अद्यापिवरी । म्हणोनि अंतरीं सचिंत ॥६५॥कृष्णासि नाहीं विषयगोडी । म्यां पत्रिका लिहिली कुडी । भार्या होईन आवडी । झाली अनावडी तेणें कृष्णा ॥६६॥अढालढालाची पैं थोर । अभावभावें अतिसुंदर । दाटूनि रिघों पाहे घर । वशीकरण मज करील ॥६७॥मग मी होईन ती अधीन । जिवें जिता करील दीन । अमना आणूनियां मन । नाचवील निजच्छंदें ॥६८॥कार्यकारण समस्त । तेचि करील निश्चित । सुचित आणि दुश्चित । आंदण्या दासी आणील ॥६९॥तिचा विकल्पिया बंधु । आंदण देईल कामक्रोधु । तिचा बोळावा गर्वमदु । घरभरी दाटेल ॥७०॥माझेनि आंगें थोरावेल । मज ते नामरूप करील । विषयगोडी वाढवील । मुद्दल वेंचील निजज्ञान ॥७१॥होईल निर्लज्ज निःशंक । मज देखों न शकती लोक । ऐसें जाणोनि निष्टंक । न येचि देख श्रीकृष्ण ॥७२॥लिखितीं चुकी पडिली मोठी । पावेन शतजन्मापाठीं । हेंचि देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेचि ॥७३॥मज नाहीं वैराग्यकडाडी । भेटी न मगेचि रोकडी । माझ्या मुखरसाची गोडी । प्रतिबद्धक मज झाली ॥७४॥सिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविलें लिखित । आंगें उडी न घलींच येथ । आळसयुक्त भीमकी ॥७५॥लिखितासाठीं जरी मी सांपडें । तरी कां साधक शिणती गाढे । भीमकी केवळ आहे वेडें । येणें न घडे मज तेथें ॥७६॥कृष्ण न यावया एकभावो द्विजें देखिला देवाधिदेवो । विस्मयें दाटला पहा हो । कार्य आठवो विसरला ॥७७॥कृष्ण देखतांचि त्रिशुद्धी । लागली ब्राह्मणा समाधि । हारपली मनबुद्धि । लग्नसिद्धि कोण सांगे ॥७८॥जे जे श्रीकृष्णासी मिनले । ते परतोनि नाहीं आले । मज आहे वेडें लागलें । वाट पाहें द्विजाची ॥७९॥मायबापांसि नेणत । वधूनें पाठविलें लिखित । हेंचि देखोनि निंदित । येत येत परतला ॥८०॥अहो त्रियामांतरित उद्वाहो मेऽल्पराधसः । नागच्छत्यरविंदाक्षो नाहं वेद्म्यत्र कारणम् ॥२३॥लग्नाआड एकराती । कां पां न येचि श्रीपति । परापर उपरि ये वरोति । वाट पाहत उभी असे ॥८१॥माझें मंदभाग्य पूर्ण । येतां न दिसे पंकजनयन । न यावयासि कारण कोण । हें मजलागून तर्केना ॥८२॥सोऽपि नावर्ततेऽद्यापि मत्संदेशहरो द्विजः । अपि मय्यनवद्यात्मा दृष्ट्वा किंचिज्जुगुप्सितम् ॥२४॥गेला मत्पत्रिका घेऊनी । तोही ब्राह्मण न येचि आझुनी । कीं स्वयें निर्दोषी चक्रपाणि । मद्दोष लक्षूनि उपेक्षी ॥८३॥डोळा न लगे सेजेसीं । निद्रेमाजि देखे कृष्णासी । नेणे स्वप्नसुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ॥८४॥अन्न न खाय तत्वता । जेवितां देखे कृष्णनाथा । गोडी लागली अनंता । न मगे आतां धड गोड ॥८५॥करूं जातां उदकपान । घोंटासवें आठवे कृष्ण । विसरली भूक तहान । लागलें ध्यान हरीचें ॥८६॥तोंडीं घातलिया फोडी । घेवों विसरली ते विडी । कृष्णीं लागलिया गोडी । अनावडी विषयांची ॥८७॥आळविल्या कानीं नायके । थापटिलिया ते चंबके । देह व्यापिलें यदुनायकें । शरीरसुखें विसरली ॥८८॥पाय ठेवितां धरणी । कृष्ण आठवे रुक्मिणी । सर्वाङ्गें थरथरूनी । रोमांचित होऊनि ठाके ॥८९॥लीलाकमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवती । नयनीं अश्रु जी लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिसी ॥९०॥मत्पाणिग्रहणे नूनं नायाति हि कृतोद्यमः । दुर्भगाया न मे धाता नाऽनुकूलो महेश्वरः ॥२५॥देवी वा विमुखा गौरी रुद्राणी गिरिजा सती । एवं चिंतयती बाला गोविंदहृतमानसा ॥२६॥गोविंदें हरिलें गे मानस । झाली विषयभोगीं विरस । पाहे द्वारकेची वास । मनीं आस कृष्णाची ॥९१॥कां पां न येचि गोविंद । तरी माझेंचि भाग्य मंद । नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणोनि खेद करीतसें ॥९२॥मग म्हणे कटकटा । किती करूं गे आहा कटा । मर मर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहियेलें ॥९३॥आजिचेनि हें कपाळ । कृष्ण प्राप्तिविण निष्फळ । म्हणोनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत ॥९४॥मज न घलावा वो व्यजनवारा । तेणें अधिक होतसे उबारा । प्राण निघों पाहे बाहिरा । शार्ङ्गधरा वांचूनी ॥९५॥आंगीं न लवा गे चंदन । तेणें अधिकचि होतसे दीपन । माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥९६॥साह्य नव्हेचि गे अंबा । विमुख झाली जगदंबा । आतां कायसी लग्नसोभा । प्राण उभा सांडीन ॥९७॥शिवा भवानी रुद्राणी । कां पां न पवतीचि कोण्ही । कां विसरली कुलस्वामिनी । चक्रपाणि न पवेचि ॥९८॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP